हद्द कायम जमीन मोजणी Hadd Kayam Jamin Mojani

0
2236

शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून Bhumi Abhilekh Office आपल्याला, हद्द कायम मोजणी Hadd Kayam Jamin Mojani, भूसंपादन संयुक्त मोजणी Bhusampadan Sayukt Mojani, निमताना मोजणी Nimtana Mojani, पोटहिस्सा मोजणी Pot Hissa Mojani, कोर्ट कमिशन मोजणी Court Commission Mojani, कोर्ट वाटप मोजणी Court Watap Mojani, बिनशेती मोजणी Binsheti Mojani अश्या विविध प्रकारच्या जमीनीच्या मोजण्या Jamin Mojni, आपल्या गरजेनुसार करून घेता येता.

Hadda Kayam Mojani Bhumi Abhilekh Sarkari Mojani

प्रत्येक मोजणी करीता, काहि वेगवेगळे नियम आहे, मित्रांनो आपल्या शेतजमीनीची हद्द, म्हणजेच सोप्या भाषेत जमीनीचा बांध, Jaminicha Bandh Kyam Karne कायम करण्याकरीता, हद्द कायम मोजणी हा पर्याय आहे, हद्द कायम मोजनणी हि, शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून दिली जाणारी मोजणी आहे, जमीनीच्या हद्दीबाबत अतिक्रमण, व इतर विविध कारणाने हद्द नष्ट होणे, यामुळे वाद उद्भवतात, हद्द कायम मोजणी करून, आपल्याला आपल्या जमीनीची हद्द परत मिळवीता येते, जमीनीची नियमीत सरकारी मोजणी सुध्दा करता येते, त्याबाबत याआधीच आपल्या ब्लॉग वरती तुम्हाला पोष्ट वाचायला मिळेल.

त्या बाबत माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा. https://shivbhumi.com/sarkari-jamin-mojani/

या ठिकाणी आता, हद्द कायम मोजणी, या मोजणीच्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पाहुयात.

हद्द कायम मोजणी बाबत माहिती Hadd Kayam Mojani Babad Mahiti

या प्रकारची मोजणी कुणामार्फत केल्या जाते ?

हद्द कायम मोजणी शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाते.

मोजणी करण्याकरीताचा अर्ज

मोजणी हद्द कायम करिता फी Hadd Kayam Mojani Fees भरावी लागते का?

हद्द कायम मोजणी करण्याकरीता फी भरावी लागते, भूमी अभिलेख कार्यालयाने प्रती एकर ठरवलेली फी भरून चलान कार्यालयाकडे जमा करावे लागते.

खालील लिंक वरती क्लिक करून जमीन मोजणी फी किती लागेल ते तपासू शकता

https://emojni.mahabhumi.gov.in/citizensite/pgMojaniform.aspx

या प्रकारच्या Hadd Kayam मोजणी करिता कोण कोणती कागदपत्रे लागतात Haddy Kaym Mojani Document ?

 1. हद्द कायम मोजणी Hadd Kayam Jamin Mojani Arj अर्ज (विहीत नमुन्यातील)
 2. अर्ज हा कोर्ट फी स्टँपसही असावा Court Fees Stamp.
 3. मोजणी करायच्या जमीनीचा 7/12 उतारा.
 4. हद्द कायम मोजणी फि Hadd Kayam Jamin Mojani Fees, जमीनीच्या मोजणी क्षेत्रानुसार भरल्याचे चलन.
 5. ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमीनीचा कच्चा नकाशा, व नकाशामधे जमिनीच्या  कोणत्या बाजूकडील हद्दी बाबत तक्रार आहे व ती हद्द कायम करून हवी आहे याची माहिती.
 6. जमिनीला लागून असलेल्या सर्व खातेदारांची नावे व त्यांचा पत्ता.
 7. अर्जदाराचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, ईत्यादी माहिती अर्जासोबत

हद्द कायम मोजणीची प्रक्रिया Hadd Kayam Jamin Mojani Process

 1. मोजणी अर्ज Mojani Arj दाखल करून घेतल्यानंतर मोजणी रजिस्टर क्रमांक  Register Number पोहोच पावतीवरती दिला जातो.
 2. भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध असलेले मूळ टिपण Mul Tipan किंवा फाळणी उतारे Falni Utare काढून अर्जाला जोडले जातात.
 3. पुढे अर्ज हा सर्वेअरकडे Land Surveyor पुढिल प्रक्रियेकरीता जातो.
 4. हद्द कायम मोजणी ज्या जमिनीची करायची आहे त्या जमिनीचया लगतच्या शेतकऱ्यांना मोजणीच्या किंमान 15 दिवस आधी रजिस्टर पोष्टाने मोजणी बाबत नोटीसा पाठविल्या जातात.
 5. नोटीस मधे नमुद तारखेला, जमीनीची मोजणी करण्याकरीता सर्वेअर मोजणी करायच्या ठिकाणी येतात.

