मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima,
जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची
लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल,
मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत,
कोणत्या चुका टाळायला हव्यात, पीक विमा तर काढला, पुढे ई पीक पहाणी करावीच लागणार का,
तुमच्या गावातील काहि शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आले पीक विमा भरून सुध्दा तुम्हाला आले नाही याचे कारण काय,
पीक विमा भरतांनी बँक खाते क्रमांक दुसरा दिला पैसे मात्र दुसऱ्याच खात्यात आले असे कसकाय झाले,
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहुयात.
राज्य | Maharashtra महाराष्ट्र |
योजनेचे नाव | Kharip Pik Vima 2024 Online Form |
योजनेचे मराठी नाव | प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY 2024) |
शासनाचा विभाग | Krishi Vibhag Maharashtra |
1 | पीक पेरा स्वयं घोषनापत्र (Sowing Certificate) | PDF फाईल डाऊनलोड |
2 | जमीन भाडेकरार (Tenant Certificate) | PDF फाईल डाऊनलोड |
3 | सामाईक खातेदार संमतीपत्र | PDF फाईल डाऊनलोड |
4 | पिक विमा ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
5 | पीक विमा क्लेम करण्याचे मोबाईल ॲप | येथे क्लिक करा |
6 | 1 रूपयात पीक विमा जि.आर. | PDF फाईल डाऊनलोड |
Kharip Pik Vima 2024 Online Form Documents List
मित्रांनो Kharp 2024 Pik Vima खरीप हंगाम 2024 पीक विम्या करीता आवश्यक असणारे कागदपत्रे
Pik Vima Documents कोण कोणती लागणार याबाबत सर्वप्रथम या ठिकाणी माहिती पाहुयात.
- आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याचे पासबूक (Passbook)
- सातबारा उतारा व एकूण जमीनीचा दाखला म्हणजेच 8 अ उतारा (Land Records)
- पीक पेरा स्वयं घोषनापत्र (Sowing Certificate)
- तुम्ही शेत जमीन भाडेकरार करून कसत असाल, तुमच्या स्वत:च्या मालकीची जमीन नसेल, तर त्या जमीनीच्या मुळ मालकासोबत झालेला भाडेकरार (Tenant Certificate)
- सामाईक खातेदार असेल तर इतर खातेदारांचे समंतीपत्र
- आधार क्रमांक
- चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक
खरीप पीक विमा 2024 Kharip Pik Vima 2024 ऑनलाईन अर्ज
Pik Vima 2024 Online Arj भरण्याकरीता आवश्यक कागदपत्राची
Pik Vima Documents विस्तृत माहिती
मित्रांनो आता या Kharip Hungam 2024 Pik Vima करीता लागणाऱ्या कागदपत्रांबाबत सविस्तर, एक एक करून विस्तृत माहिती पाहुयात,
जेणे करून कागदपत्रातील चुका टाळता येवुन, पीक विम्याची नुकसानभरपाई मिळवीता येईल.
आधार कार्डशी Aadhar Card संलग्न असलेल्या बँक खात्याचे पासबुक Bank Passbook
पीक विमा अर्ज भरतांनी, अर्जदारचे आधार कार्डशी Aadhar Card संलग्न असलेल्या, बँक खात्याचे पासबुक Bank Passbook,
स्कॅन करून अपलोड करावे लागते, बऱ्याचदा पीक विमा अर्ज भरतांनी, ज्या बँक खाते क्रमांकाचे पासबूक दिल्या जाते,
ते खाते, Aadhar Link Bank Account आधार सोबत संलग्न नसते, यामुळे पीक विम्याच्या भरपाईचे पैसे,
अर्जदाराच्या, दुसऱ्याच आधार सोबत संलग्न बँक खात्यात, जमा झालेले आपल्याला पहायला मिळतात.
सातबारा उतारा Satbara Utara व एकूण जमीनीचा दाखला Ekun Jaminicha Dakhla म्हणजेच 8 अ उतारा
यालाच Land Records असे सुध्दा म्हणतात,ज्या शेतकऱ्यांचा शेतीचा एकच गट क्रमांक आहे,
त्यांना फक्त सातबारा Satbara Utara उताऱ्याची आवश्यकता पडेल, ज्यांची जमीन दोन गटात विभागलेली आहे,
त्यांनी मात्र सातबारा उताऱ्यासोबत, एकूण जमीनीचा दाखला सुध्दा, जोडायला हवा, पीक विमा भरतांनी,
Upload Your Land Records या ठिकाणी, ते अपलोड Upload करावी लागतात. आता डिजीटल सातबारा उतारा Digital Satbara Utara,
व डिजीटल एकूण जमीनीचा दाखला मिळतात Digital 8A Utara, पीक विमा भरतांनी, लेटेस्ट नवीन डाऊनलोड केलेले उतारे वापरावेत.
