राज्यामधे Falbag Lagvad Anudan Yojana म्हणजेच भाऊसाहेबफुंडकर फळबाग लागवड योजना
सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेकरीता आता MahaDBT पोर्टल वरून Online Form स्विकारणे सुरू आहे.
या लेखा मधे आपण Falbag Lagvad Anudan Yojana योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा करावा, योजने करीता पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मिळणारी अनुदान रक्कम, अनुदान योग्य फळबागा याबाबत माहिती खाली पाहु शकता.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना माहिती
योजनेचे नाव | Falbag Lagvad Anudan Yojana / Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana / भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | Krushi Vibhag Maharashtra |
योजनेचे संकेतस्थळ | Click Here |
लाभार्थी | शेतकरी |

Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana मधील नवीन बदल
- सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबी ऐवजी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास आली आहे.
- तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आलेली आहे. (परिशिष्ट-अ)
- यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (परिशिष्ट-अ) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
Online Form ऑनलाईन अर्ज असा करा
Falbag Lagvad Anudan Yojana पात्रता
अर्जदार शेतकरी असावा.
शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्ड धारण करणारा असावा.
शासन निर्णय 06/07/2018 नुसार आता जॉब कार्ड नसेल तरी लाभ घेता येतो.
आवश्यक कागदपत्र Falbag Lagwad Anudan Yojana
- 7/12 उतारा
- एकुण जमिनीचा दाखला
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांकरीता)
- चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक
- सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पुरावा (उदा.कृषी पंप विज बिल)
Falbag Lagvad Anudan Yojana करीता खालील प्रमाणे अनुदान मिळते
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मधून लाभ घेण्याकरीता 2 हेक्टरची मर्यादा आहे.खाली दर्शविलेली अनुदान रक्कम हि 1 हेक्टर करीता दर्शविलेली आहे.
एकूण अनुदान रक्कम एक-एक वर्षाच्या तिन टप्यात खालील दिलेल्या तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे दिली जाते.
अ.क्र. | फळबाग | तीन वर्ष मिळूण एकूण अनुदान रक्कम |
1 | आंबा कलमे | 67005 |
2 | आंबा कलमे (सधन लागवड) | 129306 |
3 | काजु कलमे | 67027 |
4 | पेरू कलमे (सधन लागवड) | 227517 |
5 | पेरू कलमे | 74860 |
6 | डाळींब कलमे | 120777 |
7 | कागदी लिंबु कलमे | 72907 |
8 | संत्रा/मोसंबी कलमे | 82879 |
9 | संत्रा कलमे | 121519 |
10 | सिताफळ कलमे | 88275 |
11 | आवळा कलमे | 60064 |
12 | चिंच कलमे | 57465 |
13 | जांभुळ कलमे | 57465 |
14 | कोकम कलमे | 57589 |
15 | फणस कलमे | 54940 |
16 | अंजीर कलमे | 113936 |
17 | चिक्कू कलमे | 64455 |
18 | नारळ रोपे बाणावली (पिशवी सहित) | 93817 |
19 | नारळ रोपे बाणावली (पिशवी विरहित) | 75817 |
20 | नारळ रोपे टी*डी (पिशवी सहित) | 93817 |
21 | नारळ रोपे टी*डी (पिशवी विरहित) | 79417 |
फळबाग अनुदान योजना मधे तिन वर्षात खालील तक्त्यात दाखविल्या प्रमाणे अनुदान रक्कम मिळते
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शासन अनुदानीत बाबींचे प्रती हेक्टरी सुधारीत मापदंड सन 20233-2024
आंबा फळबाग लागवड (आंबा कलमे) Ambha Falbag Lagvad Anudan
सधन लागवड आंबा फळबाग लागवड
- ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantranaग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात … Read more
- फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojanaराज्यामधे Falbag Lagvad Anudan Yojana म्हणजेच भाऊसाहेबफुंडकर फळबाग लागवड योजना … Read more
- प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojanaप्रधानमंत्री आवास योजना pradhan mantri awas yojana भारतामधे 22 June … Read more
- E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीखमित्रांनो राज्यात आता ई पीक पाहणी शेवटची तारीख e pik … Read more
- Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादीमहाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत Dushkal Nidhi मदत जाहिर … Read more
- Kanda Anudan List कांदा अनुदान यादीशासनाने पात्र शेतकऱ्यांची Kanda Anudan List बनविली आहे. 2023 मध्ये … Read more
काजू फळबाग लागवड Kaju Falbag Lagvad Anudan
सधन लागवड पेरू कलमे अनुदान Peru Falbag Lagvad Anudan
पेरू फळबाग लागवड अनुदान Peru Lagvad Anudan
डाळींब फळबाग अनुदान Dalimb Falbag Lagvad Anudan
कागदी लिंबू फळबाग लागवड अनुदान Kakdi Limbu Falbag Lagvad Anudan
संत्रा /मोसंबी फळबाग लागवड अनुदान Santra Mosambi Falbag Lagvad Anudan
संत्रा लागवड अनुदान (इंडो-इस्त्राईल पध्दत) Santra Lagvad Anudan
सिमाफळ फळबाग लागवड अनुदान Sitafal Falbag Lagvad Anudan
आवळा लागवड अनुदान Avala Falbag Lagvad Anudan
चिच फळबाग लागवड अनुदान Chinch Falbag Lagvad Anudan
जांभूळ फळबाग लागवड अनुदान Jambhul Falbag Lagvad Anudan
कोकम फळबाग लागवड अनुदान Kokam Falbag Lagvad Anudan
फणस फळबाग लागवड अनुदान Fanass Falbag Lagvad Anudan
अंजीर फळबाग लागवड अनुदान Anjir Falbag Lagvad Anudan
चिकू फळबाग लागवड अनुदान Chiku Falbag Lagvad Anudan
नारळ रोपे बाणवली (पिशवी सहित) अनुदान Naral Falbag Lagvad Anudan
नारळ रोपे बाणावली (पिशवी विरहित) अनुदान Naral Anudan
नारळ रोपे टी*डी (पिशवी सहित) अनुदान Naral Lagvad Anudan
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ “जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी” फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ८० % अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीकरिता अनुदान मिळण्यास अपात्र ठरत होते. या पार्श्वभूमीवर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्यात सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” राबविण्यास दि. ०६.०७.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रति थेंब – अधिक पिक या योजनेतून अदा करण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधुन ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे या बाबी ऐवजी ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
शासन निर्णय:-
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सन २०२३ – २४ पासून खालीलप्रमाणे बदल करण्यास शासन मान्यता देत आहे :-
१) सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबी ऐवजी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात येत आहे. (परिशिष्ट-अ)
३) यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये (परिशिष्ट-अ) प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात येत आहे.