Tukde Bandi Act तुकडे बंदी रद्द ? औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

1
9238

राज्य सरकारव्दारे 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी Tukde Bandi Act संदर्भात परिपत्रक Paripatrak काढण्यात आले होते

त्या अनुषंगाने एन.ए. NA म्हणजेच अकृषीक केलेल्या जमीनी Akrushak Jamini वगळता इतर जमीनींचे  तुकडे Tukde पाडुन त्या तुकड्यांची

विक्री करून रजिस्ट्री Registry म्हणजेच दस्त नोंदणी Dast Nondani करणे बंद झालेले आहे.

यामुळे एन.ए. NA नसलेल्या जमीनींचे तुकडे Jaminichay Tukde पाडुन व्यवहार हे मुद्रांक म्हणजेच बॉण्ड Bond वरती केल्या जाऊ लागले.

औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय Tukde Bandi Act बाबत

वरील संर्व बाबींच्या अनुषंगाने औरंगाबाद येथील एका प्लॉटिंग व्यावसाईकाला त्यांनी विकलेल्या प्लॉट

तसेच रो हाऊसेसच्या रजिस्ट्री Registry बाबत समस्या निर्माण झाल्या होत्या,

संबधीताला 12 जुलै 2021 चे शासन परिपत्रक 12 July 2021 Paripatrak व नियमानुसार जिल्हाधिकारी

यांच्याकडुन “ना हरकत प्रमाणपत्र” NOC आणल्याशिवाय रजिस्ट्री Registry करता येणार नाही

असे दुय्यम निबंधक कार्यालयाकडून Government Registry & Stamp Duty Office सांगण्यात आले होते,

या बाबत संबधीत प्लॉटिंग Plotting  व्यावसाईक यांनी माननीय औरगाबाद खंडपीठामधे

Bombay High Court Aurangabad Bench याचिका Petition दाखल करून दाद मागितली होती,

या याचीकेवरती माननीय औरंगाबाद खंडपीठाने आपला निकाल दिला असून

“शासनाचे 12 जुलै 2021 चे तुकडेबंदी बाबतचे परिपत्रक (12 July 2021 Tukde Bandi Paripatrak) तसेच

महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम क्रमांक 44 (1) (ई) (Maharashtra Nondani Niyam 1961, Rule No. 44 (1) (E)

हे माननीय औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आपल्या आदेशानुसार रद्द केले आहे”

संबधीत परीपत्रक व Tukde Bandi Act पिडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा

Tukde Bandi Paripatrak तुकडे बंदी परीपत्रक 12 जुलै 2021Download PDF
गावठाण लगतच्या  200 मिटर आतील जमीनीबाबत परिपत्रक दि.13 एप्रिल 2022Download PDF
महाराष्ट्र नोंदणी नियम 1961Download PDF  
तुकडे बंदी कायदा 1947 (दिनांक 1 नोव्हेंबर 2006 पर्यंत सुधारलेला)Download PDF
तुकडे बंदी कायदा व संबधीत परिपत्रके

Tukde Bandi Act तुकडे बंधी कायदा रद्द झाला नाही

तुकडे बंधी कायदा 1961 Tukde Bandi Kayda 1961 हा संपूर्ण रद्द Cancel झालेला नसुन

त्यातील फक्त नियम क्रमांक 44 (1) (ई) Rule No.44(1)(E) व

या नियमाच्या अनुषगांने तुकडे बंधी कायद्याचे उल्लघन करणारे दस्त जर दस्त नोंदणी कार्यालय Duyyam Nibandhak Office कडे आले

तर दस्त नोंदणी करू नका याबाबतचे शासनाचे 12 जुलै 2021 चे परिपत्रक 12 July 2021 Tukde Bandi Nondani Paripatrak फक्त रद्द करण्यात आलेले आहे.

केंद्र सरकारच्या कायद्याशी विसंगत

महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 मधील नियम क्रमांक 44 (1) (ई)  Maharashtra Nondani Niyam 1961 Rule No. 44 (1) (E) हा

केंद्र सरकारच्या कायद्यासोबत विसंगत होता,

राज्य सरकारला केंद्र सरकारच्या कायद्याच्या विसंगत कायदे करता येत नाही,

तसेच या नियमाआधारेच 12 जुलै 2021 चे परिपत्रक 12 July 2021 Tukde Bandi Nondani Paripatrak काढण्यात आलेले होते.

यामुळे माननीय औरंगाबाद खंडपीठ Aurangabad Khandpith ने ते परिपत्रक Paripatrak सुध्दा रद्द Cancel केले.

