Sarkari Jamin Mojani संपूर्ण माहिती भूमि अभिलेख

7
40269

Sarkari Jamin Mojani बाबत संपूर्ण माहिती

( भूमी अभिलेख कार्यालयाकडुन केली जाणारी Sarkari Jamin Mojani )

शेत जमिनीची Sarkari Jamin Mojani करणे जमिनीच्या अनेक वादविवादावरती तोडगा आहे, प्रत्यक्ष जमीन कमी भरणे, वाटणीमध्ये जमीन 7/12 उताऱ्यावर असलेल्या उल्लेखापेक्षा कमी असणे, शेजारच्याकडुन बांध कोरून जमिनीवर अतिक्रमण करणे, अश्या अनेक कारणांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडुन केली जाणारी जमिनीची शासकीय  मोजणी महत्वाची असते.

भारतात संपुर्ण जमिनीची मोजणी हि ब्रिटीश सरकारच्या काळात करण्यात आलेली आहे, त्यामंध्ये टोपोग्राफीकल सर्व्हे करून नद्या, नाले, डोंगर, दऱ्या, यांची नोंद व समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यात आली.

तसेच गावाच्या जमिनीची मोजणी करून गावाच्या एकुण जमिनीशी जुळवणी केल्या गेली, गावाच्या एकुण जमिनीची विभागणी करून त्यात नाले, नद्या, रस्ते, शेत रस्ते, गावठाण जमीन, गायरान जमीन, यांचे क्षेत्र नोंदवील्या गेले, तसेच मोजलेल्या प्रत्येक जमिनीला एक क्रमांक सुध्दा देण्यात आला, या दिलेल्या क्रमांकालाच सर्वे नंबर अस आपण म्हणतो, यासोबतच जमिनीची हलकी जमीन, भारी जमीन, अशी प्रतवारी करून तीची सुध्दा नोंद करण्यात आली, अश्या प्रकारे गावाच्या संपूर्ण जमिनीची Sarkari Jamin Mojani करून मिळवीलेल्या संर्व नोदिंचा उपयोग करून गावाचा नकाशा तयार करण्यात आला, तयार करण्यात आलेल्या गावाच्या नकाशात गावाचा शिव, नद्या, नाले, रस्ते, शेत रस्ते, सर्वे नंबर, गावठाण जमीन, शेतजमीन, इत्यादिचा उल्लेख करण्यात आला.

आजही भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे हे नकाशे उपलब्ध असून, भूमी अभिलेख कार्यालयाकडुन केल्या जाणाऱ्या सरकारी जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये याच नकाशांचा उपयोग करण्यात येतो, प्रत्यक्ष मोजलेली जमीन या नकाशातील मोजमाप यांसोबत जुळवून पाहिली जाते. काही गावांमध्ये जमीन एकत्रीकरण योजना राबविल्या गेलेली आहे अशा गावामधील जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरती आपल्याला सर्वे नंबर ऐवजी गट नंबरचा उल्लेख भूमापन क्रमांकाच्या ठिकाणी आढळून येतो. म्हणून काही 7/12 उताऱ्यांवर आज सर्वे नंबर असतो तर काहींवरती गट नंबर दिलेला असतो.

भूमी अभिलेख कार्यालयाकडुन केल्या जाणाऱ्या Sarkari Jamin Mojani ची आवश्यकता

  • प्रत्यक्ष जमिनीचा ताबा आणि 7/12 उताऱ्यावरील जमिनीचा उल्लेख पडताळून पाहण्यासाठी.
  • शेजाऱ्याकडून बांध कोरून जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे किती क्षेत्रावर अतिक्रमण केल्या गेले आहे हे निश्चित करण्यासाठी.
  • नविन जमीन खरेदी अथवा विक्री केल्यानंतर खरेदी खतानूसार अचूक क्षेत्र काढण्यासाठी.
  • वडिलोपार्जित जमिनीचे वारसाने अथवा खरेदी-विक्रीमुळे भाग पडले असतील अशा वेळी जमीन रेकॉर्ड प्रमाणे ताब्यात आहे किंवा नाहि हे पाहण्यासाठी.
  • सर्व हिस्सेदारांना खातेफोड करून जमिनीचे वाटप करीत असतांना समान स्वरूपात जमीन मिळावी यासाठी.
  • जमिनीच्या बांधावर असलेली विहीर, घर, तसेच झाडे हे नेमके कोणाच्या जमिनीच्या हद्दीत आहे हे पाहण्यासाठी.
  • काही कारणास्तव जमिनीचे बांध सरकले असतील व ते सरकलेले बांध सुव्यवस्थीत करण्यासाठी.
  • शेतीची जमीन बिगर शेती म्हणजे अकृषक करण्यासाठी.
  • गावठाण जमीन, गावाची हद्द (शिव), गायरान जमीन, स्मशान भूमी, नदि, नाला, पाणंद इत्यादि सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाल्यास.

Sarkari Jamin Mojani साठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज कसा करावा

जमीन मोजणी करावयाची असल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करून देण्या संदर्भात अर्ज सादर करावा लागतो.

अर्जाचा नमुना खालीलप्रमाणे असतो.

Sarkari Jamin Mojani च्या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत

  1. जी जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीचा चालू महिन्यातील 7/12 उतारा.
  2. जमिनीच्या चतु:सीमेचा दाखला (तलाठी कार्यालयाकडून मिळवीलेला).
  3. ज्या जमीनीची मोजणी करावयाची आहे त्या जमीनीचा कंच्चा नकाशा.
  4. जमीन मोजणी हि साधी मोजणी, तातडीची मोजणी, किंवा अतितातडीची मोजणी यापैकी जी करावयाची असेल त्याचा अर्जात उल्लेख व त्यानुसार मोजणी फी भरलेल्याचे बँक चलान.
  5. जमिनीच्या ज्या बाजूचा वाद असेल त्याबाबतचा तपशिल.
  6. जमीन मोजणीसाठीचा अर्ज जमीनीची हद्द कायम करणे, पोट हिश्याची मोजणी, वहिवाटीप्रमाणे क्षेत्र दर्शविणे, अथवा अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शविणे यापैकी ज्यासाठी केलेला असेल ते नमुद करावे.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no” style=”dashed”]

[su_divider top=”no” style=”dashed”]

जमीन मोजणीची फी

अ.क्र. मोजणीचा प्रकारमोजणी फी
1.साधी मोजणी1000 रूपये /- प्रती हेक्टर
2.तातडीची मोजणी2000 रूपये /- प्रती हेक्टर
3.अतीतातडीची मोजणी3000 रूपये/- प्रती हेक्टर
4.अतीअतीतातडीची मोजणी12000 रूपये /- प्रती हेक्टर
Sarkari Jamin Mojani Fees

जमीनीची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयाकडून कश्या प्रकारे केल्या जाते

अर्जदाराकडून जमीन मोजणी संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयाला अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोजणी रजिस्टर वर नोंद करून एक क्रमांक दिल्या जातो,

त्यानंतर संबधीत जमीनी संदर्भातल्या भूमी अभिलेख कार्यालयात असलेल्या मुळ रेकॉर्डमधुन टिपण काढून त्याचा उतारा संबधीत फाईलला जोडण्यात येतो,

नंतर संपूर्ण फाईल मोजणी करणाऱ्या भूकर मापकाकडे (सर्व्हेअर) दिले जाते.

संबंधित भुकर मापक हा अर्जकरणाऱ्या व्यक्तिसह अर्जात दिलेल्या चारही बाजूच्या जमीन कब्जेदार यांना

अर्जात नमूद केलेल्या पंत्या वरती मोजणीच्या किमान 15 दिवस अगोदर रज‍िस्टर पोष्टाने नोटीसा पाठवुन मोजणीची तारीख कळवितो.

साधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाच्या काळात तालुक्यातील रेकॉर्ड बाबत भूमी अभिलेख कार्यालयात काम चालतात.

व उर्वरीत काळात जमीन मोजणीचे काम सर्व्हेअर मार्फत करण्यात येते.

मोजणीच्या दिवशी मोजणीसाठी अर्ज करणाऱ्याने पुढील साहित्य स्व:खर्चाने मोजणीसाठी पुरविणे आवश्यक असते – चूना, हद्दीच्या खूनासाठी दगड, मजूर.

