E Peek Pahani नवीन व्हर्जन वर अशी करा

0
2099

मित्रांनो राज्यात E Peek Pahani प्रकल्प राबविण्यात येतो, या प्रकल्पाव्दारे राज्य सरकार शेतकऱ्यांनी लागवड

केलेल्या पीकाची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करून घेते. (ई-पीक पाहणी नवीन व्हर्जन वर कशी करावी याबाबत या लेखात खाली माहिती दिलेली आहे)

ई पीक पाहणी प्रकल्प हा माहराष्ट्र शासनाचा महत्वाकांशी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021

पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे, या प्रकल्पाच्या अमलबजावणीला गेल्या 1 वर्षापासून सुरूवात झालेली आहे,

सन 2021 या वर्षात E Peek Pahani App व्दारे सुमारे 1 कोटी 11 लाखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पीकाची नोंदणी केलेली आहे,

खरीप, रंब्बी व उन्हाळी हंगामामधील पीकांची तसेच फळझाडांची नोंदणी या ॲप व्दारे शेतकऱ्यांनी केलेली आहे.

कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरची झोडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे,

गावची पीक पाहणी पाहणे,इत्यादी नोंदी सुध्दा या ॲप व्दारे करता येतात.

योजनेचे नावE Peek Pahani Version 2 ई-पीक पाहणी व्हर्जन 2
राज्यमहाराष्ट्र
E Peek Pahani Version 2Download
विभागमहसुल व वनविभाग, कृषी विभाग
योजनेबाबत माहिती
E Peek Pahani App Version 2
E Peek Pahani App Version 2

E Peek Pahani Version 2 App (ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप) मधील नवीन सुधारणा

Geo Fencing सुविधा E Peek Pahani

सुधारीत ई पीक पाहणी ॲप मधे राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यविबंदूचे म्हणजेच Centroid अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आलेले आहेत,

शेतकरी आपल्या शेतात पीक पाहणी करतांना पीकाचा फोटो ॲपव्दारे काढतो त्यावेळी फोटो काढण्याच्या

ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यविंदू म्हणजेच Centroid पर्यंतचे अंतर ॲप मधे दिसणार आहे,

संबधीत शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्या शेतकऱ्याला त्या बाबत मोबाईल ॲप मधे संदेश दर्शविण्यात येतो,

या सुविधेमुळे पीकाचा ठिकाणासह अचूक फोटो घेता येतो.

शेतकऱ्यांनी केलेली E Peek Pahani स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार

शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीव्दारे नोंदविलेल्या पिकांबाबत ॲप मधे स्वयं घोषणापत्र दाखविण्यात येते,

ते घोषणापत्र शेतकऱ्याने ॲपव्दारेच स्व:घोषीत करायचे आहे, अश्या पध्दतीने शेतकऱ्याने केलेली

ई-पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना क्रमांक 12 मधे दाखविण्यात येते.

E Peek Pahani Version 2 Process
E Peek Pahani Version 2 Process

10% पीक पाहणीची पडताळणी तलाठी करणार

शेतकऱ्यांनी E Peek Pahani ॲप व्दारे केलेल्या पीक एकूण पाहणी पैकी 10 टंक्के पीक पाहणी नोंदणीची पडताळणी तलाठी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे,

त्यामधे पीकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकीचा फोटो असलेल्या नोंदी, तसेच विहित केलेल्या अंतराच्या बाहेरून

पीकाचे फोटो काढलेले असल्यास अश्या नोंदी यांचा समावेश असणार आहे.

तलाठी हे पडताळणी नंतर आवश्यक असेल त्या ठिकाणी दुरूस्ती करून त्या नाेंदी संत्यापित करतात, व त्यानंतर त्या नोंदी गाव नमुना क्रमांक 12 मधे दाखविण्यात येतात.

48 तासाच्या आत शेतकऱ्याला स्वत: केलेली पीक पाहणी दुरूस्ती करता येते

शेतकऱ्याने आपल्या पीकाच्या केलेल्या ई-पीक पाहणी मधे काहि चुक झाल्यास,

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्दारेच पीक पाहणी नोंदणीमधे नोंदणी केल्याच्या 48 तासाच्या आत स्वत:ला केव्हाही फक्त एक वेळेस दुरूस्ती करता येते.

किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत पीकाच्या विक्री करीता संमती नोंदविण्याची सुविधा

किमान आधारभूत योजना अंतर्गत येणाऱ्या पीकांची E Peek Pahani शेतकऱ्यांनी नोंदवील्यानंतर

ई-पीक पाहणी ॲप मध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय ?”

असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीव्दारे पुरवठा विभागाला दिली जाणार आहे,

पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे,

त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामधे जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासरणार नाही.

मिश्र पीकामधे मुख्य पिकासंह तीन घटक पीके नोंदविण्याची सुविधा

आधीच्या मोबाईल ॲप मधे मुख्य पीक व दोन दुय्यम पीके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केलेली होते,

मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांचया मागणी प्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पीके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे,

त्याचबरोबर दुय्यम पीकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे,

त्यामुळे दुय्यम पीकांची अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होते.

संपूर्ण गावाची E Peek Pahani पाहण्याची सुविधा

ई-पीक पाहणी मोबाईल ॲप मधे त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

त्याव्दारे खतेदारांना पीक पाहणीमध्ये दुरूस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांच्या कडे अर्ज सादर करणे शक्य होते.

E Peek Pahani App मधे Help बटन ची सुविधा

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरीता ॲप मधे  Help म्हणजेच मदत हे बटन देण्यात आलेले आहे.

या बटणावर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत,

तसेच ई-पीक पाहणी ॲप मधील कायम पड क्षेत्र नोंदविणे, बांधावरची झोडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे,

गावची पीक पाहणी पाहणे, इत्यादी विविध सुविंधा बाबत माहिती देणाऱ्या दृकश्राव्य म्हणजेच

व्हिडीओ क्लिप (Audio Video Clip) च्या लिंक देण्यात आलेल्या आहेत,

या व्हिडीओंचा उपयोग करून श्ेातकरी ॲप वापरतांना येणाऱ्या समस्यांवरती स्वत: मात करू शकतो.

नुकसान भरपाई करीता E Peek Pahani आवश्यक

प्रत्येक खातेदार शेतकऱ्याने आपला पीक पेरा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे नोंदविणे गरजेचे आहे

कारण E Peek Pahani नोंदणीच्या आधारावरच पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास अचूक

भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे या बाबी शासनाकडून करण्यात येणार आहे.

पीक विम्याकरीता Pik Vima ई-पीक पाहणीची आवश्यकता

शेतकऱ्याने आपल्या पीकाचा काढलेला पीक विम्याबाबत नुकसान भरपाई दावा केल्या नंतर संबधीत शेतकऱ्याने केलेल्या पीक पाहणी

नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्याला पीक विम्याच्या भरपाईची रंक्कम मंजूर करण्यात येणार आहे,

प्रंत्यक्ष पीक विमा काढतांनी नोंदविलेला पीक पेरा तसेच E Peek Pahani ॲप व्दारे नोंदवीलेल्या पीकात

तफावत असल्यास ई-पीक नोंदणी व्दारे नोंदविलेल्या पीकांनाचा गृहित धरण्यात येणार आहे.

E Peek Pahani Version 2 ई-पीक पाहणी व्हर्जन 2

खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्दारे नोंदविण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झालेली आहे,

मागील अनुभवावरून तसेच स्थानिक पातळीवरून आलेल्या सूचनांच्या आधारे ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमधे

काहि महत्वाचे बदल करून शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत मोबाईल ॲप व्हर्जन 2 विकसित करण्यात आलेले आहे,

ॲप मोबाईल मधे इन्टॉल करण्याकरीता गुगल प्ले स्टोअर वरती उपलब्ध झालेले आहे.

खरीप हंगाम 2022 करीता ई पीक पाहणीची प्रक्रिया 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झालेली आहे या

करीता वरती नमूद केल्या नुसार सुधारीत ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन 2 Google Play Store वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

ई पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे कशी करायची याबाबत व्हिडीओ पहा

ई-पीक पाहणी अशी करा

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv