Ferfar Nondani जमिनीची फेरफार नोंदणी

2
3453

Ferfar Nondani फेरफार नोंदणी बाबत माहिती

Ferfar Nondani जमीनीच्या हंक्क बदला बाबत तलाठ्याला अर्ज मिळाल्यानंतर अथवा वरीष्ठ महसूल अधिकारी,

नोंदणी अधिकारी किंवा न्यायालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या “अ” पत्रकाची नोंद तात्काळ तलाठ्यांना Ferfar Nondani नोंदवही

म्हणजेच गाव नमुना क्रमांक 06 ड वरती घ्यावी लागते व त्याची प्रत ई चावडी वर प्रकाशीत करणे बंधनकारक आहे.

त्याच सोबत पारंपारीक चावडीवरतीसुध्दा त्याची ठळक प्रत चिकटवणे बंधनकारक आहे.

त्यासाठी सर्व संबंधितांना नोटिसा देणे तलाठ्याला बंधनकारक आहे.

Ferfar Nondani
Ferfar Nondani

वादग्रस्त प्रकरणातल्या Ferfar Nondani नोंदीची पध्दत

  • मालकी हक्क हस्तांतरणाबाबत फेरफार मध्ये ज्यांचा संबध येत असेल व त्यांना जर Ferfar Nondani
  • नोंदीवर हरकत असेल तर ते तोंडी अथवा
  • लेखी स्वरूपात हरकत घेऊ शकतात. वादग्रस्त नोंदी या वेगळ्या नोंदवहीत ठेवणे तलाठ्याला बंधनकारक आहे तसेच
  • अशा स्वरूपातील प्राप्त हरकतीस तात्काळ पोच देणे सुध्दा बंधनकारक आहे.
  • वादग्रस्त प्रकरणात म्हणजेच ज्या प्रकरणात हरकत प्राप्त झाल्या आहेत अशा प्रकरणात संबंधीत अधिकाऱ्याने अथवा
  • भूमापन अधिकाऱ्याने सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यायचा असतो.
  • वादग्रस्त फेरफारची नोंद फेरफार वहीत संबंधित नोंदी पुढे दिलेल्या निर्णयाचा उल्लेख करून नोंद कायम
  • अथवा हरकत ग्राह्य असेल तर नोंद रद्द करावयाची असते.
  • नोंद प्रमाणित झाल्यानंतरच त्याची नोंद गाव नमुना क्र. 07 म्हणजे सात-बारा उताऱ्यामंधील नमुन नंबर 07 वरती घेतली जाते.
  • नमुना क्रमांक 07 मंध्ये आळे करून जुन्या हक्कधारकाच्या नावावर कंस करून नवीन हक्कधारकाचे नाव हक्क तपशिलासह नोंदविले जाते.

Ferfar Nondani नोंदीबाबत कोणती दक्षता घेणे आवश्यक आहे

  1. तलाठ्यास गाव नमुना क्रमांक 06 ड वरती हक्क नोंद घेण्याशिवाय कोणताही इतर अधिकार नाहि,
  2. फेरफार नोंदवही वरती नोंद करणे हि प्राथमिक सुरूवात आहे.
  3. सदर फेरफार नोंदवहीत नोंद घेतल्याची नोटीस गावच्या चावडीवर व आता नवीन स्वरूपातील ई चावडीवर लावणे
  4. महसूल कायदा कलम 150 (2) नुसार आवश्यक करण्यात आलेले आहे. सदर फेरफार नोंदी मंडळ अधिकाऱ्याकडून तपासल्या जातात.
  5. मंडळ अधिकारी त्यासंबंधीचे सादर केलेले दस्त व विविध आदेशांची खात्री करून घेतात. आवश्यकता भासल्यास चौकशी सुध्दा करतात.
  6. महसूल अभिलेख नोंदवह्या सुस्थितील ठेवणे ही जबाबदारी नियमावली 1971, मधील नियम क्रमांक 5 (3) नुसार मंडळ अधिकाऱ्याची असते.
  7. फेरफार नोंदवहीतील नोंदी मधे कोणतीही खाडाखोड ग्राह्य धरली जात नाही तरीसुध्दा खाडाखोड झाल्यास
  8. मंडळ अधिकारी खाडाखोड बाबत सही करून प्रमाणित करतो. असे मंडळ अधिकाऱ्याला करणे
  9. महसूल नियमावली नियम क्रमांक 5 (5) नुसार आवश्यक आहे.
Adv