महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या मार्फत Divyang Yojana ई व्हेईकल मोबाईल शॉप फॉर दिव्यांग मोफत (E Vehicle Mobile Shop for Handicap) देण्याबाबत सन 2024 करीता ऑनलाईन अर्ज Online Form स्विकारणे सुरू झाले आहे.
इलेक्ट्रीक व्हेईकल मोबाईल शॉप मोफत वितरीत करण्याबाबत या योजनेला दिनांक 10 जून 2019 रोजी महाष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व्दारे काढलेल्या जि.आर. च्या माध्यतून मान्यता देण्यात आलेली आहे. आता नव्याने निर्माण केलेल्या महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. व्दारे या योजनेची अमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेबाबत अधिक माहिती खाली पाहुयात.
प्रस्तुत Divyang Electric Vehicle Shop Yojana (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल ) योजनेचा लाभ हा राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी प्रक्रिया हि या योजनेकरीताच्या संकेतस्थळावर दिनांक 03.12.2023 पासुन सरू करण्यात आलेली आहे.
या Divyang Yojana करीता अर्ज करण्याची अंतिम तारीख हि दिनांक 04.01.2024 आहे.
Divyang e Vehicle Scheme योजनेची ओळख
योजनेचे नाव Scheme Name | Mobile Shop on E Vehicle, मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल, Electric Vehicle Shop Scheme for Handicap, दिव्यांग इलेक्ट्रीक वाहन शॉप योजना, Divyang Electric Vehicle Shop Yojana, Divyang Yojana Free E Vehicle Shop |
राज्य State | महाराष्ट्र Maharashtra |
विभाग | महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. |
योजनेचा कालावधी | 2024 व पुढे |
योजनेचे संकेतस्थळ | https://evehicleform.mshfdc.co.in/ |
या Divyang Yojana करीता ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबाबतच्या माहिती करीता खालील व्हिडीओ पहा
मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेचे उद्देश
- दिव्यांग असलेल्या व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीकरीता चालना देणे.
- सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार / कुटुंबासोबत जिवन जगण्यास सक्षम करणे.
- दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे.
Divyang Electric Vehicle Shop Yojana योजनेकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता खालील ऑनलाईन अर्ज या बटन वर क्लिक करा
योजनेकरीता आवश्यक Affidavit डाऊनलोड करण्याकरीता खालील Affidavit Download बटन वरती क्लिक करा
E Vehicle Mobile Shop for Handicap योजनेबाबतचा जि.आर.डाऊनलोड करण्याकरीता खालील जि.आर.डाऊनलोड बटन वरती क्लिक करा
Electric Vehicle Shop Scheme for Handicap योजनेमधून दिला जाणारा लाभ
या योजनेमधून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल करीता 3 लाख 75 हजार रूपये प्रती लाभार्थी इतके अनुदान देण्यात येईल.
Mobile Van मोबाईल व्हॅन वाटपासाठी परिवहन विभागाच्या परवानगीने देण्यात येणारे वाहन E-Cart व विहित Specification नुसान देण्यात येईल.
मोबाईल व्हॅन पुरविल्यानंतर एक वर्ष कालावधीकरीता देखभाल व दुरूस्ती ही निवड केलेल्या पुरवठाधारकामार्फत मोफत करण्यात येईल.
वर उल्लेख केलेल्या 3.75 लाख रूपये प्रती लाभार्थी अनुदानामध्ये E-Cart वाहनाचा खर्च, RTO रजिस्ट्रेशन, विमा, वाहनाची संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या दिव्यांगत्वानुरूप पुर्नबांधणी व वाहन रचनेत बदल व सहापत्र – ब मधील इतर बाबींचा समावेश आहे.
सबंधित दिव्यांग लाभार्थ्याच्या प्रकरणानुरूप अधिक निधीची आवश्यकता भासत असल्यास संबंधित दिवयांग लाभार्थी स्वत: किंवा अपंग वित्त व विकास महामंडळ किंवा बँकेमार्फत कर्ज स्वरूपात निधी घेवू शकतो.
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रेमित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima,… Read more: Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्जमहाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत… Read more: Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोडमहाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal… Read more: Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहायमहाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi… Read more: Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registrationप्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर… Read more: Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले… Read more: अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
Divyang Yojana योजनेवरील नियंत्रण
अर्जदारांमधून लाभार्थी निवड केलेल्या व्यवसायावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीव्दारे (Through Online System) नियंत्रण ठेवले जाईल. त्या अनुषंगाने GPRS, Software Monitoring, Live Tracking बाबतचा अहवाल सादर करणेस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
Divyang Yojana Free E Vehicle योजनेच्या अटी व शर्ती
- अर्जदार / लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असाव.
- अर्जदाराकडे दिव्यांग असल्याबाबतचे किमान 40 टक्के दिव्याग असल्याचे प्रमाणपत्र असावे.
- लाभार्थी हा वय वर्ष 18 ते 55 या दरम्यान असावा.
- अर्जदार मतिमंद श्रेणीमधला असल्यास त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
- अर्जदार दिव्यांग लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपये पेक्षा अधिक नसावे.
- या योजनेकरीता लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम हा अतितीव्र अपंगत्व ते कमी अपंगत्व या क्रमाने आहे, म्हणजेच जास्त अपंगत्व असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- जास्त अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखली परवानाधारक नसलेल्या अतितीव्र अपंग व्यक्तीच्या बाबतीत सोबतच्या म्हणजेच Escort च्या सहाय्याने फिरता मोबाईल वयवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा अपंगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा