सलोखा योजना अर्ज, माहिती, फि Salokha Yojana Mahiti, Arj, Fees

0
2610

salokha yojana महाराष्ट्रात शेतीबाबत Sheti babad अनेक ठिकाणी विवाद पहायला मिळतात,

विवाद कमी करण्याच्या हेतूने शासनाने सलोखा योजना Salokha Yojana आणली असून

या योजनेव्दारे शेतकऱ्यांना आपल्या शेतीबाबतचे विवाद Shetichay Viwad सोडवीण्याकरीता मदत होणार आहे

या योजनेबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.

salokha yojana
salokha yojana
योजनेचे नावसलोखा योजना Salokha Yojana
राज्यमहाराष्ट्र
शासनाचा विभागमहसूल व वन विभाग Mahasool Van Vibhag
योजनेचे सुरूवात वर्ष2023
लाभार्थीशेतकरी Farmer
salokha yojana

शासनाचा जि.आर. (सलोखा योजनेबाबत) डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा

सलोखा योजना माहिती Salokha Yojana Mahiti

महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची jaminichay wad कोट्यवधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे malki hakka वाद, शेत बांधावरुन होणारे वाद, shet bandhachay wad जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद,

jaminicha taba रस्त्याचे वाद, rastyachay wad शेत जमीन मोजणीवरुन होणारे वाद, shet jamin mojani

अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद, abhilekh durusti शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे वाद,

shetivaril atikraman शेती वहीवाटीचे वाद, sheti vahiwat भावा- भावांतील वाटणीचे वाद,

शासकिय योजेनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणांमुळे शेतजमीनीचे वाद समाजामध्ये आहेत.

शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत.

शेतजमिन shet jamin हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय असल्यामुळे त्यातील वादांमुळे

कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे.

सदर वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून, आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत

असून अशा प्रकारचे वाद संपुष्ठात येण्यामध्ये म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाही.

सदर वाद संपुष्ठात येवून समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य,

शांतता व सौहार्द वाढीस लागावे यासाठी शासनाने अशा एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा

shetjaminicha taba दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा

पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे shet jamin dharak अदलाबदल दस्तांसाठी

नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याची “सलोखा योजना” “Salokha Yojana” राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र शासनाने सलोखा योजनेबाबत घेतलेला शासन निर्णय:- Salokha Yojana Maharashtra Government Decision

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये

सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील

शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे

असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.1000/- व नोंदणी फी नाममात्र रु.1000/- आकारण्याबाबत

सवलत देण्याची “सलोखा योजना” राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

1) सलोखा योजनेच्या अटी व शर्ती :- Salokha Yojana Term and Condition

salokha yojana योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत.

1. सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी Nondani Fees व मुद्रांक शुल्कामध्ये

Mudrank Shulka सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील.

2. सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या

शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असला पाहिजे.

3. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा

Panchanama मंडळ अधिकारी Manadal Adhikari व तलाठी Talathi यांनी विहित पंचनामा

नोंदवहीमध्ये केला पाहिजे व सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा

प्रमाणपत्र Panchanama Pramanpatra शेतकऱ्यांना दिले पाहिजे.अदलाबदल दस्त Dast Nondati नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडला पाहिजे.

4. सलोखा योजनेंतर्गत Salokha Yojana दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र,

भोगवटादार वर्ग Bhogwatadar Varg / सत्ताप्रकार, पुनर्वसन / आदिवासी Adivasi / कूळ Kul इ. सर्व बाबी विचारात घेऊन

दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ठ करणे आवश्यक आहे.

5. पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या

शेतकऱ्याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तीक जमिनींचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत

समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क Mudrank Shulk व नोंदणी फी Nondani Fees सवलतीस पात्र असणार नाही.

6. सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या

दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.

7. अकृषिक Non Agriculture, रहिवासी Resident तसेच वाणिज्यिक Commercial वापराच्या जमिनीस Jamin सदर योजना लागू असणार नाही.

8. सलोखा योजना अंमलात येण्यापुर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदला-बदल केली असेल किंवा अदलाबदल

दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.

9. सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच – तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणित

गट बुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील.

2) सलोखा योजनेमुळे शासन, शेतकरी व समाजाचे होणारे फायदे:- Benefits of Salokha Scheme Government, Farmer, Society

प्रस्तुत सलोखा योजनेचे फायदे व योजना न राबविल्यामुळे होणारे तोटे याबाबत सविस्तर माहिती सोबतचे परिशिष्ठ – अ येथे नमूद केली आहे.

3) सलोखा योजनेच्या salokha yojana लाभासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती:-

Salokha Yojana Certificate Talathi, Mandal Adhikari

1.  तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गावातील पंचासह चौकशी करुन किंवा चतुर्सिमा Chatursima धारकांशी चर्चा

करुन किंवा तलाठी चावडीमध्ये Chawadi चर्चा करुन किंवा अदलाबदल करु इच्छिणाऱ्या

शेतकऱ्यांचे किंवा चतुर्सिमा Chatursima धारकांच्या घरी चर्चा करुन सदर ठिकाणी पहिल्याची मालकी असलेली जमीन

किमान 12 वर्षापासून दुसऱ्याचे ताब्यात आहे किंवा कसे ? व दुसऱ्याची मालकी असलेली जमीन

किमान 12 वर्षापासून पहिल्याचे ताब्यात आहे किंवा कसे ? याबाबतची नोंद विहित नमुन्यातील पंचनामा नोंदवहीमध्ये करावी.

त्याआधारे तलाठी यांनी पक्षकारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र Pnachanama Pramanpatra द्यावे.

2. एकूण चतुर्सिमा धारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असणाऱ्या कमीत कमी दोन वेगवेगळ्या गटातील)

सज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनामा नोंदवहीमध्ये असाव्यात. एखाद्या गटाला चतुर्सिमा धारक एकच गट असेल तर त्या चतुर्सिमाधारकाची सही पंचनाम्यावर असावी.

3. काही वेळा फार मोठा गट असून त्याचे वाटप व अनेक पोटहिस्से Jaminichay Pothissa झालेले असतात.

परंतु फाळणीबारा / पोटहिस्सा झालेला नसतो. अशा वेळी प्रत्यक्ष स्थळपाहणी Sthalpahani करुनच पंचनामा करावा.

त्यावेळी शेजारचे वहिवाटदार vahiwatdar असलेले दोन सज्ञान खातेदारांची पंचनामा नोंदवहीवर सही आवश्यक राहील.

4. तलाठी यांनी गावस्तरावर सलोखा योजनेसाठी खालील नमून्यात पंचनाम्याचे एक रजिस्टर ( नोंदवही) ठेवावे व त्या

नोंदवहीवरुन तलाठी यांनी पक्षकारांना पंचनाम्याची प्रमाणित प्रत द्यावी. पंचनामा नोंदवही नमुना बाबतचे परिशिष्ट- ब सोबत जोडले आहे.

4.  सलोखा योजनेच्या सामाजिक परिणाम व अपेक्षित प्रतिसादाबाबतचे परिशिष्ट-क सोबत जोडले आहे.

5.  सलोखा योजनेच्या अनुषंगाने वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे याबाबतचे परिशिष्ट-ड सोबत जोडले आहे.

6.  उपविभागीय अधिकारी यांनी “सलोखा योजना” यशस्वी होण्यासाठी मुलतः प्रयत्न करावेत व दर पंधरा दिवसांनी सदर योजनेचा तलाठी,

मंडळ अधिकारी, पोलीस पाटील police patil व गाव तंटामुक्ती समिती gav tantamukti samiti यांचेबरोबर चर्चा करून गावनिहाय आढावा घेण्यात यावा.