पीक पेरा स्वयं घोषनापत्र Pik Pera Swaya Ghoshnapatra
यालाच इंग्रजीत Sowing Certificate असे सुध्दा म्हणतात, पीक पेरा स्वयं घोषनापत्र, हे शेतकऱ्याने भरून द्यावे लागते,
या मधे शेतात कोणती पीके, किती क्षेत्रात लावली, याचा उल्लेख करावा लागतो, पीक विमा भरतांनी, तुम्ही भरून देत असलेल्या,
पीकपेरा स्वयं घोषनापत्रात उल्लेख केल्या प्रमाणेच, पुढे ई पीक पाहणी करतांनी, पीकाचे नोंदणी शेतकऱ्यांनी करायला हवी,
नाहीतर पीक विमा एका पीकाचा, आणि प्रत्यक्ष शेतात दुसरे पीक लावलेले, आणि ई पीक पाहणीत, पीकाची तीसरीच माहिती,
यामुळे पुढे पीक विमा दावा केल्यानंतर पीक विमा मिळण्यास अडचणी येवू शकता.
पीक पेरा आणि ई पीक पाहणीचा ताळमेळ बसायला हवा.
( मित्रांनो खरीप हंगाम 2024 करीता लागणारे कोऱ्या पीक पेरा स्वयं घोषनापत्राची पीडीएफ फाईल
Pik Pera 2024 PDF File Download तुम्हाला हवी असेल तर खालील डाऊनलोड बटन वरती क्लिक करा)
जमीनीचा भाडेकरार Tenent Certificate
यालाच इंग्रजीत Tenent Certificate म्हणतात, बऱ्याची ठिकाणी आपल्याला, मुळ मालकी हंक्काची शेत जमीन, दुसरी व्यक्ती,
जमीन कसण्याचा भाडेकरार करून, स्वत: पीकवीत असलेली दिसते, गावाकडच्या भाषेत याला, जमीन ठोक्याने देणे, किंवा बटाईने देणे,
असे शब्द वापरले जातात, अश्या वेळी, त्या जमीनीवरील पीकाचा पीक विमा, जमीन कसणाऱ्याला काढायचा असेल, अश्या वेळी, मुळ जमीन मालाकासोबत,
शेत जमीन कसण्याचा जो भाडेकरार झालेला आहे, तो पीक विमा अर्ज भरतांनी, अपलोड करावा लागतो, त्या शेत जमीन भाडेकराराला,
Tenant Certificate म्हणतात. सर्वच पीक विमा अर्जदारांना याची आवश्यकता पडत नाही.
जमीनीचा भाडेकरार Tenant Certificate Download
सामाईक खातेदार असेल तर इतर खातेदारांचे समंतीपत्र Samaik Khatedar Sammati Patra
बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर, सामाईक खातेदार म्हणून नोंद आपल्याला पहायला मिळते,
अश्या वेळी, पीक विमा अर्जदार खातेदाराव्यतीरीक्त, इतर खातेदारांचे संमतीपत्र अश्या शेती जमीनीचा पीक विमा काढतांनी आवश्यक आहे.
सामाईक खातेदार संमतीपत्र डाऊनलोड
आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक Aadhar Card Mobile Number
अर्जदाचा आधार कार्ड क्रमांक Aadhar Number पीक विमा Pik Vima Arj अर्ज भरण्याकरीता आवश्यक आहे,
तसेच चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक Mobile Number असणे सुध्दा आवश्यक आहे,
एकच मोबाईल क्रमांक तुम्ही घरातील इतर सदस्याचा पीक विमा अर्ज Pik Vima Online Form 2024 भरतांनी वापर करू शकता.
मित्रांनो पीक विमा अर्ज भरणे सुरू झाले कि अर्ज ऑनलाईन मोबाईलव्दारे कसा भरावा याबाबत
आपण दरवर्षी आपल्या चॅनल वरती व्हिडीओ बनवित असतो, तो व्हिडीओ पाहण्याकरीता आपल्या युट्युब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा.
YouTube Channel Subscribe
मित्रांनो आता आपण या ठिकाणी पीक विमा बाबत शेतकऱ्यांच्या मणात
अनेक प्रश्न असतात त्यातील काहि प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहुयात Kharip Pik Vima 2024
खरीप 2024 पीक विमा सुध्दा 1 रूपयामधे काढता येणार आहे का 1 Rupayat Kharip Pik Vima 2024?
