Pik Karj (Crop Loan) बिन व्याजी मिळणार

1
1065

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत दिलेल्या pik karj वरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने दिनांक २४/११/१९८८ रोजी घेतला होता.

[su_image_carousel source=”media: 715″ slides_style=”photo” crop=”none” align=”center” image_size=”full”]

[su_quote]शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्पदराने pik karj मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याची ही योजना शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. [/su_quote]

शासनाने वेळोवेळी या योजने मधील pik karj मर्यादा व व्याज दरातील सवलत यामध्ये सुधारणा केलेली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Pik Karj
Pik Karj

सध्या शेतकऱ्यांनी रू. ३.० लाखापर्यंत घेतलेल्या Crop Loan कर्जावर बँकातर्फ ६ % व्याज आकारण्यात येते व या कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या व्याजदरातील सवलतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

Pik Karj
Pik Karj

केंद्र शासन रू. ३.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३% व्याज दरात सवलत देते मात्र राज्य शासन रू.१.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत ३ % व्याज सवलत व रू.१.०० लाख ते ३.०० लाख या कर्ज मर्यादेपर्यंत १% टक्का व्याज दरात सवलत देते, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना रु.१.०० लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास एकूण व्याजदरात ६% सवलत मिळून अंतिमतः त्यांना सदर कर्ज ० % (शून्य टक्के) व्याजदराने उपलब्ध होते. मात्र शेतकऱ्यांना रु.१.०० ते ३.०० लाख या कर्ज मर्यादेमध्ये २ % व्याज भरावे लागते. महागाईमुळे कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना रू.१.०० लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रु. ३.०० लाख मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज हे सरसकट ०% (शून्य टक्के) व्याजदराने मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा विचारात घेऊन मा. उपमुख्यमंत्री तथा मा.मंत्री (वित्त व नियोजन) यांनी मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना रुपये ३.०० लाख पर्यंतचे पीक कर्ज हे ०% (शून्य टक्के) व्याजदराने देण्यात यावे अशी घोषणा केली होती या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्याची बाब विचाराधीन होती, आता या संदर्भात शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतले आहेत.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

Pik Karj बाबत शासन निर्णय :

राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने “डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना” ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे राज्यामध्ये अंमलात आणण्यात आलेली आहे. सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या अनुषंगाने अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड विहित मुदतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२१-२०२२ या वर्षापासून पुढील प्रमाणे व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये सन २०२१-२०२२ या वर्षापासून पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड मुदतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे व्याज दरात सवलत देण्यात येणार आहे.

(१) सध्या शेतक-यांना रु.१.०० लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड केल्यास त्यांना ३ % व्याज दरात सवलत देण्यात येते, ती कायम ठेवण्यात येणार आहे

(२) सध्या रु.१.०० लाख ते रु ३.०० लाख या कर्ज मर्यादेमध्ये शेतक-यांनी अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीस केल्यास १ % व्याज दरात सवलत देण्यात येते, यामध्ये आता अधिक २ % व्याज दरात सवलत वाढवून देण्यात येत आहे. जेणेकरून या कर्ज मर्यादेत व्याजदरात एकूण ३ % व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

(३) उपरोक्त व्याज दरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांना रु. ३.०० लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट ३ % व्याज सवलतीचा लाभ देण्यात यावा, जेणे करून रू. ३.०० लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेवून त्याची मुदतीत परतफेड करणा-या शेतक-यांना केंद्र शासनाचे ३ % व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतक-यांना शून्य टक्के (0%) व्याज दराने उपलब्ध होणार आहे

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

(४) या योजनेच्या इतर अटी व शर्ती यापूर्वी ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहणार आहे

अशाप्रकारे उपरोक्त योजनेचे अधिक स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने रु.३.०० लाखापर्यंत अल्प मुदत Pik Karj घेऊन त्याची विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतक-यांना व्याज दरात ३ % सवलत देण्यात येणार आहे

सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२०९/१४३१, दिनांक ११/०६/२०२१ आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२८१/२०२१/व्यय-२, दिनांक ११/०६/२०२१ अन्वये प्राप्त मंजूरीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे

सदर योजनेची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहकार आयुक्त व निबंधक कार्यालया तर्फे सर्व संबंधीतांना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहे.

Adv