Jaminichay Watnipatra शेतजमीन वाटणीपत्र नोंदणी आवश्यक नाहि

3
739

Jaminichay Watnipatra || शेतजमिनीचे वाटणीपत्र माहिती

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता- १९६६ मधील कलम- ८५ नुसार Jaminichay Watnipatra (शेतजमीनीच्या वाटणीपत्र)

नोंदणीची आवश्यकता नसल्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ०५ दिनांक: १६ जुलै, २०१४. रोजी याबाबत शासन परिपत्रक प्रकाशीत केलेले आहे.

Jaminichay Watnipatra

Jaminichay Watnipatra  प्रकाशीत केलेल्या शासन परिपत्रकातील प्रस्तावना :

शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या

जमीनीतील हिश्श्याचे विभाजनाकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याची तरतूद

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६च्या, कलम -८५ मध्ये आहे.

काही जिल्हयात जिल्हाधिकारी यांचे सदर अधिकार संबंधित तहसिलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुषंगाने सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्श्याचे वाटपाची/विभाजनाची कार्यवाही करण्यात येते.

Jaminichay Watnipatra
Jaminichay Watnipatra

तथापि, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ मधील तरतूदीच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत Jaminichay Watnipatra

असल्याशिवाय काही जिल्हयात वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे तहसिलदार यांच्यास्तरावर वरीच हिश्श्ये वाटणीची प्रकरणे प्रलंबित असून यामूळे शेतक-यांची कामे

प्रलंबित राहिल्याने शेतक-यांमध्ये असंतोप निर्माण झाला असल्यावावत शासनास निवेदन प्राप्त झालेले होते.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्या, कलम-८५, विभाजन याबाबतची तरतूद पाहता,

शेत Jaminichay Watnipatra च्या नोंदणी बाबतत असलेला संभ्रम दूर करण्याच्या व संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रीय

कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या उददेशाने स्वयंस्पष्ट सूचना क्षेत्रिय अधिका-यांना देणे गरजेचे होते.

त्या अनुषंगिक बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Shetjamin Watnipatra बाबत शासन परिपत्रकातील माहिती :

उपरोक्त पार्श्वभूमी अनुषंगाने व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम-८५ मधील तरतुदी विचारात घेवुन,

या विभागातील सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना पुढिल प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत आहेत.

1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम-८५ मध्ये शेतक-यांनी धारण केलेल्या शेतजमीनमध्ये

एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमीनीतील हिश्श्याचे विभाजनाबाबत असलेल्या तरतूदीकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.

2.  मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ याचिका क्र.२८१५/२००२ श्री.अरविंद यशवंतराव देशपांडे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, हिंदू एकत्र कुटूंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकाला मिळकत प्राप्त होणे, ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही, म्हणून Shetjamin Watnipatra ची नोंदणी करणे सक्तीचे नाही. या आदेशानुषंगाने नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी संदर्भाधिन क्र.३ येथे नमुद दिनांक १०.५.२००६ रोजीचे परिपत्रक निर्गमित करुन सर्व जिल्हाधिकारी यांना स्वयंस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

Jaminichay Watnipatra
Shetjamin Watnipatra

Jaminichay Watnipatra Kayda बाबत माहिती

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या, कलम- ८५ मधील तरतूद आणि मा.उच्च न्यायालय,

नागपूर खंडपीठ यांच्याकडे दाखल याचिका क्र. २८१५/२००२ मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाहता,

शेतक-याने धारण केलेल्या शेतजमीनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा,

तसेच एकत्र हिंदु कुटुंबाच्या मालकीच्या धारण जमीनीतील आपल्या हिश्श्याच्या वाटणी / विभाजनाकरीता जिल्हाधिकारी /तहसिलदार यांच्याकडे अर्ज केल्यास,

त्या प्रसंगी संबंधित सहधारकाकडे नोंदणीकृत Shetjamin Watnipatra मागणी करण्यात येऊ नये.

विभाजन/वाटणी अनुषंगाने जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता- १९६६ च्या,

कलम-८५ मधील तरतूद व त्याखालील नियमान्वये कार्यवाही करावी असे परिपत्रकात नमुद करण्यात आलेले आहे.

Jaminichay Watnipatra बाबत शासनाचे अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संबधीत शासन परिपत्रकाबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा :

Jaminichay Watnipatra

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

Adv