याचे उत्तर हो आहे, या वर्षी सुध्दा, पीक विमा काढण्याकरीता, पीक विमा कंपनीला द्यावा लागणारा शेतकरी शेयर,
शासनाकडूनच भरल्या जाणार आहे, किती हेक्टर पर्यंन्त, पीक विम्याचा शेयर,
शासन भरणार याची मर्यादा नाही, फक्त एक गोष्ट लक्षात घ्या कि,
तुमचे दोन सातबारे असतील, तर अश्या वेळी तुम्हाला दोन रूपये लागतील, तीन असेल तर तीन रूपये लागतील,
तसेच मित्रांनो पीक विमा, तुम्ही CSC सेंन्टर, अथवा आपले सरकार सेवा केंद्र Aaple Sarkar Seva Kendra मार्फत,
भरणार असाल तर, प्रती सातबारा 15 रूपये, व प्रिन्ट करण्याचे वेगळे तसेच
8 अ उताऱ्याचे सुध्दा व इतर काहि झेरॉक्स काढण्याची गरज पडली,
तर त्याचे वेगळे पैसे तुमच्याकडून आकारले जातात. म्हणजे काय, तर शासनाकडून पीक विम्याच्या प्रिमीयमचे पैसे दिले जातात, अर्ज भरण्याकरीता आवश्यक,
इतर कागदपत्रे व पीक विमा अर्ज Pik Vima Form Charges भरण्याचे चार्जेस, हे अर्जदाराला भरावे लागतात.
येणाऱ्या खरीप हंगाम 2024 करिता पीक विमा अर्ज कोणत्या तारखे पासून भरावा Kharip Pik Vima 2024 Online Form Date?
मित्रांनो आपल्याकडे साधारण मान्सुनचे आगमन 6 जुनच्या आसपास होते, व सर्व ठिकाणच्या
पीक पेरण्या ह्या जुन महिन्याच्या शेवटी पर्यंन्त पुर्ण होतात,
अश्या वेळी जुनच्या शेवटी अथवा, जुलै च्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी,
तुम्ही पीक विमा अर्ज भरायला हवा, बऱ्याचदा कृषी विभाग अमुक अमूक तरखेपर्यंन्त
पीक पेरणी करू नका, असे सांगते, अश्या वेळी त्या तारखेच्या पुढची पीक लागवड दिनांक असावी.
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रेमित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima,… Read more: Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्जमहाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत… Read more: Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोडमहाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal… Read more: Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहायमहाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi… Read more: Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registrationप्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर… Read more: Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले… Read more: अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
मि ज्या पीकाची लागवड केली ते पीक विमा भरतांनी ऑनलाईन अर्जात
दिसत नाही याचे कारण काय असेल Pik Vima Form Pik Name Not Show?
याचे उत्तर आहे,पीक विमा अर्ज Pik Vima Arj Crop Not Show भरण्याच्या, ऑनलाईन पोर्टल वरती Pik Vima Online Portal,
विविध महसूल मंडळे, तसेच विभागानूसार, महसूल खात्याच्या, अधिसूचीत पीकाच्या शिफारशीनुसारच, पीके दिसतात, ज्या महसूल मंडळात,
शासनाकडून जी अधिसूचीत पीके आहेत, त्याच पीकांचा पीक विमा काढता येतो,
यामुळे तुमच्या महसूल मंडळात कोणती अधिसुचित पीके आहेत, याची माहिती, पीक विमा अर्ज भरण्याआधी तुम्ही घ्यायला हवी.
पीक विमा अर्ज Pik Vima Arj भरतांनी Mix Cropping चा पर्याय Yes किंवा No कोणऱ्या आधारावर निवडावा?
पीक विमा भरतांनी, Mix Cropping च्या, पर्यायाबाबत माहिती पाहुयात, मित्रांनो बऱ्याच ठिकाणी, शेतात मुख्य पिकासोबत, आंतर पीक म्हणून,
दुसरे पीक घेतल्या जाते, जसे कि विदर्भात, सोयाबीन मधे, तूरीची आंतरपीक म्हणून लागवड केल्या जाते,
अश्या वेळी, त्या शेत जमीनीचा पीक विमा काढायचा असेल तर,
Mix Cropping पर्यायाच्या ठिकाणी, yes निवडावे लागते, व कोणत्या पीकाची, किती टंक्के लागवड केली ते Ratio नुसार टाकावे लागते.
आंतरपीक न लावता फक्त एकाच पीकाची लागवड असेल तर Mix Cropping च्या पुढचा
No पर्याय Pik Vima Online Form भरतांनी निवडायला हवा.
आधी काढलेल्या पीक विम्याचे पैसे स्वत:च्याच मात्र दुसऱ्या बँक खात्यात
जमा झाले याचे कारण काय आहे Pik Vima Credit Another Bank Account?
मित्रांनो पीक विमा काढतांनी तुम्ही, जो बँक खाते क्रमांक देतात, बऱ्याचदा पीक विम्याची नुकसानभरपाईची रक्कंम,
अर्जदाराच्या दुसऱ्याच बँक खात्यात जमा होते,
याचे कारण असे आहे कि, पीक विमा अर्जदाराचे दोन व दोन पेक्षा जास्त बँकामधे खाते असते,
आणि त्यातील एक बँक खाते, आधार कार्डशी संलग्न असते,
अश्या वेळी जे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न आहे, त्याच बँक खात्यात, ॲटोमॅटिक पीक विम्याचे पैसे जमा होतात,
Crop Insurance Credit Another Bank Account पीक विमा भरतांनी दिलेल्या बँक खात्यात जमा होत नाही.
गावातील इतर शेतकऱ्यांना मागच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली मला मात्र मिळाली नाही Pik Vima Not Credit in Bank Account?
मित्रांनो आज सुध्दा अनेक शेतकऱ्यांच्या मणात असा गैरसमज आहे कि, पीक विम्याची भरपाई, हि सरसगट मिळते Sarsagat Pik Vima,
सरसगट म्हणजे काय, तर सर्व पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देणे Pik Vima Nuksan Bharpai,
मित्रांनो आपण जर मागील पीक विम्याची माहिती तपासली, तर आपल्या लक्षात असे येते कि,
सरकगट पीक विमा भरपाई Sarsagat Pik Vima Nuksan Bharpai एैवजी,
ज्यांनी पीक नुकसानीचा, वैयक्तिक दावा Vyayaktik Pik Vima Dava दाखल केलेला होता, त्यांना पीक विमा नुकसानभरपाई, जास्त वेळा मिळालेली आहे,
म्हणून तुमच्या पीकाचे नुकसान झाल्यानंतर, तुम्ही वैयक्तिक पीक विम्याच्या ॲपव्दारे Personal Crop Insurance Claim App,
किंवा संबधीत पीक विमा कंपणीच्या, टोल फ्री क्रमांकावर कॉल करून, पीक नुकसानीच्या 48 तासाच्या आत, पीक विमा दावा दाखल करायला हवा, तुमच्या गावात सुध्दा,
ज्यांनी व्यैयक्तिक पीक विमा दावे Personal Pik Vima Claim दाखल केले,
त्यांना पीक विम्याची भरपाई Pik Vima Bharpai मिळालेली तुम्हाला दिसून येईल,
मात्र ज्यांनी फक्त पीक विमा काढला, मात्र दावा दाखल केला नाही, त्यांना पीक विम्याला लाभ मिळालेला नाही.
मित्रांनो पीक विम्याचा वैयक्तिक दावा, कसा दाखल करायचा, याबाबत दरवर्षी आपण,
आपल्या चॅनल वरती व्हिडीओ बनवीत असतो, याकरीता आपल्या युट्युब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा.
YouTube Channel Subscribe
ई पीक पाहणी पीक E Pik Pahani विम्याचा लाभ Pik Vima Benifits
मिळवीण्याकरीता आवश्यक आहे का E Pik Pahani Pik Vima Relation
मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे तर हो असे आहे,
आता सातबारा उताऱ्यावर नमुना क्रमांक सात मधे Satbara Utara पीकाची माहिती
हि ई पीक पाहणी E Pik Pahani App ॲपव्दारेच नोंदविल्या जाते,
तुम्ही पीक विमा भरतांनी जरी पीक पेऱ्याबाबत स्वयं:घोषनापत्र देत असाल
तरी ई पीक पाहणी व्दारे झालेली पीकाची नोंदच E Pik Pahani Pik Nondani पीक विमा भरपाई देतांनी तपासली जाते,
तसेच पीक विम्या व्यतीरीक्त शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाई Nesargik Appatti Nuksan Bharpai करीता सुध्दा
ई पीक पाहणीच्या नोंदीच विचारात घेतल्या जातात. पीक विमा भरल्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी करत असाल तर पीकपेरा स्वंय:घोषनापत्रात
पीक लागवडीची माहिती आणि ई पीक पाहणी करतांनी तुम्ही देत असलेली माहिती सारखी असायला हवी.
मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची याबाबत आपण आपल्या युट्युब चॅनल वरती दरवर्षी व्हिडीओ बनवित असतो,
या वर्षी सुध्दा तुम्हाला नवीन व्हिडीओ पहायचा असेल तर आपल्या युट्युब चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करून ठेवा.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा