Pashusavardhan Scheme Document Upload पशुसंवर्धन योजना कागदपत्र अपलोड

0
5230

राज्यस्तरीय योजना या मधे दुधाळ गाय म्हशी वाटप, शेळी मेंढी गट वाटप. 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाव्दारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरू करणे योजनेमधे निवड झालेल्या लाभार्थ्यांना आता कागदपत्रे अपलोड document upload करण्यासंदर्भात sms प्राप्त झालेले आहे कागदपत्रे कश्या प्रकारे अपलोड document upload करावीत, कागदपत्रे कोणती लागतात, कागदपत्रे अपलोड करण्याची लिंक कोणती आहे याबाबत खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

कागदपत्रे अपलोड करण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा

Document upload Link pashusavasrdhan giass mhaiss anudan yojana

https://ah.mahabms.com/webui/farmer-status-login

राज्य स्तरीय दुधाळ गाई/म्हशीचे गट वाटप योजना (document upload अपलोड करण्याकरीता कागदपत्रांची यांदी)

टिप : लाल रगात दर्शविलेली कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे, उर्वरीत कागदपत्रापैकी लागू असलेली कागदपत्रे आवश्यकतेनुसार सादर करावी लागतील

1. * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )       

2. * सातबारा (अनिवार्य)

3. * 8 अ उतारा (अनिवार्य )

4. * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र

5. * आधारकार्ड (अनिवार्य )

6. * 7/12 मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा

7. * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)

8. रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )

9. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)

10. बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )

11. राशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )

12. दिव्यांग असल्यास दाखला (अनिवार्य )

13. बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

14. वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत

15. शैक्षणिक पात्रतेचा दाखला

16. रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत

17. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

पशुसंवर्धन विभागाच्या योजनेकरीता अपलोड करण्याकरीता आवश्यक कागदपत्राचे नमुने डाऊनलोड करा document upload

अपत्य दाखला कोरा नमुना डाऊनलोड

सयुक्त कुटुंब संमती पत्र नमुना डाऊनलोड

जमीन भाडे करार नमुना डाऊनलोड

घोषनापत्र नमुना डाऊनलोड

बंधपत्र नमुना डाऊनलोड

कागदपत्रे अपलोड document upload करण्याबाबत महत्वाच्या सूचना

1. महत्वाची सूचना – कागदपत्र अपलोड क्षमता 100 के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.

2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील

3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.

4. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत

5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.

6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी. 7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे

कागदपत्रे 100 के.बी. साईजची करण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा

योजनेचे वेळापत्रक

दिनांककामाचा तपशीलएकुण दिवस / कालावधी
31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2023प्रणालीमार्फत लाभार्थ्यांना SMS पाठवणे4
4 फेब्रुवारी 2023 ते 11 फेब्रुवारी 2023मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे8
12 फेब्रुवारी 2023राखीव1
13 ते 20 फेब्रुवारी 2023पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा | पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे मार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पुर्ण करणे8
21 फेब्रुवारी 2023राखीव1
22-23 फेब्रुवारी 2023लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता2
24 फेब्रुवारी 2023कागदपत्रे अंतिम पडताळणी1
25 फेब्रुवारी 2023राखीव1
26 फेब्रुवारी 2023अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार1
pashusavardhan vibhag gai mhaiss anudan yojana time table

कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाकडून खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत


1. सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username)पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे 6 आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
2. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत दि.11/02/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
3. प्रणालीमार्फत SMS आलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

4. दि. 03/02/2023 पर्यंत निवड झालेल्या लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल व दि. 04/02/2023 पासून कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
5. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Scheme Information


6. सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील 5 वर्ष ग्राह्य म्हणजेच सन 2025-26 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
7. सन 2021-22 या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन 2022-23 पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल.
8. सन 2022-23 मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
9. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील 5 वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
10. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी कृपया अचूक आणि योग्य कागदपत्रे अपलोड करण्याची खबरदारी घ्यावी.
11. योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे.

कॉल सेंटर संपर्क – १९६२ (१०AM to ६PM).

टोल फ्री संपर्क -१८००२३३०४१८ (८AM to ८PM).

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

Adv