Thibak Sinchan Anudan Yojana ऑनलाईन अर्ज ठिबक सिंचन 80% अनुदान

1
5294

ठिबक सिंचनासाठी सरसकट आता मिळणार 80 टक्के अनुदान Thibak Sinchan Anudan Yojana

Thibak Sinchan Anudan Yojana मधुन शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच खरेदिसाठी अनुदान दिल्या जाते.

राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांना ठिबंक संच अनुदान देण्यासाठी राबविल्या जात आहे.

आधी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 % व इतर शेतकऱ्यांना 45% अनुदान दिल्या जात होते.

आता मात्र ठिबक सिंचन संच खरेदिसाठी शासनातर्फे सरसकट 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

याआधी 80 टक्के अनुदान फक्त 246 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिल्या जात होते.

आता मात्र सरसगट राज्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच खरेदिसाठी 80 टक्के अनुदान दिल्या जाणार आहे.

ठिबक सिंचन अुनदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी (Thibak Sinchan Anudan) खालील लिंक वरती क्लिक करा

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

Thibak Sinchan Anudan Yojana
Thibak Sinchan Anudan Yojana

ठिबक सिंचन अनुदान योजना Thibak Sinchan Anudan Yojana माहिती

Scheme NameThibak Sinchan Anudan Yojana (ठिबक सिंचन अनुदान योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
योजना वर्ष2021-2022
जि.आर.डाऊनलोड करायेथे क्लिक करा
कृषी विभाग संकेतस्थळhttp://krishi.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज लिंकhttps://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
Thibak Sinchan Anudan Yojana Information

पात्रता – ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी

खालील पात्रता धारक शेतकरी ठिबंक सिंचन अनुदान योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र राहणार आहे.

  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  • शेतकऱ्याकडे 7/12 प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याने 2016-17 च्या आधी Thibak Sinchan Anudan घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 10 वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने 2017-18 च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील 7वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलाची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  • शेतकऱ्यांना 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
Thibak Sinchan Subsidy Scheme
Thibak Sinchan Subsidy Scheme

Thibak Sinchan Anudan Yojana ठिबक सिंचन अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 प्रमाणपत्र
  • 8-ए प्रमाणपत्र
  • वीज बिल
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • पूर्वसंमती पत्र

ठिबक सिंचन अनुदान योजनेचे उद्दिष्ट्ये

  • राज्यातील बहुतांश शेती पाण्याखाली आणणे.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • कमी पाण्याचा उपयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना सुविध उपलब्ध करणे.
  • कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवणे.
  • ठिबक सिंचनाचा उपयोग वाढवून पाण्याची बचत करणे.
  • अल्प उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • आर्थिक दृष्ट्या मागसलेल्या शेतकऱ्यांना Thibak Sinchan उपलब्ध करणे.
ठिबक सिंचन अनुदान योजना
ठिबक सिंचन अनुदान योजना

Thibak Sinchan Yojana चे फायदे

  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार.
  • जास्त शेती ओलीताखाली येणार.
  • पाण्याची बचत वाढणार.
  • शेतीला चालणा मिळणार.
  • तण नियंत्रण होणार.

ठिबक सिंचन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहावा

Thibak Sinchan Yojana Online Form Fill-up Procedure
Adv