सलोखा योजनेममुळे समाज, शासन व शेतकऱ्यांचे होणारे फायदे व तोटे नुकसान परिशिष्ट अ salokha Yojana parishistha a
yojana mahiti
scheme information
yojana
8 सलोखा योजनेसाठी पंचनामा नोंदवही परिशिष्ट ब salokha yojana panchanama nondavahi
सलोखा योजनेचे सामाजिक परिणाम (Social Impact) परिशिष्ट क salokha yojana social impact
salokha yojana sarvy number, shetkari sankya

शेतकऱ्यांकडून सलोखा योजनेबाबत अपेक्षित प्रतिसाद :- Farmer Responses about salokha Yojana

सदर योजनेतील विषय हा शेतकरी समाजाच्या जिवनातील अत्यंत नाजुक, संवेदनशील व जिव्हाळ्याचा असून

याबाबतची फलनिश्चिती होण्यास सामाजिक समजुतदारपणा, संयम, मनोधैर्य, विश्वासार्हता, साहस, तडजोड वृत्ती व व्यवहार्यता महत्त्वाची असणार आहे.

तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बाधित व्यक्तींची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार आहे.

एवढेच नव्हे तर इतर समाज व संस्था (उदा. गाव तंटामुक्ती समिती) Gav Tantamukti Samiti यांची भुमिकाही मोलाची ठरणार आहे.

अर्थात या योजनेनुसार गावातील एक प्रकरण जरी मार्गी लागले तरी सामाजिक सौख्य, सलोखा व सौहार्द निश्चितच वाढणार आहे.

परिशिष्ट- ड

सलोखा योजनेबाबत salokha yojana वारंवार विचारले जाणारे प्रश्न

A

प्रश्न:- सलोखा योजनेमध्ये जमिनीवर १२ वर्षापेक्षा कमी कालावधीकरीता एकमेकांचा ताबा असल्यास त्यांचे

अदलाबदल दस्तास मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफ असेल काय ?

उत्तर:- नाही.

प्रश्न:- सलोखा योजनेंतर्गत अकृषिक जमिन, प्लॉट, घर किंवा दुकान यांचे अदलाबदल दस्त करता येईल काय ?

उत्तर:- नाही. सदर योजना फक्त शेतजमिनीसाठी shet jamin लागू आहे.

प्रश्न:- सलोखा योजनेमध्ये पंचनाम्याच्या वेळी किती सीमाधारक / चतु: सिंमाधारक यांची उपस्थिती व एकमेकांच्या

ताब्याबाबत कबुलीजबाब / संमती स्वाक्षरी आवश्यक आहे ?

उत्तर:- कमीत कमी दोन सज्ञान व्यक्ती की, ज्या दोन वेगवेगळया गट नंबर / सव्र्व्हे नंबर मधील अदलाबदल करणारांचे चतुः सिंमाधारक आहेत,

त्यांची पंचनामा नोंदवहीमध्ये संमती स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी स्वाक्षरी असलेला पंचनामा ग्राह्य धरला जाणार नाही.

टीप:- ज्या गट / सर्व्हे नंबरला एकच गट / सर्व्हे किंवा ज्याचे अदलाबदल होणार तोच गट चतु: सिंमाधारक आहे.

तेथे चतु:सिमेवर असणारा एकच सज्ञान वहिवाटदार यांची स्वाक्षरी पंचनाम्यावर आवश्यक आहे.

4. प्रश्न:- सलोखा योजनेवरील तलाठी व मंडळ अधिकारी यापैकी पंचनाम्यासाठी कुणाकडे अर्ज करणे आवश्यक आहे ?

उत्तर:- सदर गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

सलोखा योजना Salokha Yojana अर्ज, कागदपत्रे, फी, अटी, अतिक्रमण, पोट हिस्सा वाद, बांध कोरणे, गट अदलाबदली, वर्ग 2 जमीन, मोजणी,

उत्तर:- होय.

B

6. प्रश्न:- सलोखा योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात पंचनामा करणे आवश्यक आहे ?

उत्तर:- अर्ज केल्यापासून सर्वसाधारणपणे १५ कार्यालयीन दिवसांमध्ये पंचनामा होणे आवश्यक आहे.

7. प्रश्न:- अर्ज करुन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दाद न दिल्याने कोणाकडे दाद मागावी लागेल ?

उत्तर:- तहसिलदार यांनी दाद न दिल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागावी.

