डिजीटल 7/12 उतारा व 8 अ उताऱ्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा

2
318

शेतकऱ्यांना 7/12 उतारा व एकुण जमिनीचा दाखला म्हणजेच 8अ उतारा डिजिटल सहीयुक्त ऑनलाईन मिळत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे काहि महिन्यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला होता.

7/12 उतारा व एकुण जमिनीचा दाखला म्हणजेच 8 अ उतारा हा आता डिजीटल स्वरूपात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाल्यापासून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे, शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध ऑनलाईन अर्ज भरावे लागतात, ऑनलाईन अर्ज सादर करतांना जमिनीचा पुरावा म्हणून 7/12 उतरा तसेच 8 अ उतारा ऑनलाईन अपलोड करावा लागतो, डिजीटल स्वरूपातील 7/12 उतारा व 8 अ उतारा सूविधा सूरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दोन्ही उतारे मिळवीण्यासाठी तलाठी कार्यालय तसेच तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागत असे, मात्र आता ऑनलाईन सुविधा देणाऱ्यांकडे तसेच स्वत: रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून डिजीटल स्वरूपातील उतारे ऑनलाईन हवे तेव्हा मिळवीता येत आहे.

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागामार्फत दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासुन डिजिटल 8 अ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल 8 अ सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तेव्हा करण्यात आला होता.

श्री. थोरात शुभारंभाच्या भाषनावेळी म्हणाले होते की, शासकीय कामात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच या विभागाला प्रशासनाचा कणा असे म्हणतात. महाराष्ट्राच्या विकासात आजपर्यंत या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले असून यापुढील काळातही हा विभाग सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील असा विश्वास आहे. गेला चार महिन्यापेक्षा अधिकचा काळ आपण सर्व कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करीत आहोत, या काळात राज्यातील महसूल यंत्रणा सक्षमपणे काम करीत होती याचा मला अभिमान वाटतो.

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल 7/12 उतारा घेतला आहे त्याचप्रमाणे आता डिजिटल ८ अ उताऱ्याला सुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे.  महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असेही आवाहन श्री. थोरात यांनी केले.

डिजिटल सही युक्त 8 अ उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr

Adv