Pik Karj Yojana आता शुन्य टंक्के व्याजदर

6
1004

Pik Karj Yojana || पिक कर्ज योजना

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकामार्फत शेतकऱ्यांना Pik Karj पुरवठा करण्यात येतो.

राज्यातील जे शेतकरी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड दि. ३० जूनपर्यंत करतात

अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी शासनामार्फत

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत करीत आहेत. त्यामुळे बँकांची पीक कर्जाची वसुली होण्यास मदत होत आहे.

पिक कर्ज योजना

राज्यात एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या कोविड-१९ परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत

शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडी-अडचणी व साखर कारखान्यांकडून

शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली FRP विचारात घेता राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी

बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि. ३१/०७/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पिक कर्ज योजनेचा परिचय

Scheme Nameपिक कर्ज योजना
StateMaharashtra
Scheme Start Year2021-2022
G.R.DownloadDownload
पिक कर्ज

पिक कर्जा बाबत शासकिय जि.आर.डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Pik karj बाबत शासन निर्णय :

उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेली विशिष्ट परिस्थिती विचारात घेता राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी

बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस दि. ३१/०७/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना चा लाभ मिळण्यास पात्र असतील.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

महाराष्ट्र राज्यातील जनता प्रामुख्याने शेती वरत अवलंबुन आहे.

ग्रामिण भागात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केल्या जातो.

पेरणीपुर्व हंगामात शेतकऱ्यांना शेती मधे पिक लागवड करण्यासाठी

तसेच बि-बियाणे व खेते व विविध औषधी खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.

पेरणीच्या काळामध्ये शेतकरी पैश्या वाचून पेरणी पासून दुर राहु नये तसेच त्याला आर्थिक मदत व्हावी या साठी राज्यात पिक कर्ज योजना राबविली जाते.

पिक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनातर्फे विविध लाभ वेळोवेळी दिल्या जातात, जसे कि कर्ज माफी, व्याजदर माफी, परतफेड अवधी वाढ ईत्यादी.

Pik Karj योजनेबाबत माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

पिक कर्ज
Adv