Jaminicha Bandh जमिनीचा बांध व कायद्याबाबत माहिती
भारतामंध्ये जमिनींची मोजणी हि सर्वप्रथम ब्रिटिशांनी 1929 – 1930 मंध्ये केली होती. Jaminicha Bandh
महाराष्ट्र राज्यात त्यानंतरच्या काळात परत जमिनींची मोजणी झालेली नाही. त्यामुळे Jaminicha Bandh बाबत खुप समस्या निर्माण झालेल्या आहे.
ब्रिटिश काळात सन 1929-30 मंध्ये झालेल्या मोजणी नंतरच्या काळात कुटुंब विभक्तीकरणामुळे
तसेच जमिनीच्या हंस्तांतरण व विक्री मुळे असंख्य लहान-लहान तुकडे पडत गेले.
ब्रिटीश कालीन व त्यानंतरच्या काळात तग धरून असलेल्या जुन्या हद्दी व निशाण्या ह्या नाहिशा होत गेल्या,
आज आपल्याला Jaminicha Bandh बाबतच्या जुण्या निशाण्या क्वचीतच पहायला मिळतात.
याचाच परिणाम म्हणजे प्रत्येक गावात आज आपल्याला हद्दीबाबत असंख्य वाद विवाद होतांना दिसतात.
शासनातर्फे मात्र यावरती अजुन तरी कोणतीही उपयुक्त कारवाई किंवा हालचाल झालेली आपल्याला दिसत नाही.
महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलम 132 ते 146 मध्ये Jaminicha Bandh ठरवणे व Jaminichi Mojani करण्याबाबतच्या तरतुदी आहेत.
शेत जमिनीची हद्द आखुन हद्द ठरविणे या बाबतच्या तरतुदी 132 या कलमात आहे.
तसेच 133 या कलमात गावाच्या हद्द ठरविण्याबाबतची तरतुद आहे.
तर कलम 134 मध्ये शेताच्या हद्दी ठरविण्याबाबत तरतुदी दिलेल्या आहे.

भू-मापन करत्या वेळी जमिनीच्या किंवा धारण केलेल्या शेतजमिनीच्या हद्दीबाबत वाद नसेल आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्या अचूकपणाबद्दल खात्री दिली असेल
तर जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीने दाखवल्याप्रमाणे हद्द ठरवता येते.
मात्र हद्दीबाबत वाद असेल तर जमीन धारण करणाऱ्यास व शेजारील सर्व धारकांना योग्य ती
नोटीस देऊन भूमापक सर्वांच्या उपस्थितीत जमिनींची मोजणी करू शकतात.
त्यासाठी जमिन अभिलेख तपासणे आवश्यक ठरते व त्यानुसार भेगवटाधारक, शेजारील शेतकरी यांचेकडून
भोगवट्याची खात्री करून किंवा इतर पुरावा व माहिती उपलब्ध असेल त्याप्रमाणे Jaminicha Bandh ठरवता येते.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
- हद्द कायम जमीन मोजणी Hadd Kayam Jamin Mojani
- सलोखा योजना अर्ज, माहिती, फि Salokha Yojana Mahiti, Arj, Fees
- Tukde Bandi Act तुकडे बंदी रद्द ? औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- Money Lending License सावकारी परवाना असा काढा
- Matoshri Gram Samrudhi Shet Panand Raste Yojana मातोश्री शेत रस्ते योजना
- Jaminicha NA करण्याची संपुर्ण प्रक्रिया
[su_divider top=”no”]
शेतजमिनीच्या वेड्यावाकड्या हद्दी सरळ करणे Jaminicha Bandh
महाराष्ट्र जमिनी महसूल अधिनियम कलम 137 अनुसार शेताच्या सीमा सरळ करण्यासाठीच्या अर्जावरून
तसेच स्वत: हुन जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख अथवा त्याचे प्रतिनिधी तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांनी
योजना तयार करून त्याची त्याबाबतची प्रत गावातील चावडीवर लावली जाते.
तसेच गावातुन त्याबाबत काही हरकती असतील तर त्या मागवल्या जातात.
त्यानंतर संबधित अधिकाऱ्यांतर्फे सीमांमध्ये फेरफार करताना दोन्ही बाजुंच्या नैसर्गिक भूमिरेषा, व तसेच सोप्या
शेतजमिनी मशागतीचा लाभ आणि सीमा सरळ करताना सीमा चिन्हांमध्ये करावी लागणारी
कपात याचा विचार करण्यात येतो तसेच व याबाबत उद्भवणारी नुकसानभरपाई कायदेशीर तरतुदीनुसार वसूल करण्यात येते.
Jaminicha Bandh वरील रस्त्याचा हक्क
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यातील कलम 134 नुसार शेतजमिनीचा बांध हा त्या
शेतजमिनीच्या आजूबाजुच्या शेतकऱ्यांना त्यांच्या आजुबाजूच्या शेतात जाण्या येण्यासाठीचा रस्ता समजला जातो.
बांधावरील रस्त्याबाबत वाद उद्भवल्यास तहसिलदार त्या प्रकरणाबाबत सविस्तर चौकशी करून प्रकरणाबाबत निर्माण झालेले वाद सोडवु शकतात.
तहसिलदारांनी दिलेल्या निर्णयावर अपील करता येते तसेच एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा देखील दाखल करता येतो.
हद्दींचे Jaminicha Bandh चे नुकसान करणाऱ्यास दंड
हद्दीचे नुकसान करणाऱ्या व्यक्तिस कायद्यानुसार योग्य दंड करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी याचा असतो.
स्थानिक महसूल अधिकाऱ्याव्दारा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती पुरविली जाते.
जमिन मोजणीची प्रक्रिया (सरकारी जमिन मोजणी)
तालुका भुमि अभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकाऱ्याकडुन Jamin Mojani करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला
मोजणी करायची आहे त्याच्याकडुन योग्य नमुन्यातील अर्ज, सर्व शेजारील शेतकऱ्यांचे नाव व पत्ते, व मोजणी फी भरून घेतल्या जाते.
भुमि अभिलेख कार्यालयाकडुन केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणी मंध्ये साधी मोजणी, तातडीची मोजणी, अतितातडीची मोजणी असे प्रकार आहे.
या प्रत्येक प्रकारच्या जमिन मोजणीची मोजणी फी सुध्दा वेगवेगळी आहे.
प्रत्यक्ष मोजणी करत्यावेळी आजुबाजूच्या सर्व जमिनधारकांनी उपस्थित राहुन मोजणी सामग्री जमवणे व मोजणीसाठी मदत करणे अपेक्षीत असते.
मोजणी करताना संपूर्ण गटाची किंवा सर्व्हे क्रमांकाची मोजणी केल्या जाते.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
- AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration