Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय

0
9

गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो.

गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे.

Gunthewari Jamin

महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot पेक्षा गुंठेवारी प्लॉट चे दर कमी असतात.

या कारणामुळे सामान्य लोक हे प्लॉट घेण्याकरीता जास्त आकर्षित होतात.

Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
विषयGunthewari Plot Jamin
Actमहाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनीयम 2001
विभागमहसूल विभाग महाराष्ट्र शासन
 राज्य Maharashtra

Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय?

  • खाजगी मालकीची शेतजमीन किंवा इतर जमिनीचे छोटे तुकडे करून त्या तुकड्यांची खरेदी विक्री केल्या जाते.
  • असे छोटे जमिनीचे तुकडे खरेदी करून त्यावरती बांधकाम केले जाते. Gunthewari Mhanjay Kay
  • गुंठेवारी शब्द हा गुंठा या शब्दावरून निर्माण झाला आहे, गुंठा हे जमीन मोजण्याचे एकक आहे, 1 एकर जमीन म्हणजे 40 गुंठे जमीन होय, 1 गुंठा जमीन म्हणजे 1089 चौरस फूट इतकी जमीन होय.
  • जमीनीचे तुकडे करून एन ए (NA – Non-Agriculture) परवाणगी न घेता तसेच नगररचना विभागाची परवानगी न घेता केलेली खरेदी विक्री अनधिकृत ठरते. गुंठेवारी करून प्लॉट खरेदी विक्री हि प्रक्रिया तुकडेबंदी कायद्याचे Tukdebandi Kayda सुध्दा उल्लघन करते.
  • कोणत्याही जमीनीचे तुकडे करून विक्री करावयाची असल्यास त्या जमीनीचा एन ए NA करणे आवश्यक ठरते, एन ए म्हणजे जमीनीचा शेती वापरात बदल करून ती शेती इतर कराणांकरीता (उदा. रहिवाशी घरे, पेट्रोल पंप, कारखाणे, शाळा, ढाबा) वापरण्याची शासकिय परवाणगी होय.

तुकडेबंदी कायदा आणि गुंठेवारी

Tukde Bandi Kayda 1947
Tukde Bandi Kayda 1947
  • महाराष्ट्रात तुकडेंबदी कायद्यामुळे शेतजमिनीचे विनापरवाणगी काहि भागात 16 गुंठेपेक्षा कमी तर काहि भागात 21 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे पाडता येत नाही.
  • जमीन विकायची असेल तर 16 किंवा काहि भागात 21 गुंठे जमीन एकत्रित विकावी लागते.
  • गुंठेवारी प्लॉट च्या खरेदी विक्री मधे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन होते, गुंठेवारी करून जमीनीचे छोटे छोटे प्लॅाट केले जातात, ते प्लॉट एक गुंठ्यापेक्षा कमी किंवा एक गुंठा ते दोन गुंठ्यापर्यंन्त केले जातात.
  • तुकडेबंदी कायद्यानुसार काहि भागात 16 गुंठे तर काहि भागात 21 गुंठे पर्यंन्तचा जमीनीचा तुकडा पाडण्याची परवाणगी आहे. यामुळे गुंठेवारीमुळे तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन होते. यामुळे सुध्दा गुंठेवारी अनधिकृत ठरते.
  • (टिप. 14 मार्च 2024 रोजी शासनाने अधिसूचना काढून विहिर, शेतरस्ता, ग्रामीण घरकुल योजना, सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन करणे किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी उरलेल्या शिल्लक जमिनीसाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणली यामुळे फक्त याच कारणांकरीता गुंठ्यामध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे.)
Maharashtra Gunthewari Vikas Adhiniyam 2001
Maharashtra Gunthewari Vikas Adhiniyam 2001

Gunthewari Niyamit Kashi Karavi गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया (Gunthewari Mhanjay Kay)

अनियमीत गुंठेवारी बांधकाम 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे असायला हवे, त्यापुढील बांधकामांना अद्याप नियमीत करण्यास पनवाणगी नाही.

गुंठेवारी अनधिकृत बांधकाम नियमित करण्याकरीता संबधीत क्षेत्रातील महानगरपालिका किंवा नगररचना विभागाकडे बांधकाम नियमीत करण्याबाबत कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा लागतो.

प्रस्तावासोबत जमीनीचा 7/12 उतारा, वीज बिल (31 डिसेंबर 2020 आधीचे असावे), सर्वेक्षण नकाशा, इमारत बांधकाम आराखडा, आधार कार्ड, फोटो ई. कागदपत्रे द्यावी लागतात.

अनियमीत गुंठेवारी बांधकाम नियमीत करण्याकरीता नियमितीकरण विकास शुल्क सुध्दा भरावे लागते.

नियमितीकरण शुल्क हे Development control Regulations आणि सरकारी रेकनर मूल्यावरती ठरवीले जाते.

गुंठेवारी नियमीत करून घेण्याचे फायदे Gunthewari Niyamit Krun Ghenyachay Fayde

  • अनधिकृत बांधकामांना कायदेशीर मान्यता मिळून असे बांधकाम अधिकृत होते.
  • अधिकृत झालेल्या मालमत्तेची खरीदी विक्री किंवा हस्तांतरण करणे कायदेशीर शक्य होते.
  • नियमीत केलेल्या मालमत्तेवरती बँकेकडून कर्ज घेणे शक्य होते.
  • महानगरपालिका, नगरपालिका अश्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज अश्या सुविधा घेता येतात.
  • मालमंत्तेची किंमत वाढते.
  • अतिक्रमण कारवाई, अवैध कब्जा, यांचा धोका टाळता येवू शकतो.
  • गुंठेवारी प्लॉट खरेदी करतांनी सावधगिरी घ्यायला हवी, गुंठेवारी केलेली जमीनीची मालकी तपासणे सुध्दा आवश्यक असते.
  • गुंठेवारी जमीन वर्ग 1 किंवा वर्ग 2 यापैकी कोणती आहे हे सुध्दा पहाणे आवश्यक आहे.

शहरागलतच्या जमीनीवरती नगररचना विभागाचा पुढील काळाकरीताचा Draft Development Plan तयार केलेला असतो टाऊन प्लॉनिंग (Town Planning) या Plan मधे संबधीत जमीनीवरती कोणते आरक्षण तर पडलेले नाही ना हे पाहणे सुध्दा महत्वाचे असते.

विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा

https://telegram.me/Tech_With_Rahul

विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा

www.youtube.com/techwithrahul

Adv