आता नोंदणी अशी होणार

आता रजिस्ट्री कार्यालयात Registry Office सब रजिस्टारला फक्त केंद्र सरकारच्या  “द इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट” “The Indian Registration Act”  

मधील सेक्शन 34 आणि 35 Section 34, Section 35 या अंतर्गत नियमानुसारच दस्त नोंदणी Deed Registraion करावी लागणार आहे.

यामधे दस्त नोंदणी Deed Registration करण्याकरीता येणाऱ्या व्यक्तिंची फक्त ओळख तपासावी लागणार आहे Identity Verification,

कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र Non Objection Certificate तपासता येणार नाही,

संबधीत दस्तातील Registry कोणत्याही कायद्यासोबत विसंगत असलेली बाब तपासता येणार नाही.

तुकडे बंदी असलेल्या व्यवहारांची सुध्दा नोंदणी होणार

तुम्ही तुकडे बंदी Tukde Bandi Act कायद्याचे Act उल्लघन करणारे दस्त जरी सब रजिस्टारकडे Sub Registrar  

नोंदणी Nondani करिता घेवुन गेलात तरी त्यांना त्याची नोंदणी Nondani म्हणजेच रजिस्ट्री Registry हि करावी लागणार आहे.

कारण त्या दस्तातील एखाद्या कायद्याशी विसंगत बाब तपासण्याचा हंक्क सेक्शन 34 व 35 (Section 34, Section 35) नुसार

सब रजिस्टारकडे Sub Registrar नाही.

कारण महाराष्ट्र शासनाचा नियम 44 (1) (ई) Maharashtra Government Rule 44 (1) (E) हा

केंद्र शासनाच्या कायद्याशी Central Government Act  विसंगत असल्यामुळे माननीय औरंगाबाद खंडपीठाने Aurangabad Khandpith आता रद्द Cancel ठरविलेला आहे.

दस्त नोंदणी होणार मात्र 7/12 ला नाव लागणार नाही

या सर्व गोष्टींचा एकुण सार असा आहे ‍कि तुकडे बंदी Tukde Bandi Act संपूर्ण कायदा रद्द Cancel झालेला नाहि,

म्हणजेच शेत जमीनीचे Shet Jamin तुकडे Tukde पाडून विक्री Sale करता येणार नाही,

म्हणजेच काय तर अश्या जमीनीची रजिस्ट्री तर होईल मात्र तुम्ही दस्त नोंदणीचे खरेदी खत Registry व इन्डेक्स 2 Index 2 घेवुन

तलाठ्याकडे Talathi सातबारा 7/12 वरती फेरफार Ferfar घेण्याकरीता गेलात तर महसुल विभागाचे अधिकारी

Revinue Department Officers  तुम्हाला सातबारा 7/12 वरती तुमच्या नावाची नोंद Nond घेण्यास स्पष्ट नकार देतील,

कारण खरेदी विक्रीची दस्त नोंदणी जरी मानणीय औरंगाबाद खंडपीठाने Aurangabad Khandpith दिलेल्या

आदेशाच्या अनुषंगाने झालेली असली तरी तुकडे बंदी कायद्यानुसार Tukde Bandi Act संबधीत खरेदी विक्री Sale Purchase अवैध ठरते.

म्हणजेच मित्रांनो सरळ सोप्या शब्दात सांगायच म्हणजे तुकड्यामधे जमीनीच्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी

म्हणजे रजिस्ट्री आता तुम्हाला करता येईल मात्र खरेदीदाराचे नाव सातबारा उताऱ्यावरती लागणार नाही.

अश्या जमीनीवरती बांधकाम Construction करायचे असेल तर कोणत्याही सरकारी विभागाकडून

Government Department कोणत्याही परवाणग्या Permission & Non Objection Certificate (NOC) मिळणार नाही.

गावठाण लगतच्या 200 मिटर आतील जमीनी Tukde Bandi Act

गावठाण जवळील 200 मिटरच्या आतील शेतजमीनींना मात्र वरील आदेश लागू होणार नसुन

अश्या जमीनीच्या तुकड्यांची खरेदी विक्री होऊ शकते तसेच 7/12 उताऱ्यावरती फेरफार घेऊन खरेदीदाराचे नाव लावता येते.

मात्र गावठाण लगतच्या 200 मिटर सोडुन व एन.ए. NA केलेल्या जमीनी सोडून इतर सर्व शेतजमीनीकरीता वरील कोर्टाचा आदेश हा लागू होतो.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

Tukde Bandi Aurangabad Court

Adv