Pik Karj 2022 अर्ज, लिंक, कागदपत्र, व्याजदर

1
5362

शेतकऱ्यांना शेती पीकांच्या लागवडीपुर्वी खते, बियाणे, व यंत्र खरेदी करण्याकरीता पैसे उपलब्ध व्हावे याकरीता शासनातर्फे Pik Karj 2022 पीक कर्ज 2022 योजना राबविल्या जात आहे.

वर्षातुन रंब्बी तसेच खरीप हंगामाकरीता पीक कर्ज चे वितरण केल्या जाते.

अत्यंल्प व्याजदर आकारल्या जात असल्या कारणाने शेतकऱ्यांचा पीक कर्ज घेण्याकडे कल जास्त असलेला दिसतो.

कोरोना कालावधीच्या काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्याकरीता प्रत्यक्ष बँकेत

जाऊन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला पर्याय म्हणून ऑनलाईन पध्दतीने

पीक कर्जा करीता अर्ज सादर करण्याचा पर्याय बऱ्याच जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला होता.

Pik Karj 2022
Pik Karj 2022

पीक कर्जाकरीता अर्ज सादर करण्याकरीता बँकेकडे होणारी शेतकऱ्यांची गर्दी टाळण्याकरीता

तसेच शेतकऱ्यांचा तासन तास बँकेच्या रांगेत वेळेचा अपव्यय टाळण्याकरीता

आता 2022 या वर्षाकरीता सुध्दा बऱ्याच जिल्ह्यांकरीता ऑनलाईन Online पध्दतीने पीक कर्ज Pik Karj करीता Pik Karj Online Applicatin From अर्जाची स्विकृत करण्यात येत आहे.

प्राथमिक स्वरूपाची माहिती ऑनलाईन अर्जाव्दारे शेतकऱ्यांनी सादर केल्यानंतर संबधीत माहिती बँकेला ऑनलाईन प्राप्त होणार आहे,

बँकेव्दारे माहिती तपासून संबधीत शेतकरी कर्जा मिळवीण्याकरीता पात्र किंवा अपात्र ठरविल्या जाणार आहे.

परभणी जिल्ह्याकरीता ऑनलाईन पीक कर्ज 2022 मागणी अर्ज करण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा

https://croploan.codedynamis.com/role_farmer/loanform.php

टिप.इतर जिल्ह्यांच्या पीक कर्ज ऑनलाईन लिंक जस जश्या उपलब्ध होतील तसतश्या खालील टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध करून देण्यात येतील.

https://telegram.me/Tech_With_Rahul

Pik Karj 2022 ( पीक कर्ज 2022) अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा

पीक कर्ज अर्ज नमुना Pik Karj 2022 नमुना

Crop Loan Application Form 2022

Pik Karj Arj 2022
Crop Loan Application Form 2022

नवीन पीक कर्ज Pik Karj 2022 कागदपत्र Documents

Crop Loan Required Documents

  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा (एकुण जमीनीचा दाखला)
  • जमीनीचा नकाशा
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • स्टॅम्प ( काहि बँका करीता आवश्यक)
  • अर्जदारोचे 3 फोटो
  • फेरफार उतारा
  • जमीनीचे मुल्यांकपन पत्र (काही बँका करीता आवश्यक)
  • सर्च रिपोर्ट (काही बँका करीता आवश्यक)

पीक कर्ज नुतनीकरण कागदपत्र Pik Karj Documents

Renewal Crop Loan Documents

पीक कर्ज व्याजदर इतके असणार

अ.क्र.राज्य शासन निर्णय दिनांककर्ज मर्यादा रक्कमराज्य शासन व्याज दर सवलत %केंद्र शासन व्याज दर सवलत %एकुण व्याज दर सवलत %शेतकऱ्यांना उपलब्ध परिणामकारक व्याजदर %
12345(4+5) 
203/12/2021रू. 1.00 लाख पर्यंत3%3%6%0%
303/12/2021रू. 1.00 ते रू. 3.00 लाख पर्यंत1%3%4%2%
Crop Loan Interest Rate 2022

सातारा, पुणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमाणे शुन्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटप आता संपर्ण राज्यभरात करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना आता चालु वर्षाकरीता तीन लाखापर्यंन्तचे पीक कर्ज हे शून्य टक्के इतक्या व्याजदराने मिळू शकणार आहे.  तीन लाखापर्यंन्तचे पीक कर्ज वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार 31 मार्चच्या आत (बहुतेक बँकाच्या नियमानुसार 12 महिन्याच्या आत) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याजात सूट दिल्या जाते. याकरीता तीन लाख व तीन लाखाच्या आतील कर्ज मर्यादा आहे.

महाराष्ट्र राज्यातील पीक कर्जावरील व्याजाचा दर हा दर साल दर शेकडा 6% इतक्या प्रमाणात आहे. व्याज दरातील दिल्या जाणाऱ्या सवलतीमधील सुधारणेमुळे आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंन्तच्या अल्प मुदत पीक कर्जाची मुदतीत परतफेड केल्यास 1 % इतके व्याजात सवलत देण्यात येते सोबतच आता आणखी 2% व्याज सवलत वाढवून देण्यात येणार आहे म्हणजेच एकुण 3 % व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

पीक कर्ज व्याजदाराबाबतचा शासनाचा जि.आर. डाऊलोड करण्याकरीता येथे क्लिक करा

केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणारी सवलत

केंद्र शासनामार्फत पीक कर्जाच्या व्याजदरावरती 3% इतकी व्याज सवलत दिल्या जाते.

म्हणजेच तीन लाखापर्यन्तच्या घेतलेल्या कर्जावरती बँक 6 % आकारत असलेले व्याज आता 3% राज्याची सवलत व 3% केंद्राची सवलत यामुळे शुन्य % व्याजदराने उपलब्ध होणार आहे.

या बँकाकडून मिळते शेतकऱ्यांना पीक कर्ज

शेतकऱ्यांना विविध सरकारी तसेच खाजगी बँकाव्दारे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँक, सरकारी राष्‍ट्रीयकृत बँका, तसेच खाजगी बँका यांच्या व्दारे पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येते मात्र संबधीत बँकेचा शेतकरी खातेदार असावा लागतो. तसेच आता बँक निहाय गावे काहि ठिकाणी बँकांना दत्तक दिलेले आहेत. त्या त्या गावांकरीता पीक कर्जाकरीता बँक ठरवून दिलेली आहे.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा www.youtube.com/techwithrahul

पीक कर्ज ऑनलाईन अर्ज कसा भरावा माहिती करीता खालील व्हिडीओ पहावा

Pik Karj Online Arj 2022 Kasa Bharawa Mahiti
Adv