महाराष्ट्रात कोरोना आजाराच्या वाढणाऱ्या फैलावामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोरोना आजार फैलन्याची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत 14 एप्रिल 2021 रात्री 8 वाजेपासून 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंन्त महाराष्ट्र सरकारणे महाराष्ट्रात Lock Down घोषित केला आहे.
Lock Down – दारिद्र रेशेखालील व्यक्ति
महाराष्ट्रात दारिद्र रेशेखालील लाभार्थ्यांची संख्या मोळी असून दारिद्र रेशेअंतर्गत येणाऱ्या जनतेला अंन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रती व्यक्ति 3 किलो गहु आणि 2 किलो तादुळ एक महिन्यासाठी मोफत देण्यात येणार आहे. जवळपास 7 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश दारिद्र रेशेखालील जनतेची रोजीरोटी हि लॉकडाऊनमुळे बंद होणार होती सरकारणे जाहिर केलेल्या मदतीचा मोठा फायदा आता दारिद्र रेशेखालील जनतेला होणार आहे.
Lock Down – शिवभोजन थाळी
गरजु व्यक्तिंना महाराष्ट्र सरकारतर्फे शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आलेली होती याअंतर्गत गरजवंतांना 10 रूपयात पोट भर जेवन दिल्या जात होते पहिल्या लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थाळी 5 रूपयात करण्यात आली होती आता मात्र पुढचा एक महिना शिवभोजन थाळी हि मोफत करण्यात आलेली असून जवळपास रोज 2 लाख शिवभोजन थाळ्या या गरजुंना मोफत दिल्या जाणार आहे.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
- Sheli Anudan Yojana शेळी वराह अनुदान योजना
- 05, 08 Scholarship Exam 2021, Hall Ticket Download
- 11 CET Online Form – New Website
- 50 Hajar Anudan List रेग्युलर कर्जदार अनुदान यादी
- 50 Hajar Anudan पात्रता, लाभार्थी यादी
- 7/12 Utara मध्ये झाले नवीन बदल
[su_divider top=”no”]
विविध योजनतेतील निवृंत्तीधारकांना आर्थिक मदत
राज्या मंध्ये विविध योजनेअंतर्गत निवृंत्तीवेतन धारकांना दरमहा लाभ दिल्या जातो, लॉकडाऊनची घोषना केल्या मुळे आता सरकारतर्फे 1.संजय गांधी निराधार योजना, 2.श्रावन बाळ योजना, केंद्र पुरस्कृत 3.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृंत्तीवेतन योजना, 4.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृंत्तीवेतन योजना, 5. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृंत्ती वेतन योजना या पाच योजनेतील लाभार्थ्यांना पुढिल दोन महिन्याकरीता प्रत्येकी 1 हजार म्हणजेच एकूण दोन हजार रूपये आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे, या पाच योजनांचे एकुण 35 लाख इतके लाभार्थी आहे.
नोंदणीकृत बांधकाम कामगार
महाराष्ट्रात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो यामुळे बांधकाम कामगारांची संख्या सुध्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे, महाराष्ट्र शासनातर्फे आता महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातील नोदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रूपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. जवळपास 12 लाख इतक्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
घरेलु नोंदणीकृत कामगार
घरेलु कामगार म्हणजेच घरात धुनी, भांडी, सफाई करणारे कामगार होय, महाराष्ट्र शासनातर्फे घरेलु नोंदणीकृत कामगारांना सुध्दा आर्थिंक मदत हि दिल्या जाणार आहे.
Lock Down – अधिकृत फेरिवाले
मोठ मोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्रात फेरिवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यातील बहुतांश फेरिवाले हे अधिकृत परवाणा धारक आहे अशा अधिकृत परवाणा धारक फेरिवाल्यांना एकावेळी प्रत्येकी 1500 रूपये मदत दिल्याजाणार असून स्वनिधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रंक्कम जमा करण्यात येणार आहे, जपळपास 5 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
परवाना धारक रिक्षावाले
महाराष्ट्रातील शहरांमध्ये खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, लॉकडाऊन मुळे रिक्षावाल्यांचा व्यवसाय अडचणीत येणार असून त्यांच्यासाठी शासनाने मदत जाहिर केली आहे, परवानाधारक रिक्षा चालकांना एकावेळी 1500 रूपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे जवळपास 12 लाख परवाना धारक रिक्षावाल्यांना याचा लाभ हा होणार आहे.
आदिवासी जनता
महाराष्ट्रातल्या काहि भागात आदिवासी जनता मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे, लॉकडाऊन मुळे आदिवासींच्या जिवनावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो, आदिवासींना मदत म्हणुन आता सरकारतर्फे खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासींना प्रती कुटुंब 2 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, जवळपास 12 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ हा होणार आहे.
शेतकरी व शेती कामगार
महाराष्ट्रात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान होते, तसेच शेती मंध्ये काम करणारे कामगार सुध्दा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यांची नोंद हि शासन दरबारी कोठेच नाहि, सरकारणे जाहिर केलेल्या मदती मंध्ये शेतकरी आणि शेती मंध्ये काम करणाऱ्या कामगारांना काहिच मिळालेले दिसत नाहि, शासनाने शेतकऱ्यांना व शेती मंध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुध्दा मदत जाहिर करावी हि मागणी आता ग्रामिण भागातुन होतांना दिसुन येत आहे.