दोन गुंठ्या पर्यंन्त जमीनीची तुकडे पाडून विक्री करायची असेत तर जमिनीचा एन.ए. करावा लागतो
जमिनीचा एन.ए. Non Agriculture Land कायदेशीर प्रक्रियेनुसार करून जमिनीचे छोटे-छोटे तुकडे करून विकता येते.
दिनांक 12 जुलै 2021 रोजी आय. जी. आर. (IGR) म्हणजेच इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्टार यांनी परिपत्रक काढूण त्यात असे सांगितले आहे की आता पर्यंत गाव पातळीवर 11 गुंठ्याची शेती विकत घेतली जायची आणि तिचा अकरा लोकांचा एकत्रीत सामूहिक सातबारा तयार केला जायचा मात्र हा सगळा प्रकार बेकायदेशीर आहे. आता Jaminicha NA करावा लागणार आहे. आतापर्यंन्त चालणाऱ्या या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी 12 जुलै रोजी परिपत्रक काढुन सर्व रजिस्टार यांना कळविण्यात आले कि 12 जुलै नंतर एकही सातबारा सामूहिक रीत्या रजिस्टर केला जाणार नाही 11 गुंठ्याचे 11 प्लॉट पाडून अकरा जणांना विकायचे आणि 11 जणांचा सामूहिक सातबारा रजिस्टर करायचा यावरती आता स्पष्टपणे निर्बंन्ध घालण्यात आलेले आहे.
दोन गुंठ्यापर्यंन्त जमिनीचे तुकडे पाडून जमिनीची विक्री करायची असेल तर त्या जमिनीचा एन.ए. करावा लागणार आहे, तरच जमिनीची तुकडे पाडून विक्री करता येणार आहे, म्हणुन आता अशी जमिन चालु सातबारा उताऱ्याने चुकूणही खरेदी करून नका तुमचा व्यवहार हा फसू शकतो. जमिनीचा एन ए केलेल्या जमिनी मधील दोन गुठ्यापर्यंन्त जमिनीची खरेदी करणे कायदेशीररीत्या आता योग्य राहणार आहे.
आता जमिन एक ते दोन गुठे तुकडे करून विकायची आहे त्यांना आपल्या जमिनीचा एन.ए. करून घ्यावा लागणार आहे. जमिनीचा एन.ए. करण्याच्या प्रक्रियेबाबत खाली माहिती दिलेली आहे.
Jaminicha NA करण्यासाठी खालील प्रक्रिया राबवावी लागते
जमिनीचा एन.ए. Jaminicha NA करण्यासाठीचा अर्ज येथे करा
गाव पातळीवर जमिन असेल तर अर्ज तहसीलदाराकडे करावा लागतो.
नगर परिषद सारख्या भागात जमिन असेल तर एस.बी.ओ. कडे अर्ज करावा लागतो.
तसेच शहरी भागात जमिन असेल तर जिल्हाधीकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो.
योजनेचे नाव | Jaminicha NA |
राज्य | Maharashtra |
सुरूवात | 2021 |
NA अर्ज | NA अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा |
Jaminicha NA करीता Arj अर्ज असा करा
1) ज्या जमिनीचा एन.ए करायचा आहे त्या जमिनीची सर्वप्रथम मोजणी करुण घ्यावी
मोजणी हि फक्त सरकारी मोजणीच असावी खाजगी मोजणी सुध्दा केल्या जाते
मात्र शक्यतो सरकारी मोजणीच करावी जि भुमि अभिलेख कार्यालयातर्फे केली जाते,
भुमि अभिलेख कार्यालयाकडे जमिन मोजणी साठी अर्ज करावा लागतो,
जमिन मोजणी करण्याचे दोन प्रकार आहे साधी मोजणी जिला फि कमी लागते दुसरी तात्काळ मोजणी या मोजणीला फि जास्त लागते.
2) भुमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी झाल्यानंतर मोजणीचा नकाशा त्यालाच क प्रत असे म्हणतात,
अशी क प्रत हि 12 प्रती मधे भुमि अभिलेख कार्यालयाकडून घ्याव्यात यासाठी अतिरीक्त फि भुमि अभिलेख कार्यालयाकडून आकारल्या जाते.
3) ज्या जमिनीचा एन.ए. करायचा आहे त्या जमिनीला वॉल कंपान्ड किंवा तारेचे कंपाउन्ड करून घ्यावे.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
[su_divider top=”no”]
NA च्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
1. ज्या जमिनीचा एन.ए. Jaminicha NA करायचा आहे त्या जमिनीचा चालु सात-बारा उतारा व फेरफार उतारा अर्जासोबत जोडावा.
जमिनीचा एन.ए. करीता अर्ज सादर केल्या नंतरची प्रक्रिया कशी असते याबाबत माहिती पाहुयात
- जमिनीचा एन.ए. करण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर संबधीत जमिनी बाबत एन.ओ.सी.
- म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट यालाच ना हरकत प्रमाणपत्र असे म्हणतात ते विविध सरकारी विभागाकडून जिल्हाधिकारी मागवून घेतात,
- या विभागामधे रेल्वे विभाग, PWD विभाग, लष्कर विभाग, एम.एस.ई.बी. विभाग, विमानतळ प्राधिकरण,
- डाऊन प्लॉनिंग विभाग, जलसंपदा विभाग, इत्यादी विभागाकडून संबधीत जमिनीबाबत हरकती मागविल्या जातात,
- कोणतीही हरतकत प्राप्त न झाल्यास एन.ए. च्या अर्जाची प्रक्रिया पुढे सरकते.
- मात्र आता या प्रक्रियेला अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र महसुल अधिनीयम कायद्यात नवीन तरतुद करण्यात आलेली आहे,
- सेक्शन 2, सब सेक्शन 7, क्लॉज अ, या सेक्शन ला आता नव्याने समाविष्ट करण्यात आले असून या सेक्शन ची हेडिंग आहे
- “ आधार सामग्री संचयीका ” या सेक्शन नुसार आता विविध विभागांकडून आधीच त्यांचे ज्या जमिनींच्या गटांबाबत हरकती असतील त्या मागवून घेतल्या जातात,
- जिल्हाधिकारी कार्यालयात आधार सामग्री संचयीका नावाचे रजिस्टर असते त्या मधे विविध विभागांकडून
- विविध जमिनीच्या गटा बाबत ज्या हरकती असतील त्यांची आधीच माहिती मागवून नोंदणी केलेली असती.
- उदा. रेल्वे विभागाचे काम हे एखाद्या गावातील गट नंबर 3 मधे सुरू असेल तर रेल्वे विभागाने आधीच
- जिल्हाधीकारी कार्यालयात आधार सामग्री संचयीकेत गट नंबर 3 मधे कुणी एन.ए. साठी अर्ज केल्यास आमची हरकत असेल याची माहिती नोंदवलेली असते.
- अश्या पध्दतीने विविध विभाग आपआपल्या हरकत असलेल्या जमिनींच्या गटाबाबत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आधार सामग्री संचयीकेत नोदवतात.
- यामुळे आता एखाद्या जमिनीचा एन.ए. Jaminicha NA साठी अर्ज आल्यास त्या जमिनीच्या गट नंबर वरती
- एखाद्या विभागाची हरकत आहे का हे जिल्हाधीकारी कार्यालयाला तात्काळ तपासता येते.
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबधीत Jaminicha NA एन.ए. साठीच्या अर्जावर कोणत्याही विभागाची हरकत नसेल तर
- स्थानिक पातळीवरील कार्यालयाकडे म्हणजेच तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालय याच्याकडे
- तो अर्ज त्यांची काहि हरकत नाही ना याचा अहवाल मागविण्यासाठी पाठविला जातो, तलाठी अथवा मंडळ अधिकारी आपला अहवाल जोडून परत तो अर्ज तहसीलदार किंवा जिल्हाधीकारी यांच्याकडे पाठवितात.
जमिनीचा एन.ए. करण्याचा फी
- दोन प्रकारची फी Jaminicha NA हि एन.ए. करण्यासाठी भरावी लागते या मधे एन.ए. टॅक्स म्हणजेच अकृषीक कर,
- आणि कर्न्व्हजन टॅक्स म्हणजेच कृषक जमिनी मधुन अकृषक जमिन करण्यासाठीचा टॅक्स भरावा लागतो.
- जर जमिन भोगवटादार 02 ची असेल तर नजराना टॅक्स सुध्दा भरावा लागतो
- त्या नंतर संबधीत अधिकाऱ्याकडे अर्ज पाठविला जातो त्यांनंतर अधिकाऱ्याकडून एन.ए. ऑर्डर काढल्या जाते
- एन.ए. ऑर्डर मधे तुम्ही ज्या कोणत्या कारणासाठी एन.ए. साठी अर्ज केला होता त्याचा उल्लेख केला जातो व अर्जासोबत जोडलेल्या विविध ना-हरकत प्रमाणपत्र व इतर माहितीचा उल्लेख एन.ए. ऑर्डर मधे केलेला असतो.
- एन.ए. ऑर्डर मधे कॅन्सलेशन ऑफ एन.एन ऑर्डरचा एक क्लॉज टाकलेला असतो,
- या मधे ज्या काहि कारणासाठी तुम्ही तुमची जमिन एन.ए. केलेली आहे ते काम तुम्ही दिलेल्या वेळेत
- म्हणजेच एक किंवा दोन किंवा तिन वर्ष जे काहि एन.ए. ऑर्डर मधे नमुद केलेले असेल त्या वेळेत केले नाही तर तुमची एन.ए. ऑर्डर हि आपोआप रद्द होते.