Hakka Sod Patra हंक्कसोड पत्र – वडिलांच्या संपत्तीतुन मुलीचा हंक्कसोड

0
12817

Hakka Sod Patra हंक्कसोड पत्र माहिती, मुलीचा अधिकार

Hakka Sod Patra एकत्र कुटंबातील कोणत्याही एका सदस्याने म्हणजेच सहहिस्सेदाराने

त्याच्या स्वत: च्या वैयक्तिक हिश्याच्या मिळकतीवरील हक्क जाणुन बुजून कायमस्वरूपी

कायदेशीर दृष्ट्या सोडुन देणे म्हणजेच हंक्कसोडपत्र होय.

बऱ्याचदा कुटुंबातील एखाद्या सदस्याला विविध कारणामुळे वडिलोपार्जित संपत्तीमंध्ये वाटा नको असतो.

अश्या वेळी ती व्यक्ती आपल्या वाट्याच्या संपत्तीवरील हंक्क सोडून देवुन शकते.

संपत्तीवरील आपला हंक्क कायदेशिररित्या सोडून देण्याच्या प्रक्रियेला हंक्कसोडपत्र असे म्हणतात.

उदा. एकत्र कुटुंबातील A,B,C, या तिन व्यक्ती असुन यापैकी C या व्यक्तीने आपल्या

वैयक्तिक हिश्याच्या मिळकतीवरील हंक्क सोडुन देऊन A व B यांना हंक्क दिला.

Hakka Sod Patra
Hakka Sod Patra

Hakka Sod Patra Details

Document NameHakka Sod Patra हंक्कसोड पत्र
StateMaharashtra
Info. RelatedProperty
हक्कसोडपत्र

हंक्कसोडपत्र कोण करू शकते ?

एकत्र कुटुंबातील कोणताही सदस्य मग तो स्त्री असो अथवा पुरुष हक्कसोडपत्र करू शकतो.

कोणत्या मालमंत्तेचे म्हणजेच मिळकतीचे हक्कसोडपत्र करता येते ?

वारसाहक्काने किवा वारसाधिकाराने एखाद्या व्यक्तीस मिळालेली मिळकत अथवा मिळु शकणार आहे.

अशी एकत्र कुटंबातील त्याच्या हिश्याच्या मिळकतीच्या संबंधात हक्कसोडपत्र करता येते.

उदा. गणेश, विनोद, सुजाता हे तिघे भाऊ व बहिन असुन त्यांच्या वडिलांची वडीलोपार्जीत

सहा एकर शेती असुन सुजाता हिच्या हिश्याला येणाऱ्या वडीलोपार्जीत दोन एकर हिश्यावरील

हक्क सुजाता आपल्या दोघा भावासाठी सोडु शकते.

घर, शेती, व इतर स्थावर मालमंत्तेसंदर्भात सुध्दा हक्क सोडपत्र करता येते.

  • Pardesh Krushi Abhyas Daura
    परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh… Read more: Pardesh Krushi Abhyas Daura
  • kharif pik vima 2025 online form
    पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता… Read more: kharif pik vima 2025 online form
  • Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
    गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot… Read more: Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
  • AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
    राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची… Read more: AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
  • Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
    मित्रांनो आता खरीप 2024 पीक विमा, Kharip 2024 Pik Vima, जवळपास आडवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्या नंतर सुरू होणार आहे, आणि त्या नंतर पेरण्या झाल्यावर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा खरीप 2024, Pik Vima Online Form 2024 भरण्याकरीता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल, मित्रांनो आता खरीप हंगाम 2024 करीता, पीक विमा काढण्याकरीता किंती पैसे लागतील, कोण कोणती… Read more: Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
  • Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
    महाराष्ट्र राज्यामधे Pocra 2.0 Dusra Tappa सुरू होत असून, त्याबाबत महत्वाची माहिती समोर आलेली आहे, Pocra Dusra Tappa मधे कोण कोणत्या नवीन जिल्ह्यांचा समावेश होणार तसेच कोण कोणत्या नवीन अनुदान घटकांचा समावेश असणार याबाबत खाली आपण माहिती पाहुयात. POCRA 2.0 – Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp योजनेचा पहिला टंप्पात राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 5700… Read more: Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज

हंक्कसोडपत्र हे कोणाच्या लाभात करता येते ?

हंक्कसोडपत्र हे फक्त कुटंबातील सदस्य अथवा सहहिस्सेदाराच्या लाभात करता येते,

कुटुंबातील सहहिस्सेदार नसलेल्या सदस्याच्या लाभात अथवा कुटुंबाबाहेरील सदस्याच्या लाभात हक्कसोडपत्र करता येत नाही,

तसे करावयाचे असल्यास हक्कसोडपत्र ग्राह्य होत नसुन मिळकतीचे हस्तांतरण

समजले जाते व मुंबई मुद्रांक कायदा 1958 नुसार मिळकतीच्या मुल्यांकनावर खरेदीखताप्रमाणे मुद्रांक शुल्क भरावा लागतो.

हंक्कसोडपत्रासाठी कुटुंबातील सदस्याला मोबदला घेता येतो का ?

सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र हे कुठलाही मोबदला न घेता असते मात्र सदस्याला मोबदला हवा असेल

तर तो मोबदला घेवुन हक्कसोडपत्र करून शकतो.

हंक्कसोडपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते का ?

हंक्कसोडपत्र हे कुटुंबातील सहहिस्सेदाराच्या लाभातच केले जात असल्याकारणाने त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागत नाहि

मात्र हंक्कसोडपत्रासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याने 200 रूपयाचा मुद्रांक व नोंदणी फी भरावी लागते.

 हंक्कसोड पत्राबाबत अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

हंक्कसोड पत्र माहिती आधारित व्हिडीओ
Adv