भूमी अभिलेख कार्यालयाकडून आजकाल सर्व जमीनीच्या मोजणी ह्या प्लेन टेबल पध्दतीचा उपयोग करून केल्या जातात. यामध्ये जमीनीची प्रत्यक्ष लांबी, रूंदी, किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पध्दतीने मोजणीदाराला नकाशा हा अचुक तयार करता येतो. जमीन हि खाली वर, ओढ्या नाल्याची जरी असली तरी तिचे आकारमान प्लेन टेबल पध्दतीने अचुक  काढता येते.

सर्व्हेअर प्रत्यक्ष जमीन कशी मोजतात

जमीन मोजणीसाठी आलेला सर्व्हेअर सर्वात आधी जी जमीन मोजायची आहे त्या जमिनीची पाहणी करतो

व वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदाराकडून माहिती घेतो,

प्रत्यक्ष वहिवाटी प्रमाणे हद्द लक्षात यावी यासाठी खुणा सर्व्हेअर कडून ठेवल्या जातात,

त्यानंतर जमीनीमधील किवा त्या संपूर्ण जमीनीच्या गटाजवळ असलेल्या मूळ मोजणीच्या खुणा

म्हणजेच सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड याच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबल च्या आधारे जमीनीची मोजणी केली जाते.

मोजणीच्या दिवशी ज्या शेतकऱ्याने मोजणीसाठी अर्ज केलेला आहे त्याच्यासह लगतचे

इतर शेतकरी हजर राहणे अपेक्षीत असते मात्र बऱ्याचदा जाणूनबुजून लगतचे शेतकरी गैरहजर राहतात.

विशेष करून अतिक्रमणा संदर्भात मोजणी असेल अश्या वेळी अतिक्रमण करणारी व्यक्ती हि हजर राहत नाहि.

मोजणीच्या दिवशी एखादि व्यक्ती जरी गैरहजर राहिली तरी त्या व्यक्तीच्या गैरहजरीमंध्ये मोजणी करता येते,

मात्र मोजणी ज्या दिवशी करण्यात येणार आहे याबाबतची आगाऊ नोटिस त्या व्यक्तिला दिलेली असावी,

किंवा अशी नोटीस संबंधिताकडून स्विकारण्यास नकार दिलेला असावा

प्लेन टेबल पध्दतीने केलेल्या जमीन मोजणीव्दारे आपोआप जमीनीच्या खुणा  व नकाशा तयार होत जातो. मोजणी संदर्भात मोजणीच्या दिवशी अर्जदारासह सर्व उपस्थित संबधितांचा लेखी जबाब सुध्दा मोजणी करणाऱ्या सर्व्हेअरकडून घेतल्या जातो. एखाद्या उपस्थित व्यक्तिने जवाब देण्यास नकार दिल्यास त्या व्यक्तीने जबाब दिल्यास नकार दिला असा पंचनामा तयार केल्या जातो. प्लेन टेबल च्या आधारे केलेल्या या मोजणीचीतुलना मूळ रेकॉर्ड सोबत करून पाहिली जाते. यामुळे जमीनीची मोजणी झाल्यानंतर लगेचच हद्दीच्या खुणा  न दाखवता तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन तेथे असलेल्या मूळ रेकॉर्डसोबत तुलना करून हद्दीच्या खुणा  निश्चित केल्या जातात व काही दिवसानंतर प्रत्यक्ष जमीनीच्या हद्दी दाखवल्या जातात.

जमीन मोजणीच्या हद्दी दाखविल्याप्रमाणे अर्जदाराने हद्दीची निशाणी (दगड) हद्दीच्या खुणाप्रमाणे बसवून घेणे आवश्यक असते.

Sarkari Jamin Mojani नंतरची प्रक्रिया

सर्व्हेअरने जमीन मोजणी करून प्रत्यक्ष हद्द दाखवील्या नंतर तालुका भूमि अभिलेख कार्यालयात मोजणी नकाशाच्या दोन प्रती तयार केल्या जातात, या मोजणी नकाशा मंध्ये मोजणीसाठी अर्ज करणाऱ्याचे नाव, मोजणीची तारीख, मोजणी करणाऱ्या सर्व्हेअरचे नाव, नकाशाची दिशा, हद्द दाखविल्याचा दिनांक, नकाशासाठी वापरलेला अंतराचा स्केल व भूमि अभिलेख कार्यालयाचा सही शिक्का इत्यादी महत्वाची माहिती नोंदवली जाते. जर वहिवाटीची हद्द आणि मुळ नकाशाच्या रेषेप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळ्या असतील तर अशी वहिवाटीची हद्द तुटक तुटक रेषा (- – – – – ) व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने (______) दाखविल्या जाते. या दोन्ही रेषा मधील अतिक्रमण क्षेत्र वेगळ्या रंगाने दाखवले जाते,  मोजणी नकाशावर सुद्धा  (- – – – – ) ही वहिवाट हद्द असून (______) ही रेकॉर्डप्रमाणे हद्द आहे व रंगाने दाखविलेले क्षेत्र हे या गटांमधील असून त्यामध्ये या गट नंबरच्या जमीन मालकाने अतिक्रमण केले आहे असा स्पष्ट उल्लेख करण्यात येतो. अश्या पध्दतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून अर्जदाराला मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते.

निमताना (Nimatana Mojani) मोजणी अर्ज

जमीन मोजणीची वरील पध्दत वापरून मोजणी केल्यानंतर आणि सर्व्हेअरने हद्दी

पुन्हा दाखविल्यानंतर सुध्दा अशी मोजणी जर मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात

अपिल करण्याची तरतुद असून त्यानुसार थेट तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडे निमताना मोजणीसाठी अर्ज केला जातो,

अशा प्राप्त झालेल्या अर्जावरून स्वत: तालुका भूमिनिरिक्षक केलेल्या मोजणीची परत मोजणी करून हद्द दाखवतात.

मोजणी नंतर निर्माण होणारे प्रश्न

ज्या अर्जदाराने जमीन मोजणीसाठी अर्ज केलेला आहे त्याच्या बाजूने मोजणीचा निष्कर्ष निघतो असा मोठा गैरसमज आहे,

जमीन मोजणी हि मुळ रेकॉर्डच्या आधारे केल्या जाते

अर्जदाराने मोजणीची फी भरली म्हणून त्याच्या बाजूने मोजणी निष्कर्ष काढला जातो हे चुकिचे आहे.

अर्जदाराने मोजणी फी भरून मोजणी करून घेतल्यानंतर

बऱ्याचदा समोरचा जमीन खातेदार मोजणी मान्य नाही असे सांगून जमीन मोजणी वर अविश्वास दाखवतो,

सोबत मी आता स्वत: परत जमीन मोजणीचा अर्ज भूमि अभिलेख कार्यालयात देतो व परत मोजणी झाल्यानंतर

मी अतिक्रमण असल्यास अतिक्रमीत जमीनीचा ताबा देईन असे सांगतो, परंतु जमिन मोजणीसाठी स्वत: प्रत्यक्ष अर्ज सादर करत नाहि. अश्या वेळी प्रथम मोजणी केलेल्या खातेदाराच्या जमीनीचे जर बांध सरकल्यामुळे अतिक्रमण झालेले असेल तर महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम 138 नुसार अतिक्रमीत क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी त्वरीत प्रांत अधिकारी यांना अर्ज करायला हवा, अर्जासोबत भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या जमीन मोजणी नकाशा सुद्धा जोडायला हवा. जर शेजारच्या खातेदाराला जमीन मोजणी मान्य नसेल तर तो निमताना मोजणीसाठी अर्ज सादर करू शकतो त्यामुळे पुन्हा त्याच्या अर्जावरून जमीन मोजण्याची वाट पाहण्याची गरज नाहि. तसेच दिवाणी न्यायालयात सुध्दा अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी दावा दाखल करता येतो.

मोजणीच्या दिवशी बाजुचे खातेदार गैरहजर असतील अथवा त्यांच्या शिवाय परस्पर मोजणी घाईघाईने करण्यात काही फायदा नाहि,

त्यामुळे शक्यतो त्यांच्या उपस्थितीती मंध्ये मोजणी झाल्यानंतर त्यांना मोजणीबद्दल

आक्षेप घेणे अवघड होते तसेच अर्जात नमुद लगतच्या खातेदारांच्या अचूक पत्यावर मोजणी करण्याआधी मोजणीबाबतची नोटीस बजावली जायला हवी हे फार महत्वाचे आहे.

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no” style=”dashed”]

Adv