OBC, VJNT Mahamandal कर्ज योजना Online Form

1
2203

OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत

ज्या प्रमाणे मराठा समाजाला व्याज परतावा योजना राबविल्या जाते त्याचप्रमाणे OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे सुध्दा Karj Yojana राबविल्या जाते.

OBC Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

https://msobcfdc.in/

VJNT Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf

जि.आर.डाऊनलोड करण्यासाठीची खालील लिंक वरती क्लिक करा

https://msobcfdc.in/downloads/201901311225012722.pdf

OBC Mahamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

http://www.msobcfdc.org/contacUs

VJNT Mhamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

http://www.vjnt.in/ContactUsNew.aspx

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष योजनेनुसार बँकेकडून घेतलेल्या रु.१०.०० लाखा पर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज (जास्तीत जास्त १२% पर्यंत) परतावा योजना OBC Mahamandal Karj Yojana महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित)  आणि VJNT Mahamandal Karj Yojana वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबविण्यास या शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील.

OBC, VJNT Mahamandal
obc, vjnt mahamadal karj yojana

OBC, VJNT Mahamandal कर्ज योजनेचा उद्देश

बँकेमार्फत लाभार्थीना रु. १०.०० लक्ष पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल.

सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल.

OBC/VNJT Mahamandal Karj Yojana पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा

सध्या महामंडळाच्या योजने करीता लाभार्थीच्या पात्रतेचीग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लक्ष कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.

सदर उत्पन्न मर्यादेत वाढ करुन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेप्रमाणे सदर योजनेकरिता

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रु. ८.०० लक्ष इतकी राहील. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)

Yojana Nameव्याज परतावा योजना, OBC Karj Yojana, VJNT Karj Yojana
Yojana Start Year2019
OBC Mahamandal Online Formhttps://msobcfdc.in/  
VJNT Mahamandal Online Formhttp://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN  
OBC Karj Yojana Form Downloadhttp://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf  
OBC Mahamadal Contacthttp://www.msobcfdc.org/contacUs  
VJNT Mahamandal Contacthttp://www.vjnt.in/ContactUsNew.aspx  
obc, vjnt mahamadal karj yojana

प्रकल्प क्षेत्रानुसार लक्ष्यांक अंदाजपत्रक

१. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम एकूण आर्थिक तरतुदीच्या ६०% रक्कम

२. लघु उद्योग व मध्यम उद्योग –

(अ) उत्पादन २) व ३) साठी एकूण आर्थिक तरतुदीच्या

(ब) व्यापार व विक्री ४०% रक्कम

३. सेवा क्षेत्र

लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी

  1. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. वय वर्ष १८ ते ५० वर्ष असावे.
  3. लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
  4. वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
  5. उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  6. उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  7. उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवातत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
  8. कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

परताव्याच्या अटी

  1. जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
  2. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.

OBC / VJNT Mahamandal लाभार्थ्यांस कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा

उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत)

त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत असुन प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.

महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही Charges/Fees/देयके अदा करणार नाही.

  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे

    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती…

  • Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड

    महाराष्ट्र राज्यात मागील खरीप हंगामामधे दुष्काळ पडलेला होता त्याबाबतची Dushkal Anudan Yadi 2024 कशी मिळवायची याबाबत खाली माहिती दिलेली आहे. राज्यामधील बऱ्याच तालुक्यांमधे साधारण जून ते सप्टेंबर या मधल्या कालावधी मधे पावसाची मोठी तूट पहायला मिळाली. या कालावधीमधे भूजलाची पातळी सुध्दा मोठ्या प्रमाणात खालावलेली होती. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या विविधी निकषांचा विचार करून शासनाने राज्यातील बहुतांश…

  • Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय

    महाराष्ट्र सरकारणे मराठा आरक्षणाकरीता kunbi nondi शोधमोहिम राबविलेली आहे, kunbi nondi download या शोधमोहिमेतून गावनिहाय kunbi, kunbi maratha, maratha kunbi, karatha ku, ku maratha अश्या प्रकारच्या नोंदींचे अभिलेख सापडलेले आहेत. या करीता Shinde Samiti ची स्थापना सुध्दा करण्यात आली. Kunbi Maratha nondi list downlod चे गावनिहाय जे अभिलेख सापडले ते आता जनतेकरीता online kunbi nondi…

  • Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration

    प्रधानमंत्री सूर्योदय योजना Pradhan Mantri Suryodaya Yojana के तहत हर घर सोलार Har Ghar Solar कुल 1 करोड से भी ज्यादा घरो मे सोलर पैनल के माध्यम से बिजली मुहया कि जा रही है, रूफटॉप सोलन पैनल Rooftop Solar Pannal का उपयोग किया जाएगा. इस लेख मै हम प्रधानमंत्री सूर्योदय योजना कि पात्रता, Pradhan Mantri…

  • अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi  

    राज्यामधे Avkali Pauss पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नोव्हेंबर 2023 या कालावधीमधे अवेळी पाऊस तसेच गारपीट होऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत म्हणून Avkali Pauss Nuksan Bharpai 2023 जाहिर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडून दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी जि.आर. प्रकाशित करून मदतीकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. सदर निधीचे…

OBC/ VJNT Karj Yojana करीता उमेदवारांची नांव नोंदणी

उमेदावारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल

प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्ती नुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास

उमेदवारास संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of intent) / मंजूरीपत्र दिले जाईल.

उमेदवाराने या आधारे बँकेकडून कर्ज प्रकरणांवर कर्ज मंजूर करुन घ्यावे.

योजनेचे सर्वसाधारण सनियंत्रण

(अ.) दरवर्षी महामंळामार्फत केले जाईल.

(ब.) महामंडळाचे जिल्हा स्तरावरील योजनेच्या अंमलबजावणीचे काम आवश्यकतेनुसार

मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी भेट देऊन तपासतील.

OBC Mahamandal Karj Yojana / VJNT Mahamandal Karj Yojana लाभार्थ्यांची निवड

या व्याज परतावा योजनेचा लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून

या समितीत लाभार्थ्यांनी त्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे व्यवस्थापक, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त,

समाज कल्याण हे सदस्य असतील व संबंधित महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतील.

या योजनेंतर्गत संपुर्ण कर्ज रक्कम बँक देणार असल्याने सदर प्रस्ताव जिल्हा लाभार्थी निवड या समितीमार्फत करण्यात येईल.

प्रति जिल्हा किमान १०० लाभार्थीना सरासरी रु. १०.०० लक्ष प्रकल्प किंमतीचे प्रस्ताव मंजूर होतील

याप्रमाणे प्रति जिल्हा रु. १०.०० कोटी मंजूर प्रकरणात सर्व ३६ जिल्हयातील

प्रति वर्षी बँकेमार्फत मंजूर ३६०० लाभार्थीना रु. ३६०.०० कोटी निधी बँकेमार्फत वितरीत केलाजाईल.

त्यावर १२ टक्के प्रमाणे व्याज परतावासाठी रु.५०.०० कोटी महामंडळ सहायक अनुदानातून मंजूर करण्यात येईल.

OBC /VJNT अनुदान

या योजनेंतर्गत लाभार्थीना अदा करण्यात येणारी व्याज परतावाची रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.

योजनेचे मुल्यांकन

सदर योजनेचे मुल्यांकन आवश्यकतेनुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून विहित कार्यपध्दती अवलंबून करण्यात येईल.

तसेच या योजनेचा आढावा १ वर्षाने घेतला जाईल व सदर योजना सुरु ठेवावी किंवा कसे याचा निर्णय घेण्यात येईल.

मा.मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नविन लेखाशिर्ष प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.

Adv