Varas Nondani संपूर्ण माहिती

1
12225

Varas Nondani संपत्तीच्या वारसा नोंदणीबाबत संपूर्ण माहिती

Varas Nondani आपल्याला शक्यतो घरातील प्रमुख व्यक्तिच्या नावावर संपूर्ण शेतजमिन असलेली बघायला प्रामुख्याने मिळते.

अश्यात घरातील प्रमुख व्यक्तिचे काही कारणास्तव निधन झाल्या नंतर त्या व्यक्तिच्या नावावरील जमिनीवर Varas Nondani करणे आवश्यक असते.

वारस नोंदीमुळे मयत व्यक्तिच्या नावावरील जमिनीवर वारसांना हंक्क मिळण्यास मदत होते.

बऱ्याच वेळा वारस नोंदीवरून आपल्याला वाद विवाद सुध्दा बघायला मिळतात.

Varas Nondani सर्वप्रथम गाव नमुना क्रमांक 6 मंध्येच केल्या जाते.

त्यानंतर नोंदवलेल्या वारसांची चौकशी करून नंतर कोणा कोणाचे नाव वारस म्हणून जमिनीस लावायचे

या बाबत वारस ठराव मंजूर केला जातो व त्या नंतर शेवटी फेरफार नोंदवहीत नोंद केली जाते.

वारस नोंदीबाबत वारसांची जर काहि हरकत असेल तर त्या वारसांना त्यांचे म्हणणे अर्ज करून मांडता येते.

महसूल विभागाच्या ज्या नोंद वहिमंध्ये वारस नोंद केल्या जाते त्या नोंदवहीला गाव नमुना क्रमांक 6 क असे म्हणतात.

Varas Nondani
Varas Nondani

वारसाचे प्रमाणपत्र Varas Nondani Certificate

वारसा प्रमाणपत्रासाठी अर्जाचा नमुना

मयत झालेल्या व्यक्तिचा वारस असल्याचे सिध्द करण्यासाठी वारसाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.

आपण मृत झालेल्या व्यक्तिच्या नात्यातील आहे व त्या व्यक्तिच्या मृंत्यु नंतर त्याच्या मालमंत्तेवर अथवा संपत्तीवर आपला हंक्क आहे हे वारसा प्रामणपत्राव्दारे सिंध्द करता येते.

Varas Nondani प्रक्रियेतील आवश्यक मुद्दे

जमिन नावावर असलेली कुटुंबातील प्रमुख व्यक्तिचा मृत्यु झाल्यास 03 महिन्यांच्या आत नवीन वारस नोंदणी

करण्यासाठी लिखीत अथवा मुद्रित अर्ज तलाठी कार्यालयाकडे सादर करावा लागतो.

अर्ज सादर करतांनी अर्जात मृंत झालेला खातेदार किती तारखेला मृत झाला आहे त्यासोबतच त्याच्या नावावर

कोण कोणत्या सर्वे क्रमांकात / गटात एकुण किती जमिनीचे क्षेत्र आहे हे नमुद करणे आवश्यक असते.

अर्जासोबत मृत पावलेल्या व्यक्तिचा मृत्यूचा दाखला, त्याच्या नावावरील एकुण जमिनीचा दाखला म्हणजेच

8 अ उतारा, 7/12 उतारा व सोबत सर्व वारसांचे मयत व्यक्तिसोबतचे नाते तसेच निवासी पंत्ते सादर करावे लागतात.

यासोबतच सर्व वारसांना प्रतिज्ञा पत्र सुध्दा सादर करावे लागते.

या ठिकाणी एक महत्वाची बाब अशी आहे कि भारतात प्रत्येक धर्मासाठी स्वतंत्र

Varas Nondani कायदा आहे मयत व्यक्ति हिंदू असेल तर वारसा नोंद हिंदू वारस कायद्यानुसार केली जाते

तसेच मयत व्यक्ति मुस्लिम असल्यास मुस्लिम वारस कायद्यातील नियमानुसार वारस नोंद केली जाते.

