Krushi Karj Mitra Yojana Online Form कृषी कर्ज मित्र योजना सुरू

0
3624

Krushi Karj Mitra Yojana 2021 | कागदपत्रे | अर्ज | पात्रता | कृषी कर्ज मित्र

Krushi Karj Mitra Yojana 2021 हि महाराष्ट्र राज्यात राबविण्याबाबत शासनाकडून जि.आर. प्रकाशीत करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता Nationalize Bank, सहकारी तसेच खाजगी बँका व पतपेढ्यांमार्फत मोठ्या प्रमाणांवर कर्ज पुरवठा केला जातो.

यामध्ये ही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जास्त असतो.

सहकारी बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यामार्फत कर्जाचे वितरण केले जाते.

सर्वसाधारणपणे शेतकरी Navin Pik Karj (नविन पिक कर्ज), मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतो.

हे कर्ज घेत असताना त्याला ७/१२ उताऱ्यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात.

यासाठी बराच कालावधी लागतो व कधी कधी तर हंगाम ही संपून जातो. केवळ कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी त्यास वेळेवर कर्ज मिळत कर्ज मिळत नाही.

नाईलाजास्तव त्याला खाजगी सावकाराकडून जास्तीच्या व्याजाने कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषी

विभागाकडून Krushi Karj Mitra Yojana (कृषी कर्ज मित्र योजना) https://www.maharashtra.gov.in राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सांगली जिल्हा ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता येथे क्लिक करा

औरंगाबाद जिल्हा ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता येथे क्लिक करा

कृषी कर्ज मित्र योजना (Krushi karj Mitra Yojana) बाबत शासन निर्णय

शेतकऱ्यांना वेळेत व सुलुभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, जिल्हा परिषदेच्या कृषी

विभागाकडून “कृषी कर्ज मित्र” योजना (Krushi Karj Mitra Yojana) खाली दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.

Krushi Karj Mitra Yojana चा उद्देश

शेतकऱ्यांना Krushi Karj उपलब्धता सहजतेने व विनाविलंब होण्यासाठी सहाय्य करणे व त्याद्वारे भांडवलाची गुंतवणुक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास साधणे.

Krushi Karj Mitra Yojana 2021
Krushi Karj Mitra Yojana 2021

Krushi Karj Mitra Yojana (कृषी कर्ज मित्र योजना) माहिती

योजनेचे नावकृषी कर्ज मित्र योजना Krushi Karj Mitra Yojana
योजना सुरूवात वर्ष2021
राज्यMaharashtra
अधिकृत शासन निर्णयDownload
शासनाचे संकेतस्थळhttps://www.maharashtra.gov.in
Krushi Karj Mitra Yojna 2021

कृषी कर्ज मित्र योजनेचे स्वरूप

 • दरवर्षी खरीप, रब्बी हंगामामध्ये शेतकरी Pik Karj घेत असतात.
 • लागवडीखालील क्षेत्र व एकूण Pik Karj (पिक कर्ज) वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते.
 • कृषी क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकची भर पडणे आवश्यक आहे.
 • सुक्ष्म निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याने दिसून येतात.
 • त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो.
 • या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे परंतु, कर्ज प्रक्रियेचे अज्ञान असल्यामुळे व वेळेच्या अभावामुळे कर्ज मिळणे शक्य होत नाही.
 • अशा इच्छूक पात्र शेतकऱ्यांना Krushi Karj कृषी कर्ज सहज सुलभतेने त्यांच्या मागणी नुसार वेळेत उपलब्ध होण्यासाठी
 • त्यांना प्रशिक्षीत स्वयंसेवकाची मदत/सहाय्य देणे गरजेचे आहे.
 • ही बाब लक्षात घेउन कृषी कर्ज मित्र यांच्या मदतीने गरजू पात्र शेतकऱ्यांस ज्या बाबीसाठीचे कर्ज आवश्यक आहे,
 • अशी प्रकरणे कृषी कर्ज मित्र (Krushi Karj Mitra) यांच्या सहाय्याने तयार केल्यास शेतकऱ्यांस वेळेत कर्ज उपलब्ध होईल.

Krushi Karj कृषी कर्ज प्रकरणासाठी सेवाशुल्क खालील प्रमाणे आहे

अ) अल्प मुदतीचे कर्ज
प्रथमत: पीक कर्ज घेणारा शेतकरीप्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 150/-
ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज
नविन कर्ज प्रकारणप्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 250/-
कर्ज प्रकरणाचे नुतनीकरणप्रति प्रकरण सेवाशुल्क रूपये 200/-
Krushi Karj Mitra Yojana 2021

कृषी कर्ज मित्र बनण्यासाठी नोंदणी अशी करा

 1. कृषी कर्ज मित्र (Krushi Karj Mitra) म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
 2. नोंदणी झालेल्या इच्छूक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
 3. जिल्हा परिषदेकडील कृषी समितीस अंतिम निवडीचे अधिकार असणार आहे.
 • Krushi Karj Mitra कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे,
 • त्यांना भेटी देऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती द्यावी.
 • कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून मंजूरीसाठी बँकेमध्ये सादर करेल.
 • कृषी कर्ज मित्र (Krushi karj Mitra) हा बँक व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थाच्या भूमिकेऐवजी सहायक व सल्लागाराची भूमिका बजावेल.
 • Krushi Karj Mitra ने पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांस सहाय्य व सल्ला देणे या विषयीचे बंधपत्र देणे आवश्यक आहे.

Krushi Karj मित्रास सेवाशुल्क देण्याची कार्य पध्दती

कृषी कर्ज मित्रास सेवा शुल्क देण्यासाठी तालुका स्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात यावी.

तालुका स्तरीय समिती
1.गट विकास अधिकारीसमिती अध्यक्ष
2.सहायक निबंधक सहकारी संस्थासदस्य
3.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रतिनिधीसदस्य
4.जिल्हा अग्रणी बँकेचा प्रतिनिधीसदस्य
5.तालुका कृषी अधिकारीसदस्य
6.कृषी अधिकारी पंचायत समिती (सर्वसाधारण)सदस्य सचिव
कृषी कर्ज मित्र योजना 2021

Krushi karj Mitra चे कार्ये

 • कृषी कर्ज मित्र शेतकऱ्याच्या शिफारशीसह सेवाशुल्क मागणी यादी बँकेकडे सादर करेल.
 • बँकेकडून त्याची शहानिशा करून बँक त्या गटातील गट विकास अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे सेवा शुल्क अदायगीसाठी यादी सादर करेल.
 • सेवा शुल्कावरील होणारा खर्च हा त्या वर्षाच्या योजनेच्या उपलब्ध निधीतून गट विकास अधिकारी यांनी भागवावा.

कृषी कर्ज मित्र योजनेचा कालावधी

सदर योजनेचा कालावधी हा सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष राहील.

आवश्यकतेनुसार योजनेचा कालावधी कमी करणे किंवा वाढविण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला राहतील.

कृषी कर्ज मित्र योजनेच्या निधीचा स्त्रोत व रक्कम :

 • जिल्हा परिषद स्वनिधी सन २०२१-२२ चे अंदाजपत्रक
 • लेखाशिर्ष -२४०१ कृषी खर्चाची मर्यादा रक्कम रू.१०,००,०००/- (रूपये दहा लाख फक्त)

Krushi Karj Mitra Yojan बाबतचा शासनाचा अधिकृत जि.आर.डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

कृषी कर्ज मित्र होण्याकरीता ऑनलाईन अर्ज कश्या प्रकारे सादर करावा याबाबत माहिती पाहण्याकरीता खालील व्हिडीओ पहा

कृषी कर्ज मित्र योजनेबाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

Adv