8.  प्रश्न:- सलोखा योजनेंतर्गत काही लोक कदाचित शासनाची फसवणूक करतील. त्यांना आवर कसा घालणार ?

उत्तर:- सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीची ताब्याबाबत स्थानिक चौकशी करुन पंचानामा करण्यात येणार असल्याने,

शिवाय दस्त निष्पादन हे ऐच्छीक असून त्यावेळी जमीन मालक स्वतः नोंदणीसाठी हजर राहणार असल्याने अशी फसवेगिरी होण्याची शक्यता नाही.

तथापि, तसे आढळल्यास संबंधित व्यक्तींकडून मुद्रांक शुल्काची दंडासह वसूली केली जाईल.

शिवाय सदर व्यक्ती खोट्या कथनामुळे संवैधानिक तरतुदीनुसार फौजदारी कारवाहीस पात्र राहील.

9. प्रश्न:- सलोखा योजनेंतर्गत दस्त नोंदणीकृत करताना एखाद्या खातेदाराने असंमती दाखविल्यास दस्त नोंदणी करता येईल काय ?

उत्तर:- नाही. दोन्ही सर्व्हे नंबर / गटातील सर्व सहधारक यांची दस्त नोंदणीस संमती असल्याशिवाय अशी अदलाबदल नोंदणीकृत होणार नाही.

10.  प्रश्न:- पंचनामा रजिस्टरमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी किती जणांची सही लागेल ?

उत्तर:- दोघांची सही आवश्यक आहे.

टिप:- एकदा पंचनामा रजिस्टरवर सही झाल्यावर फक्त तलाठी त्यांच्या सहीने सदर रजिस्टरमधून पंचनाम्याची प्रमाणित प्रत अर्जदारास देतील.

सदर प्रत अदलाबदल दस्तासाठी पुरावा म्हणून ग्राह्य असेल.

11.  प्रश्न:- सलोखा योजनेंतर्गत दस्ताची नोंदणी झाल्यानंतर दोन्हीही पक्षकारांनी नंतर वादामुळे सदर दस्त रद्द करावयाचा

झाल्यास त्यांना सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीचा फायदा मिळेल किंवा कसे ?

उत्तर:- नाही. त्यांना कायद्यानुसार दस्त रद्द करण्याबाबत कायदेशीर पध्दतीनुसार

सर्वसंमती असेल तरच आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरुन दस्त रद्द करता येईल.

c

12.  प्रश्न:- सलोखा योजनेमध्ये पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांचेकडे अर्ज करताना कोणकोणते कागदपत्र सादर करावे लागतील ?

उत्तर:- फक्त साधा अर्ज व त्यात दोन्ही सर्व्हे / गट नंबरचा व चतु:सिमा सर्व्हे/गट नंबरचा उल्लेख आवश्यक आहे.

13.  प्रश्न:- सलोखा योजनेनुसार दुय्यम निबंधक यांचेकडे आदलाबदल दस्त नोंदणी वेळी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ?

उत्तर:- सलोखा योजनेंतर्गत नेहमीप्रमाणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अदला-बदल दस्त नोंदणीवेळी मुद्रांक व नोंदणी फी माफी साठी विहित नमुन्यातील तलाठी यांचा जावक क्रमांकासह

पंचनामा जोडणे आवश्यक राहील तसेच सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील

सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग / सत्ताप्रकार, पुनर्वसन / आदिवासी / कूळ इ. सर्व बाबी विचारात घेऊन

दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे. अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ठ करणे आवश्यक आहे.

14.  प्रश्न:- अर्जावर दोन्ही अदलाबदल दस्त करु इच्छिणाऱ्या खातेदारांपैकी कमीत कमी किती जणांची स्वाक्षरी आवश्यक आहे ?

उत्तर:- कोणत्याही एका सज्ञान खातेदाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

15.  प्रश्न:- गावातील तंटामुक्त समिती व उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांची सलोखा योजनेत काय भुमिका असेल ?

