महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकरी मासिक प्रकाशित केल्या जाते Shetkari Masik Download
महाराष्ट्रा मधे शासनातर्फे विविध कृषी योजना राबविल्या जातात तसेच वेळो वेळी शेती पिकांसदर्भात माहित प्रसारित केल्या जाते.

उदाहरणार्थ सांगायचे झाले तर विविध अनुदान योजना, जसे कि पोकरा योजना, पिक विमा योजना, पिक कर्ज योजना, पशुसंवर्धन अनुदान योजना,
ठिबंक सिंचन, तुषार सिंचन येाजना, कृषी यांत्रिकीकरण व इतर शेतीपुरक व्यवसाय जसे कि शेळीपालन, कुक्कुटपालन, विविध फळबाग लागवड योजना,
दुग्ध व्यवसाय तसेच पिकांवरील रोग, खत व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन, हवामान व इतर विविध माहितीचा समावेश त्यामधे असतो.
शासनातर्फे प्रकाशित केली जाणारी हि माहिती शासनाच्या विविध वेगवेगळ्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली असते.
Shetkari Masik Download (शेतकरी मासिक डाऊनलोड) करण्यासाठी येथे क्लिक करा
Shetkari Masik Download योजना बाबत माहिती
योजनेचे नाव | Shetkari Masik शेतकरी मासिक |
राज्य | Maharashtra |
विभाग | Krushi Vibhag |
संकेतस्थळ | http://krishi.maharashtra.gov.in |
तसेच इतर शासकिय कार्यालयांमार्फत परिपत्रके, जि.आर, तसेच जाहिरातीव्दारे ती प्रकाशित केल्या जाते.
मात्र यातील माहिती ज्या शेतकऱ्यांपर्यंन्त पोहोचते त्यांनाच सबंधीत योजनांना अथवा माहितीचा लाभ हा घेता येतो बहुतांश शेतकऱ्यांपर्यंन्त वेळेत माहिती हि पोहोचत नाही
आणि असे शेतकरी विविध योजनांचा व माहितीचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. यामुळे सर्व शेतकऱ्यांना माहिती एकाच ठिकाणी
उपलब्ध व्हावी याकरीता महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत शेतकरी मासीक प्रत्येक महिन्याला प्रकाशित केल्या जाते.
या मासिका मधे विविध कृषी अनुदान योजना, कृषी तंत्रज्ञान, कृषी पुरक व्यवसाय, कृषी व्यवस्थापन, कृषी मालाची विक्री,
कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत संम्पुर्ण माहिती हि समाविष्ट केलेली असते.
- ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
- फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
- प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
- E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
- Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादी
- Kanda Anudan List कांदा अनुदान यादी
शेतकरी मासिकात विविध कृषी विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शक व कृषी विषयातील
इतर तज्ञ व्यक्तिचे शेती योजना व शेती संबधीत माहिती आधारील लेख दिलेले असतात.
शेतकरी मासीक shetkari masik तुम्हाला दुकानातून विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला साधारणत: 25 रूपयांना ते मिळते
मात्र ते आपल्याला कोणत्याही दुकानात उपलब्ध असलेले दिसून येणार नाही.
मित्रांनो आपल्याला शेतकरी मासिक हे विनामुल्य पिडीएफ स्वरूपात मोबाईलवरती अथवा कॉम्युटरवरती अगदी मोफत डाऊनलोड करता येते.
शेतकरी मासिक अगदी मोफत कश्या प्रकारे डाऊनालोड करायचे याबाबत खालील व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.