PM Kisan योजना- शेतकऱ्यांची गावनिहाय यादि प्रसिध्द

1
778

केंद्र सरकार सरकारतर्फे देशातील शेतकऱ्यांसाठी “प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना” म्हणजेच PM Kisan योजना राबविल्या जात आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येतात. केंद्र सरकारतर्फे वर्षाला एकुण 6000 हजार रूपये दोन-दोन हजाराच्या तिन टंप्यात शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जातात.

PM Kisan

कोरोना आजाराच्या पार्श्वभुमिवर देशात लॉकडाऊनची घोषना करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात देशातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणुन या योजनेच्या पैशाचे हंप्ते लवकर जमा करण्यात आले आहे. आता या योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ज्या शेतकऱ्यांना या योजनेतुन लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादि प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आता बरेच नविन बदल करण्यात आले आहे, आता या संकेतस्थळावर ज्या शेतकऱ्यांची नोदणी या योजनेसाठी झालेली नाहि त्या शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी करता येणार आहे, तसेच लाभार्थ्याची स्थिती पाहणे, आधार कार्डची माहिती अपडेट करणे, गावनिहाय लाभार्थ्यांची यादि पाहणे इत्यादि अनेक योजनेशी संबधीत नविन बदल संकेतस्थळावर करण्यात आले आहे.

Adv