ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana

0
1529

ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात आली असून, याव्दारे आता एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांसोबत संपर्क साधता येतो.

ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर आग, चोरी, दरोड, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, विबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला अशा प्रकारच्या घटनांमधे तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तात्काळ संपर्क साधुन मदत मागणे ग्राम सुरक्षा यंत्रणा चा वापर करून शक्य होत आहे.

ग्रामस्थ आपापले मोबाईल क्रमांक आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा मधे नोंदवुन  या यंत्रणेचा लाभ घेऊ शकत आहे.

Gram Suraksha Yantrana ग्राम सुरक्षा यंत्रणा करीता संपुर्ण भारतासाठी 18002703600 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर नागरिकांनी संकट काळात फोन केल्यास त्याचा 25 सेंकद पर्यंन्त रेकॉर्ड केलेला आवाज त्या नागरिकाच्या परिसरातील हजारे नागरिकांना त्वरित मोबाईलवर कॉल स्वरूपा ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतांनाच तीची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

योजनेचे नावGram Surksha Yantrana ग्राम सुरक्षा यंत्रणा
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे अधिकृत संकेतस्थळhttp://www.gramsu.com/
टोल फ्री क्रमांक18002703600
योजना लाभार्थीसर्व नागरिक
Gram Suraksha Yantra Yojana

Gram Suraksh Yantrana ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

  1. संपूर्ण सव्यंचलित यंत्रणा आहे.
  2. गावासाठी यंत्रणा सुरू करणे व नागरिकांना सहाभागी होण्याची प्रक्रिया सोपी आहे.
  3. संपूर्ण भारताकरीता 18002703600 हा एकच टोल फ्री क्रमांक आहे.
  4. यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नगरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करून शकतो.
  5. संदेश देणाऱ्या वयक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
  6. दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबध्द मदत करता येते.
  7. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचतित रित्या प्रसारित होतात.
  8. नियमबाह्य दिलेले संदेश/अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
  9. एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य होते.
  10. वाहन चारीचा संदेश आजूबाजूच्या 10 कि.मी. परिसरातील सर्व दिशंच्या गावांना तात्काळ दिल्या जातो.
  11. घटनेची तीव्रता किती आहे यानुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजत राहते.
  12. संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय आहे.
  13. कोणऱ्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय आहे.
  14. चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे क्रमांक आपोआप ब्लॅक लिस्ट केले जातात.
  15. गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
  16. सरकारी कार्यालये/ पोली स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संपर्क क्रमांक

ग्राम सुरक्षा येत्रणेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 18002703600

ग्राम सुरक्षा यंत्रणेव्दारे कॉल कसा करावा याच्या सरावासाठी क्रमांक 9595084943

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नियम /अटी 02248931236 या क्रमांकावर कॉल करून एैकू शकता.

वरील सर्व क्रमांक निशुल्क आहे.

Online पध्दतीने Gram Suraksha Ynatra मधे मोबाईल क्रमांक नोंदविणे

आपल्या गावात सुरू झालेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणे मधे सहभागी होण्याकरीता मोबाईल क्रमांक नोंदविणे आवश्यक असते, ऑनलाईन पध्दतीने सुध्दा मोबाईल क्रमांक नोंदविता येतो.

खालील लिंक वरती क्लिक करून मोबाईल क्रमांक नोंदवा

http://rg.gramsu.com/submit-number

ऑनलाईन क्रमांक कसा नोंदवायचा याबाबत माहिती आधारित व्हिडीओ पहा

Gram Suraksha Yantana Mahiti

ग्राम सुरखा यंत्रणा सुरू अशी करा

प्रत्येक गावात पोलीसस्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस सटोशन मध्ये गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अघ्यक्ष व गावातील सामाजिक कार्यमर्ते यांची एकत्रित सभा घेवुन ग्राम सुरखा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते. पंचायत समिती कार्यालयात स्थनिक पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व गट विकास अधिकारी यांचे उपसिथतीत ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांना ग्रामा सुरक्षा येत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते.

Gram Suksha Yantrana अशी वापरा

gram suraksha yantrana kashi vapravi


खालील घटनांकरीता ग्राम सुरक्षा यंत्रणा वापरू शकता.

Gram Suraksha Yantra Kontya Karnakarita Vapravi

नागरिकांना Gram Surksha Yantrana मधे सहभागी होण्याबाबत हे करा

ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्या गावातील प्रत्येक नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होवू शकतो. आपल्या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही यासाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा गावातील पोलीस पाटील यांचे कडे संपर्क करावा.

गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली असेल तर ग्रामपंचायत कार्यालया किंवा ग्रामपंचायतने ठरवुन दिलेल्या व्यक्तिंशी संपर्क करून आपला मोबाईल क्रमांक ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवुन घ्यावा.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv