Sharad Pawar Gram Samrudhi Yojana गाय म्हैस, शेळी, कुक्कूट शेड अनुदान

0
521

मी समृध्द तर गाव समृध्द आणि गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना Sharad Pawar Gram Samrudhi Yojana मंध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरीता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कूटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार असून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबविण्याचा निर्णय दिनांक 9 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होते.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृध्द होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे.

sharad pawar gram samrudhi yojana
sharad pawar gram samrudhi yojana

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याव्दारे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा आहे. उपरोक्त कामांसाठी आवश्यक असणारे 60 : 40 अकुशल कुशल प्रमाण संतुलीत राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामिण हमी योजना अंतर्गत विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेलया योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृध्द होतील असा या योजनेचा उद्देश आहे.

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana या योजनेमधून खालील बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे

  • गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे
  • शेळीपालन शेड बांधणे
  • कुक्कूटपालन शेड बांधणे
  • भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

[su_divider top=”no”]

Sharad Pawar Gram Samrudhi Yojana – गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे

जनावरांसाठी गोठ्यांची जागा ही ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असत्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. तसेच मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रूपये खर्च येईल. यासाठी 6 गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान Sharad Pawar Gram Samrudhi Yojana मधुन देय राहणार आहे.

Sharad Pawar Gram Samrudhi Yojanaशेळीपालन शेड बांधणे

शेळ्यां मेढ्या योजनेमधून चांगल्या प्रतीचे शेड बांधल्यामुळे या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकेल. शेळी ही गरीबांची गाय समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमीहिन शेतकऱ्याला स्वत:च्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. 10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान 2 शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजेला लाभ देता येऊ शकणार आहे. एका शेडसाठी 49 हजार 284 रूपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता 3 पट अनुदान मंजुर करण्यात येईल.

कुक्कूटपालन शेड बांधणे

कुक्कूटपालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कुक्कूटपक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे तसेच त्यांच्या पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. प्रत्येक शेडला 49 हजार 760 रूपये खर्च अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्विरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी Sharad Pawar Gram Samrudhi Yojana मधुन उपलब्ध करून देण्यात येईल.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग

शेतातील कचऱ्यावर कंपोस्टींगव्दारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सुक्ष्म जिवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात एक नाडे बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती, आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. 2 ते 3 महिन्यात काळपट तपकीरी भुसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहीत कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रूपये खर्च साधारण येतो.

Sharad Pawar Gram Samrudhi Yojanaमंत्रिमंडळ निर्णय डाऊनलोक करण्यासाठी येथे क्लिक करा

Adv