Kalakar Madat Yojana अर्ज, पात्रता, अटी व कागदपत्रे
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉकडाऊन लागू होता Kalakar Madat Yojana.
लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले.
तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे,
त्यांची आर्थिक कुचंबणा झाली आहे. इतर राज्यांमध्ये कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Kalakar Madat Yojana ठोक एकरकमी अनुदान देण्यात आलेले आहे.
राज्यातील विविध विभागांमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या जनसामान्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे,
याच धर्तीवर राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनामार्फत आर्थिक मदत प्राप्त व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध संघटना, संस्था व कलाकार यांनी केली आहे. सदर मागणी विचारात घेऊन अशा कलाकारांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Kalakar Madat Yojana शासनाचा जि.आर.डाऊनलोड करा
कलाकार मदत योजना – मदतीचे स्वरूप

अ. एकल कलाकाराने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला (स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राहय)
- तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला
- कलेच्या क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे
- आधार कार्ड व बँक खाते तपशील
- शिधापत्रिका सत्यप्रत
- जिल्हा स्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलाकारांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर करावी. त्यानंतर संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हाधिकारी यांच्याकडून शिफारस करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करतील.
Kalakar Madat Yojana पात्रता निकष व अटी
- महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार
- महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य कलेच्या क्षेत्रात १५ वर्षे कार्यरत वार्षिक उत्पन्न रुपये ४८,०००/- च्या कमाल मर्यादेत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
अर्जाचा नमुना एकल कलाकार

ब. समूह लोककलापथकांचे चालक/ मालक/ निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी सादर करावयाची कागदपत्रे व निवड पध्दती
समूह लोककलापथकांचे चालक/ मालक/ निर्माते यांच्या निवडीसाठी संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय
यांच्याकडून खालीलप्रमाणे निवड समिती तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या स्तरावर छाननी समिती गठीत करण्यात येईल.
सदर निवडीसाठी संचालनालयाकडून वर्तमानपत्रातून जाहिरात प्रसारित करून पथकांकडून अर्ज मागविण्यात येतील.
छाननी समितीमार्फत प्राप्त अर्जाची पडताळणी करून अर्ज संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीसमोर सादर करेल.
त्यातून पात्र पथकांची अंतिम निवड, निवड समिती करेल व निवड झालेल्या संस्थांची नांवे शासनाकडे शिफारस करेल.
शासनाकडून शासन निर्णय निर्गमित झाल्यावर अंतिम शिफारस करण्यात आलेल्या संस्थांच्या बँक खात्यात संचालनालयामार्फत रक्कम वर्ग करण्यात येईल.
अर्जदाराने जोडावायची कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- कंपनी कायदा किंवा सोसायटी कायदा, विश्वस्त कायद्यांतर्गत किंवा एमएसएमई अंतर्गत पथक नोंदणीचे प्रमाणपत्र
- कलापथकात काम करणा-या कलावंतांची नावे व पत्ते
- लोककलापथकांचे चालक/ मालक/ निर्माते यांचे आधार कार्ड व बँक खाते तपशील
- केवळ कलेवरच गुजराण असल्याचे तसेच एकरकमी कोविड दिलासा पॅकेजचा लाभ घेणार नसल्याचे व दिलेली माहिती खोटी आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनेतून कायमस्वरूपी अपात्र करण्यात येईल, हे माहित असल्याचा उल्लेख असलेले प्रतिज्ञापत्र
- शाहिरी, खडीगंमत, दशावतार, झाडीपट्टी, संगीतबारी, तमाशा, टुरिंग टॉकीज, सर्कस, विधीनाटय पथकांसाठी, पथकाने आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ५० कार्यक्रमांचे सादरीकरण केले असल्याबाबतचे किमान ५० आयोजकांची पत्रे/ हॅण्डबील /कार्यक्रम पत्रिका/ वर्तमानपत्रातील जाहिरात /बातमी/ ग्रामसेवक /सरपंच यांचे कार्यक्रम सादर केल्याचे प्रमाणपत्र
- संगीतबारीसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान १०० प्रयोग केल्याचे कलाकेंद्र प्रमुख/ आयोजकांची पत्रे/ हॅण्डबील /कार्यक्रम पत्रिका | वर्तमानपत्रातील जाहिरात /बातमी / ग्रामसेवक /सरपंच यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
- नाट्यसंस्थांसाठी आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून किमान तीन वर्षे सातत्याने दरवर्षी सरासरी किमान ३० प्रयोग केल्याची नाट्यगृह भाडेपावती, जाहिरात, तिकीट हे पुरावे जोडणे आवश्यक.
Kalakar Madat Yojana अर्जाचा नमुना समुह लोक कलापथक

-
ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
-
फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana
-
प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana
-
E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख
पात्रता निकष व अटी
-
ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana
ग्राम सुरक्षा यंत्रणा Gram Suraksha Yantrana महाराष्ट्रात आता सुरू करण्यात आली असून, याव्दारे आता एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांसोबत संपर्क साधता येतो. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर आग, चोरी, दरोड, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहन चोरी, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी, विबट्या, तरस, लांडगा यांचा हल्ला अशा प्रकारच्या घटनांमधे तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी…
- कंपनी कायदा / सोसायटी कायदा / विश्वस्त कायद्यांतर्गत तसेच M. S. M. E. अंतर्गत संस्था नोंदणीकृत असावी.
- मागील ५ वर्षापासून संस्था कार्यरत असावी.
- संस्थांनी आर्थिक वर्षात सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या ३ वर्षात वर नमूद केल्याप्रमाणे कार्यक्रमांचे / प्रयोगाचे सादरीकरण केलेले असावे.
अर्ज कोणाकडे करावा
- वैयक्तिक कलाकारांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारामार्फत अर्ज सादर करावेत.
- समूह/संस्था/फड/पथके यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या मुख्यालयात किंवा पुणे/नागपूर/औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयांमार्फत अर्ज सादर करावा.
महत्वाची टीप
- अर्ज सादर करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे विनामुल्य असून अर्जदाराला अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
- अर्ज भरुन घेण्यासाठी शासनाने कोणत्याही खाजगी व्यक्ती/संस्था/संघटना यांची नेमणूक केलेली नाही.
- अधिक माहितीसाठी https://www.mahasanskruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.