Hadd Kayam Sarkari Jamin Mojani बाबत अधिक माहिती करीता खालील व्हिडीओ पहा

Hadd Kayam Bhumi Abhilekh Sarkari Jamin Mojani

जमिनीची मोजणी सर्वेअर प्रत्यक्ष कश्या पध्दतीने करतो ?

 1. मोजणी करिता नियुक्त सर्वेअर Land Surveyor सर्वप्रथम ज्या जमीनीची मोजणी Jamin Mojani करायची आहे, त्या जमीनीची पाहणी Land Surve करतो.
 2. पाहणी करत असतांनी अर्जदाराकडून प्रत्यक्ष वहिवाट Vahiwat कोठे आहे याची माहिती घेतली जाते.
 3. पाहणी करून जमीनीच्या प्रत्यक्ष वहिवाटीची हद्द Vahiwat Hadd लक्षात यावी म्हणून कच्च्या खुणा केल्या जातात.
 4. तसेच जमीनीच्या बांधाच्या जुन्या खुणा Jamin Bandh विचारात घेऊन मोजणीला Mojani सुरूवात केली जाते.
 5. आधीच्या काळात प्लेन टेबल Plain Table Method पध्दतीने मोजणी Mojani केल्या जात होती त्याकरीता कालावधी जास्त लागत होता, आता मात्र आधुनिक रोव्हर Rover Machine यंत्राच्या सहाय्याने मोजणी Mojani अवघ्या काहि तासात केल्या जाते.

जमिनीची मोजणी करतांना येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय Jamin Mojani Problems and Solutions

           अतिक्रमण करणारी शेजारील व्यक्ती मोजणी करिता गैरहजर राहणे

मोजणी ज्या दिवशी आहे त्या दिवशी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी लगतचे शेतकरी गैरहजन राहतात, अश्या वेळी लगतची व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर जरी असली तरी मोजणी करता येते, मोजणी बाबतची भूमी अभिलेख कार्यालयाकडून दिलेली नोटिस Bhumi Abhileksh Notice त्या व्यक्तीने स्विकारलेली असावी अथवा स्विकारायला नकार दिलेला असावा, रजिस्टर पोष्टाने नोटिस Register Post Notice पाठविण्यात आलेलेली असती, त्यामुळे नोटिस स्विकारली अथवा नाकारली याची पोहोच परत भूमी अभिलेख कार्यालयाकडे दिल्या जात असते.

मोजणी पुर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया After Land Measurement Process

                रोव्हर Rover Machine अथवा प्लेन टेबल Plain Table पध्दतीने मोजणीनंतर जमीनीचा Mojani Nakasha प्रत्यक्ष नकाशा तयार होतो, तो नकाशा भूमी अभिलेख कार्यालयाकडे असलेल्या मूळ नकाशासोबत तुलना करून जमीनीची हद्द ठरविल्या जाते, यामुळे बऱ्याचदा लगेचच हद्दीच्या खुणा न दाखवता मूळ रेकॉर्डच्या Mul Record Nakasha नकाशासोबत तुलना करून काहि दिवसानंतर हद्द दाखविल्या जाते.

मोजणीच्या दिवशी संपूर्ण मोजणी झाल्यानंतर सर्वेअर मोजणी वेळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तिंचे व लगतच्या खातेदारांचे लेखी जवाब घेऊन पंचनामा तयार करतात, एखाद्याने जवाब देण्यास नकार दिल्यास अथवा पंचनाम्यावर सह्या देण्यास नकार दिल्यास पंचनाम्यात त्याची रितसर नोंद केल्या जाते.

मोजणी नंतर प्रत्यक्ष हद्द दाखविण्याची प्रक्रिया नकाश्याच्या प्रती

 1. जमीनीची हद्द कायम मोजणी प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अर्जदाराला म्हणजेच ज्यांने मोजणी करिता अर्ज केला होता त्याला हद्द दाखविल्या जाते, व तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात Jamin Mojani Nakasha, त्या नकाशावर मोजणीकरिता अर्ज केलेल्या अर्जदाराचे नाव, मोजणी दिनांक, सर्वेअरचे नाव व सही, हद्द अर्जदाराला दाखवील्याचा दिनांक, सही शिक्का इत्यादीची माहिती असते.
 2. मोजणीनंतर प्रत्यक्ष हद्द  आणि मुळ नकाशासोबत तुलना करून येणारी हद्द वेगळी असेल अश्या वेळी वहिवाटीची हद्द Vahiwat Hadd  तुटक तुटक रेषेने (——) व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द सलग रेषेने (_______) दाखविल्या जाते, अतिक्रमण असल्यास अतिक्रमीत भागाचे क्षेत्र रंगीत पेनाने रंगवून दाखविल्या जाते, नकाशावरील तुटक रेषा हि वहिवाटीची हद्द असते तर सलग रेषा हि अभिलेखात दर्शवलेली हद्द असते.

प्रत

शेवटी अर्जदाराला हद्द कायम नकाशा Hadd Kayam Nakasha, त्यालाच “क” प्रत C असे म्हणतात, ती दिल्या जाते.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv