OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत
ज्या प्रमाणे मराठा समाजाला व्याज परतावा योजना राबविल्या जाते त्याचप्रमाणे OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे सुध्दा Karj Yojana राबविल्या जाते.
OBC Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
VJNT Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf
जि.आर.डाऊनलोड करण्यासाठीची खालील लिंक वरती क्लिक करा
https://msobcfdc.in/downloads/201901311225012722.pdf
OBC Mahamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.msobcfdc.org/contacUs
VJNT Mhamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.vjnt.in/ContactUsNew.aspx
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष योजनेनुसार बँकेकडून घेतलेल्या रु.१०.०० लाखा पर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज (जास्तीत जास्त १२% पर्यंत) परतावा योजना OBC Mahamandal Karj Yojana महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि VJNT Mahamandal Karj Yojana वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबविण्यास या शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील.

OBC, VJNT Mahamandal कर्ज योजनेचा उद्देश
बँकेमार्फत लाभार्थीना रु. १०.०० लक्ष पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल.
सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल.
OBC/VNJT Mahamandal Karj Yojana पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा
सध्या महामंडळाच्या योजने करीता लाभार्थीच्या पात्रतेचीग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लक्ष कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
सदर उत्पन्न मर्यादेत वाढ करुन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेप्रमाणे सदर योजनेकरिता
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रु. ८.०० लक्ष इतकी राहील. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)
Yojana Name | व्याज परतावा योजना, OBC Karj Yojana, VJNT Karj Yojana |
Yojana Start Year | 2019 |
OBC Mahamandal Online Form | https://msobcfdc.in/ |
VJNT Mahamandal Online Form | http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN |
OBC Karj Yojana Form Download | http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf |
OBC Mahamadal Contact | http://www.msobcfdc.org/contacUs |
VJNT Mahamandal Contact | http://www.vjnt.in/ContactUsNew.aspx |
प्रकल्प क्षेत्रानुसार लक्ष्यांक अंदाजपत्रक
१. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम एकूण आर्थिक तरतुदीच्या ६०% रक्कम
२. लघु उद्योग व मध्यम उद्योग –
(अ) उत्पादन २) व ३) साठी एकूण आर्थिक तरतुदीच्या
(ब) व्यापार व विक्री ४०% रक्कम
३. सेवा क्षेत्र
लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- वय वर्ष १८ ते ५० वर्ष असावे.
- लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
- उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवातत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
परताव्याच्या अटी
- जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
OBC / VJNT Mahamandal लाभार्थ्यांस कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा
उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत)
त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत असुन प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही Charges/Fees/देयके अदा करणार नाही.
-
ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात आली असून, याव्दारे आता एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांसोबत संपर्क साधता येतो. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर आग, चोरी, दरोड, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, विबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला अशा प्रकारच्या घटनांमधे तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी…
-
फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
राज्यामधे Falbag Lagvad Anudan Yojana म्हणजेच भाऊसाहेबफुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२३-२४ पासून राबविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बदलास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेकरीता आता MahaDBT पोर्टल वरून Online Form स्विकारणे सुरू आहे. या लेखा मधे आपण Falbag Lagvad Anudan Yojana योजनेकरीता ऑनलाईन अर्ज कसा करावा, योजने करीता पात्रता, आवश्यक कागदपत्रे, मिळणारी अनुदान रक्कम, अनुदान योग्य…
-
प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
प्रधानमंत्री आवास योजना pradhan mantri awas yojana भारतामधे 22 June 2015 पासून मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेलाच pm awas yojana असे सुध्दा म्हणतात. या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज सुरू आहे. दारिद्रयरेषेखालील व्यक्ती, झोपडपट्टीत राहणारे कुटूंब, कच्या घरात राहणारे कुटूंब, घर नसलेली व्यक्ती अश्यांना स्वत:ची पंक्की घरे मिळावीत हा उद्देश…
-
E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
मित्रांनो राज्यात आता ई पीक पाहणी शेवटची तारीख e pik pahani last date ची घोषना शासनातर्फे करण्यात आली आहे. आधी दिलेल्या मुदतीमधे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या लाभापासून बहुसंख्य शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता नव्याने अतिम तारखेची घोषणा करण्यात आलेली असून आता नवीन तारीख खालीप्रमाणे…
-
Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादी
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत Dushkal Nidhi मदत जाहिर करण्यात आली होती, त्या अनुषंगाने गावपातळीवरून तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून, पात्र शेतकऱ्यांच्या नावाची Dushkal Nidhi Anudan List यादी बनविण्यात आली होती. यादीतील पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निधी अनुदान चा लाभ देण्याकरीता तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशीलाची यादी तयार करण्यात आलेली होती, यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या…
-
Kanda Anudan List कांदा अनुदान यादी
शासनाने पात्र शेतकऱ्यांची Kanda Anudan List बनविली आहे. 2023 मध्ये राज्यात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने 350 रू. प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान दिले जात आहे. Kanda Anudan Yadi कांदा अनुदान यादी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेमधून Kanda Anudan देण्याकरीता बाजार समितीने…
OBC/ VJNT Karj Yojana करीता उमेदवारांची नांव नोंदणी
उमेदावारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल
प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्ती नुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास
उमेदवारास संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of intent) / मंजूरीपत्र दिले जाईल.
उमेदवाराने या आधारे बँकेकडून कर्ज प्रकरणांवर कर्ज मंजूर करुन घ्यावे.
योजनेचे सर्वसाधारण सनियंत्रण
(अ.) दरवर्षी महामंळामार्फत केले जाईल.
(ब.) महामंडळाचे जिल्हा स्तरावरील योजनेच्या अंमलबजावणीचे काम आवश्यकतेनुसार
मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी भेट देऊन तपासतील.
OBC Mahamandal Karj Yojana / VJNT Mahamandal Karj Yojana लाभार्थ्यांची निवड
या व्याज परतावा योजनेचा लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून
या समितीत लाभार्थ्यांनी त्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे व्यवस्थापक, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त,
समाज कल्याण हे सदस्य असतील व संबंधित महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतील.
या योजनेंतर्गत संपुर्ण कर्ज रक्कम बँक देणार असल्याने सदर प्रस्ताव जिल्हा लाभार्थी निवड या समितीमार्फत करण्यात येईल.
प्रति जिल्हा किमान १०० लाभार्थीना सरासरी रु. १०.०० लक्ष प्रकल्प किंमतीचे प्रस्ताव मंजूर होतील
याप्रमाणे प्रति जिल्हा रु. १०.०० कोटी मंजूर प्रकरणात सर्व ३६ जिल्हयातील
प्रति वर्षी बँकेमार्फत मंजूर ३६०० लाभार्थीना रु. ३६०.०० कोटी निधी बँकेमार्फत वितरीत केलाजाईल.
त्यावर १२ टक्के प्रमाणे व्याज परतावासाठी रु.५०.०० कोटी महामंडळ सहायक अनुदानातून मंजूर करण्यात येईल.
OBC /VJNT अनुदान
या योजनेंतर्गत लाभार्थीना अदा करण्यात येणारी व्याज परतावाची रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.
योजनेचे मुल्यांकन
सदर योजनेचे मुल्यांकन आवश्यकतेनुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून विहित कार्यपध्दती अवलंबून करण्यात येईल.
तसेच या योजनेचा आढावा १ वर्षाने घेतला जाईल व सदर योजना सुरु ठेवावी किंवा कसे याचा निर्णय घेण्यात येईल.
मा.मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नविन लेखाशिर्ष प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.