प्रक्रियाVaras Nondani वारस नोंदणी
StateMaharashtra
कायदावारसा हंक्क कायदा
Official Websitehttps://igrmaharashtra.gov.in/
वारस नोंदणी

हे सुध्दा वाचा …

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

Varas Nondani संपूर्ण प्रक्रिया

वारसांनी वारस नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम मृत व्यक्तिचा मृत्यु दाखला काढावा त्यानंतर मृत पावल्याच्या

दिनांकापासून 03 महिन्याच्या आत सर्व संभाव्य वारसांची नावे नमूद करून वारस नोंदीसाठी आधी उल्लेख केल्याप्रमाणे अर्ज सादर करावा.

तलाठी कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जाची नोंद रजिस्टर मंध्ये घेतली जाते.

त्यानंतर सर्व संभाव्य वारसांना नोटिस काढून बोलावले जाते व गावातील सरपंच, पोलिस पाटील, तसेच प्रतिष्ठीत व्यक्तिंकडे

वारसांबाबत विचारणा करून वारसांनी अर्जात सादर केलेल्या माहितीची पडताळणी केली जाते.

अर्जातील माहिती योग्य आढळल्यानंतरच फेरफार रजिस्टर मंध्ये नोंद घेतली जाते.

त्यानंतर परत सर्व वारसांना नोटीस देवुन त्याची सुचना दिली जाते 15 दिवसाच्या आत वारसांना नोंदी बाबत काहि आक्षेप असल्यास अर्ज सादर करून आक्षेप नोंदविता येतो.

15 दिवसापर्यंन्त कुणाचा आक्षेप न आल्यास फेरफार नोंदीबाबत कायदेशीररित्या आदेश काढून वारसाची नोंद घेतली जाते

अथवा वारसांनी घेतलेला आक्षेप संयुक्त असल्यास वारसाची नोंद रद्द केली जाते.

वारस नोंदणी Varas Nondani प्रक्रियेतील महत्वाच्या बाबी

मयत व्यक्तिने स्वत: खरेदि केलेल्या जमिनीवरील हंक्क मयत व्यक्तिचे मुले, मुली, विधवा बायको आणि मयताची आई यांना मिळतो.

त्या जमिनीत मयताच्या वडिलांना हंक्क मिळत नाहि.

वडिलांच्या अगोदर मुलगा मयत झाला असेल तर त्याच्या मुला मुलींना मिळून एक वाटा मिळतो.

मृत्यु पावलेल्या व्यक्तिचे दुसरे अथवा तिसरे लग्न झालेले असेल तर त्या व्यक्तिच्या पत्नीला वारस हक्क मिळत नाहि

मात्र त्यांना झालेल्या मुला मुलींना मयत व्यक्तिच्या मालमंत्तेमंध्ये वारसाने हिस्सा मिळतो.

Varas Nondani झाल्यानंतर 7/12 उताऱ्यावरती वारसांची नावे लावण्यासाठी तहसिलदार किंवा मंडळ अधिकारी स्थानिक चौकशी करूनच निर्णय देतात.

त्यानंतरच गाव नमुना क्रमांक 7 मंध्ये वारसांची नावे नोंदवीली जातात.

हे सुध्दा वाचा …

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

विहित नमुन्यातील कोर्ट फीस्टँप लावलेला अर्ज, वारस असल्याबाबतचे शपथपत्र, मृत व्यक्तिचे मृत्यू प्रमाणपत्र, तलाठी अथवा मंडळ अधिकारी यांचा अहवाल.

मयत व्यक्ति शासकीय नोकरीस असल्यास नोकरीला असल्याचा पुरावा यामंध्ये सेवा पुस्तिेकेच्या पहिल्या पानाची प्रत,

मयत व्यक्ती पेंशन धारक असल्यास मयत व्यक्तिने कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेंशन उचलले आहे त्या नोंदिच्या पानाची प्रत,

रेशन कार्ड, मृत्युप्रमाणपत्र, शासकिय नोकरीच्या सेवा पुस्तिकेत वारसाचे नाव लिहिलेले असेल तर त्याची प्रत.

वारस हक्क व नॉमिनी यातील फरक

वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगवेगळे असुन विमा पॉलिसी, बँक खात्यातील रक्कम इत्यादी बाबत नॉमिनी केली जाते

ज्या व्यक्तिचे नाव नॉमिनी म्हणुन असते त्या व्यक्तिलाच लाभ दिल्या जातो.

हे सुध्दा वाचा …

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

वारसा नोंदणी माहिती आधारित व्हिडीओ पहा

Varas Nondani
Adv