Sheli Palan 20 शेळ्या + 02 बोकड योजना 2021-2022

1
2136

Sheli Palan Yojana || शेळी पालन योजना

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात Sheli Palan उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसया टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या +२ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता शासनामार्फत प्रदान करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २३८/पदुम-४, यांच्यातर्फे दिनांक : ९ जुलै, २०२१. रोजी शेळी पालन Yojana बाबत शासन निर्णय प्रकाशीत करण्यात आला आहे.

Sheli Palan योजनेचा परिचय

Scheme NameSheli Palan Yojana
StateMaharashtra
Scheme Start Year2021
G.R.DownloadDownload
शेळी पालन
Sheli Palan Yojana 2021
SheliPalan Yojana

Sheli Palan शासन परिपत्रकातील प्रस्तावना :

पशुंसवर्धन विभागामार्फत शेळी पालन साठी शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासनातर्फे निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

Sheli Palan
Sheli Palan

Sheli Palan शासन परिपत्रकातील प्रस्तावना : Yojana बाबत शासन निर्णय :

शेळी पालन योजनेंतर्गत देय अनुदान :

निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळयांसाठीचा वाडा) रू.२,३१,४००/- इतका आहे. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहणार आहे.

२० शेळ्या +२ बोकड अशा शेळी गट योजनेचा तपशील :

अ.क्रतपशीलदर (प्रति शेळी / बोकड)गटाची एकुण किंमत
120 शेळ्या खरेदी6,000/-1,20,000/-
202 बोकड खरेदी8,000/-16,000/-
3शेळ्यांचा वाडा (450 चौ. फूट)212 रू प्रति चौ. फूट95,400/-
एकुण2,31,400/-
Sheli Anudan Yojana

अनुदानाचा तपशील :

अ.क्रगटाचे स्वरुपगटाची किंमत50 टक्के अनुदान रक्कम
120+02 शेळी गट वाटप2,31,400/-1,15,700/-
Sheli Anudan Yojana

उपरोक्त प्रमाणे बोकडाच्या आधारभूत किंमतीत केलेली सुधारणा आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून लागू राहणार आहे.

सदरचा शेळी पालन Yojana बाबतचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

शासनातर्फे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसायातून उत्पन्न वाढ व्हावी.

शेतकऱ्यांना आर्थिक सुबंत्ता यावी या साठी विविध अनुदान योजना राबविल्या जातात.

शेळीपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय आहे.

शेळी पालन Yojana राज्यात महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येते.

या योजनेतून शेतकऱ्यांना शेळ्या खरेदि करण्यासाठी अनुदान दिल्या जाते.

Sheli Palan योजनेबाबत अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ पहा

Adv