Jamin Mojani गुगल च्या तंत्रज्ञानाने आता मोबाईलवर शक्य

1
2371

जमिनीची मोजणीत (Jamin Mojani) Google च्या आधुनिक तंत्रज्ञानाने आता मोबाईलवर शक्य

शेतजमीनीचा सात-बारा उताऱ्यावर एकुण उल्लेख केलेला असतो, त्यापैकी प्रत्यक्ष शेतजमिनीचा ताबा कमी आहे अशी शंका काहि जणांना असते अश्या वेळी त्या जमिनीची Jamin Mojani करून पाहणे हा पर्याय उरतो, तसेच सरकारी मोजणीसाठी अर्ज करण्याआधी आपली शेतजमिन सात-बारा उताऱ्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ताब्यात आहे किंवा नाहि हे तपासुन पाहणे सुध्दा काहि जणांना आवश्यक वाटते, अश्या वेळी पारंपारीक पध्दतीने केलेली मोजणी हि वेळखाऊ असते तसेच त्या मोजणीची गोपनियता नसते कारण मोजणी प्रत्यक्ष शेतात जाऊन करावी लागत असल्याने मोजणीची प्रक्रिया सर्वांना दिसुन येते.

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड बदलामुळे आता पारंपारीक पध्दतीने केली जाणारी जमिन मोजणीची आवश्यकता उरलेली नाहि, “गुगल” सारख्या नावाजलेल्या कंपनीने विकसीत केलेल्या “गुगल अर्थ” या मोबाईल ॲपच्या मदतीने आता जमिनीची मोजणी प्रत्यक्ष जमिन आहे त्या ठिकाणी न जाता घरात बसुन सुध्दा करता येत आहे. “गुगल अर्थ” या मोबाईल ॲपचा इतर सुध्दा खुप वेगवेगळा उपयोग आहे, मात्र शेतकरी वर्गाला या ॲपचा Jamin Mojani करण्यासाठी उपयोग नक्की जास्त होणार आहे.

Jamin Mojani
jamin mojani
jamin mojani

मोबाईलव्दारे Jamin Mojani साठीचे खुप सारे ॲप आपल्याला गुगल प्ले स्टोअर वरती मिळतात मात्र त्या ॲप ने मोजलेल्या शेतजमिनीची अचुकता हि कमी असते, मात्र गुगल ने विकसीत केलेल्या “गुगल अर्थ” या ॲपची अचुकता हि जास्त आहे तसेच इतर उपलब्ध मोबाईल ॲपचा वापर करत असतांनी त्या ॲप मंध्ये इतर जाहिराती दिसत असतात मात्र “गुगल अर्थ” या ॲपमंध्ये आपल्याला कोणत्याहि इतर जाहिराती दिसत नाहि.“गुगल अर्थ” या ॲपव्दारे Jamin Mojani काही मिनीटात करता येते तसेच मोजणी करण्यासाठी प्रत्यक्ष जमिन आहे त्या ठिकाणी जाण्याची सुध्दा आवश्यकता भासत नाहि, तसेच जमिन दुरवर जरी असली तरी कोणत्याहि ठिकाणावरून त्या जमिनीची मोजणी करता येते प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाहि, यामुळे Jamin Mojani ची गोपनीयता सुध्दा ठेवता येते.

“Google Earth” मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

“गुगल अर्थ” या ॲपव्दारे Jamin Mojani कशी करायची याबाबत माहितीसाठी हा खालील व्हिडीओ पहा

Adv