PM Vishwakarma Yojana ऑनलाईन नोंदणी

0
792

केंद्र सरकारची PM Vishwakarma Yojana पिएम विश्वकर्मा योजना हि पांरपारिक व्यवसाय करणारे विविध कारागीरांसाठी आहे, विविध पारंपारिक व्यवसाय करणारे कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून या योजनेतून ओळख दिल्या जाते. तसेच विविध प्रकारचे आर्थिक लाभ प्रदान करून पांरपारिक व्यवसायांना चालना देणे हे सुध्दा या पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट आहे.

योजनेची माहिती

योजनेचे नावPM Vishwakarma Yojana
राज्य / देशभारत
योजनेचे अधिकृत संकेतस्थळhttps://pmvishwakarma.gov.in/
योजना लाभार्थीपारंपारिक व्यवसाय करणारे व्यावसायीक
PM Vishwakarma Yojana Mahiti
pm vishwakarma yojana nondani
pm vishwakarma yojana nondani

PM Vishwakarma Yojana चे फायदे

कर्जपुरवठा 1 लाख रू. ते 2 लाख रू. पर्यंन्त 5% व्याज आकारणी.

पांरपारिक व्यवसायाकरीता आवश्यक अवजारे (टूलकिट) करीता 15000 रू. अनुदान.

भारत सरकारकडून प्रमाणपत्र आणि विश्वकर्मा म्हणून ओळखपत्र.

विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण तसेच प्रशिक्षण स्टायपेंड चा लाभ दिल्या जातो.

पिएम विश्वकर्मा योजनेमधे खालील पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश होतो

सुतार (सुथार), बोट बवनवणारा, चिलखत, लोहार, हातोडा आणि औजारे बनविणारे, सुवर्णकार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, मिस्त्रीकाम करणारे, टोपली/टोपले बनविणारे, पारंपारीक खेळणी बनविणारे, नाभीक, माळा बनविणारे, धोबी, शिंपी, मच्छीमारी करीताची जाळी बनविणारे. ई.

महत्वाचे : शासकिय सेवेत असलेली व्यक्ती व त्याच्या कुटूंबातील सदस्य योजनेचा लाभ घेवू शकत नाही.

योजनेचा लाभ मिळवीण्याकरीता ऑनलाईन नोंदणी PM Vishwakarma Yojana Online Registration

Pm Vishwakarma yojana करीता Online Registration करून लाभ मिळवीता येतो.

Pm Vishwakarma Scheme पात्रता

PM Vishwakarma Scheme
PM Vishwakarma Scheme
  1. हात आणि हाताने चालविणाऱ्या साधनांसह काम करणारा कारागीर किंवा वरीलपैकी एका कौटूंबिक आधारित पारंपारिक व्यवसायात गुंतलेले व्यावसाईकअसावे तसेच वरील व्यवसायात स्वयंरोजगार आधारावर असंघटित क्षेत्रात पात्र असलेल्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेमधे नोंदणी करता येते.
  2. योजनेकरीता नोंदणी करते वेळी किमान वय 18 वर्षे इतके असावे.
  3. अर्जदार त्याच्या पारंपारीक व्यवसाय करत असायला हवा तसेच केंद्र सरकार अथवा राज्य सरकारच्या क्रेडिट आधारित योजनांसाठी/स्वयंरोजगार/व्यवसाय विकास अतंर्गत गेल्या 5 वर्षात कोणतेही कर्ज घेतलेले नसावे उदा. पीएमईजीपी (PMEGP), पीएम स्वनिधी, मुद्रा योजना. ई.
  4. एका कुटूंबात फक्त एकाच व्यक्तिला लाभ घेता येतो.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना करीता आवश्यक कागदपत्र

  1. आधार क्रमांक
  2. मोबाईल क्रमांक
  3. बँक खाते तपशील
  4. बँक खाते नसल्यास सर्वप्रथम बँक खाते उघडणे आवश्यक
  5. रेशन कार्ड (शिधापत्रिका)
  6. रेशन कार्ड नसल्यास कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड

Pradhanmantri Vishwakarma yojana मधून या वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळते

खाली नमूद विविध वित्तीय संस्थेकडून pm Vishwakarma scheme मधून कर्ज मिळते.

ग्रामीण बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, वित्त कंपन्या, अनुसूचित व्यावसायिक बँका

कर्ज घेण्याकरीता तारण

या योजनेमधून कर्ज घेण्याकरीता कोणतेही तारण द्यावे लागत नाही.

https://telegram.me/Tech_With_Rahul

www.youtube.com/techwithrahul

Adv