Kamgar Nondani Online Registration कामगार नोंदणी

2
4764

Kamgar Nondani Process || बाधकाम व घरगुती कामगार नोंदणी

इमारत व बांधकाम कामगारांसाठी  तसेच घरगुती कामगारांसाठी Maharashtra Kamgar Nondai करता येते.

शासनाकडून इमारत व बांधकाम कामगांरा विविध योजना अंतर्गत लाभ दिल्या जातात. कामगारांना शासनाकडून विविध लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

  • Gram Suraksha Yantrana Mahiti

    ग्राम सुरक्षा यंत्रणा नोदणी, माहिती, उपयोग Gram Suraksha Yantrana

  • Falbag Lagvad Anudan Yojana

    फळबाग अनुदान अर्ज सुरू Falbag Lagvad Anudan Yojana

  • pradhan mantri awas yojana

    प्रधानमंत्री आवास योजना अर्ज सुरू pradhan mantri awas yojana

  • e pik pahani last date

    E Pik Pahani Last Date 2023 ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख

ऑनलाईन Maharashtra Kamgar Nondani करण्यासाठी खालील बटन वरती क्लिक करा

kamgar nondani
kamgar nondani

घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना

  • Maharashtra Kamgar Nondani केल्या नंतर घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना
  • सदर अधिनियमाच्या कलम 10 अन्वये घरेलू कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे.
  • अपघात घडल्यास लाभार्थींना तात्काळ सहाय्य पुरविणे,
  • लाभार्थींच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे,
  • लाभार्थींच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैदयकीय खर्चाची तरतूद करणे,
  • महिला लाभार्थींकरीता प्रसुती लाभाची तरतूद करणे,
  • लाभार्थीचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे.

Kamgar Nondani Scheme Details

योजनेचे नावKamgar Kalyan Yojana
योजनेला सुरूवात2021
राज्यmaharashtra
अधिकृत संकेतस्थळhttps://mahakamgar.maharashtra.gov.in/
Online Kamgar Nondani Form Linkhttps://mahakamgar.maharashtra.gov.in/worker-mr.htm
Kamgar Nondai

मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ

जनश्री विमा योजना

  • घरेलू कामगारांना जनश्री विमा योजना लागू झालेली आहे. सदर योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ दिले जातात.
  • जनश्री सदस्याचा नैसर्गिक मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारास रु.30000/- देण्यात येते.
  • अपघाती मृत्यु ओढवल्यास त्याच्या वारसदारस रु.75,000/- देण्यात येते.
  • अपघातामुळे कायम स्वरुपी संपुर्ण अपंगत्व ओढवल्यास सदस्यास रु.75,000/- देण्यात येते.
  • अपघातामुळे कायमस्वरूपी अशत: अपंगत्व आल्यास सभासदास रू.37,500/- देण्यात येते.
  • याशिवाय सदस्यांच्या मुलांना शिक्षणाकरिता शिक्षा सहयोग योजने अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी करिता तसेच आय.टी.आय. चा कोर्स करीत असल्यास, दरवर्षी उर्त्तीण होत असल्यास, दर तिमाही करिता रु.300/- इतकी रक्कम प्रत्येकी (जास्तीत जास्त दोन मुलांकरिता ) देण्यात येते.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत एका जनश्री सदस्याचा वारसदारास नैसर्गिक मृत्यूबाबत रू.30000/- रक्कम अदा करण्यात आली आहे.

अंत्यविधी सहाय्य

  • मृत घरेलू कामगाराच्या कायदेशिर वारसास अंत्यविधी सहाय्य रु.2,000/- देण्यात येते.

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत घरेलू कामगाराला व त्यांच्या पाल्यांना शिकावू उमेदवार प्रशिक्षण व मॉड्यूलर एम्प्लॉएबल स्किम अंतर्गत प्रशिक्षण देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे.

सदर योजना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार आहे.

घरेलू कामगार मंडळाच्या दि. 28.09.2012 च्या बैठकीत घरेलू कामगारांना प्रसुतीलाभ देण्याबाबत ठराव करण्यात आला असून

त्याअंतर्गत घरेलू कामगारास दोन अपत्यापर्यंत प्रत्येक प्रसुतीकरीता रु.5,000/- इतकी मदत देण्यात येणार आहे.

विदेशी भाषा प्रशिक्षण

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत विदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग घेतले जातात. नोंदीत घरेलू कामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्यात येणार आहे व यावर होणारा खर्च घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठामार्फत पदविका व पदवी अभ्यासक्रम

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार पदविका अभ्यासक्रम व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरेलू कामगारांना व त्यांच्या मुला-मुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे रु. 900/- व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी रु. 650/- मंडळातर्फे देण्यात येणार आहे.

योजनेबाबत अधिक माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

Maharashtra Kamgar Nondani
Adv