उत्तर:- क्षुल्लक कारणांवरुन मिटत असलेला वाद जर वाढत असेल तर दोन्ही पक्षकार तंटामुक्ती समितीची

किंवा अन्य कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची मदत घेऊ शकतात किंवा गावातील वाद मिटत असतील तर या

योजनेसंबंधाने तंटामुक्ती समिती स्वतःहून पक्षकारांना संपर्क करुन संपूर्ण गावातील अशा प्रकारचे वाद मिटवण्याच्या

दृष्टीने कोणावर अन्याय होणार नाही याबाबत चर्चा विनिमय करून प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करतील.

जेणेकरून भविष्यात पक्षकारांचे वाद संपुष्टात येऊन गावात सलोखा, सौहार्द व शांतता कायम राहील.

शासन निर्णयानुसार सदर सलोखा योजना यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी मुलभूत प्रयत्न करावयाचे आहेत.

शेतजमीनीच्या परस्परविरोधी ताबे व मालकीबाबतच्या प्रकरणांचा त्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी,

पोलीस पाटील व गाव तंटामुक्ती समिती यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधावा.

तसेच दर पंधरा दिवसांनी योजनेच्या फलनिष्पत्तीबाबत व्यक्तिशः आढावा घ्यावा.

अदलाबदल दस्ताव्दारे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून गावातील सामाजिक सलोखा, सौहार्द व शांतता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

D

16.  प्रश्न:- तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पंचानाम्यासाठी प्रत्यक्ष दोन्ही सर्व्हे नंबरचे ठिकाणी जाणे अत्यावश्यक आहे काय ?

उत्तर:- होय.

17.  प्रश्न:- तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांपैकी पंचनामा रजिस्टरवर एकाचीच सही चालेल काय ?

उत्तर:- नाही. पंचनामा रजिस्टरवर दोघांचीही सही लागेल.

18.  प्रश्न:- मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागातील इतर योजनांना कमी कालावधी असतो. येथे मात्र दोन वर्षाचा कालावधी देण्याचे प्रयोजन काय ?

उत्तर:- ही योजना समाजातील अत्यंत संवेदनशिल विषय असलेल्या जमीनीच्या मालकीचा परस्पर विरोधी ताबा याचेशी निगडीत आहे.

सदर ताब्याबाबत पिढ्यांपिढ्याचा वाद असल्याने अदलाबदल दस्त करण्यासाठी दोन्ही बाजूंचा संयम, मनोधैर्य, विश्वासार्हता,

सामंजस्य, साहस व तडजोड वृत्ती इ. गुणांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पक्षकार यांची मने वळवणे व

दस्त नोंदणीसाठी एकमत होणे ह्या गोष्टीला वेळ लागणार असल्याने यासाठी दोन वर्ष मुदत ठेवलेली आहे.

19.  प्रश्न:- पंचनामा नोंदवहीमध्ये चतुः सिंमाधारकांची सही आहे. परंतु, अदलाबदल करणारे पक्षकार यांची सही आवश्यक आहे काय ?

उत्तर:- आवश्यकता नाही. परंतु, ते हजर असतील तर सही करु शकतात. पक्षकारांची सही आवश्यक नाही.

कारण त्यांचेपैकी एकाने अर्ज केला म्हणूनच पंचनामा होणार आहे.

शिवाय अदला-बदल दस्त नोंदणीवेळी सर्व पक्षकारांची संमती असल्याशिवाय दस्त नोंदविला जाणार नाही.

20.  प्रश्न:- सलोखा योजनेमधील अदलाबदल होणारी जमीन ही वर्ग दोन प्रकारची असली व तिला सध्या संगणकीय

प्रणालीमध्ये तहसिलदार यांचे लॉक असेल तर तलाठी पंचनामा “परिशिष्ठ ब” झाल्यानंतर सदर दस्तनोंदणीवेळी तहसिलदार

यांनी सदर प्रणाली दस्त नोंदणी साठी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे काय ?

उत्तर:- होय. सामाजिक सुधारणा योजनेअंतर्गत तलाठी यांनी पंचनामा रजिष्टरवरुन “परिशिष्ठ ब” दिले असल्यास अदलाबदल

दस्त नोंदणीसाठी तहसिलदार संगणकीय प्रणाली खुली करुन देतील.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv