मित्रांनो राज्यात आता ई पीक पाहणी शेवटची तारीख e pik pahani last date ची घोषना शासनातर्फे करण्यात आली आहे.
आधी दिलेल्या मुदतीमधे बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही.
त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या लाभापासून बहुसंख्य शेतकरी वंचीत राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आता नव्याने अतिम तारखेची घोषणा करण्यात आलेली असून आता नवीन तारीख खालीप्रमाणे असणार आहे.
ऑनलाईन नोंदणी कधीपर्यंन्त करता येणार (E Pik Pahani Last Date 2023) ?
पीक विमा, पीक नुकसान अनुदान, अश्या विविध प्रकारची मदत मिळवीण्याकरीता,
आता तलाठ्याकडून केली जाणारी पीक पाहणी, शेतकऱ्याला आपल्या स्वत:च्या मोबाईलमधून ॲपव्दारे करायची आहे.
याकरीता आधी 31 August 2023 हि अंतिम मुदत देण्यात आलेली होती मात्र आता,
25 September 2023 या तारखेपर्यंन्त e pik pahani last date शेतकऱ्यांना E Peek Pahani करता येणार आहे.
सन 2023 या वर्षापासून राज्य सरकारणे शेतकऱ्यांकरीता केवळ 1 रूपया मधे पीक विमा उपलब्ध करून दिलेला आहे,
यामुळे मोठ्या संख्येमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे,
मात्र पुढे पीक विमा योजनेचा क्लेम करून लाभ घ्यावयाचा असल्यास E Pik Pahani करून
आपल्या 7/12 उताऱ्या वर पिकांची नोंद करणे शेतकऱ्याला आवश्यक आहे. त्याशिवाय पीक विम्याचा लाभ शेतकऱ्याला मिळणार नाही.
योजनेचे नाव | E pik pahani 2023 |
माहिती | e pik pahani last date 2023 |
वर्ष | खरीप 2023 |
विभाग | कृषी विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
Online E Pik Pahani ई पीक पाहणी ऑनलाईन
महाराष्ट्रातील मुंबई शहर वगळता सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
E Peek Pahani Mobile App च्या सहाय्याने आपल्या स्वत:च्या मोबाईलवरून सातबारा उताऱ्यावर
पिकांची नोंदणी करता येत आहे. याकरीता आता तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरलेली नाही.
अशी करा ऑनलाईन ई पीक पाहणी
खालील व्हिडीओ पहा
मोबाईलव्दारे नोंदणी
ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर करून एका मोबाईल क्रमांकावरून
तब्बल 50 शेतकऱ्यांच्या पीकाची ई पीक पाहणीची नोंदणी करता येणे शक्य आहे.
ई पीक पाहणी न केल्यास खालील नुकसान होऊ शकते.
एखाद्या शेतकऱ्यांना आपल्या पीकाची e pik pahani last date च्या आधी न केल्यास
त्या संबधीत शेतकऱ्याला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ चालू वर्षाकरीता मिळणार नाही.
तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेण्याकरीता सुध्दा अडचणी निर्माण होतील.
E Pik Pahani चे हे आहेत फायदे
राज्यात बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते,
ई-पीक पाहणी ॲप व्दारे पीकाची नोंद केलेली असल्यास शासनाकडून वेळोवेळी परिस्थितीनुरूप
जाहिर करण्यात येत असलेली नुकसारभरपाई शेतकऱ्यांला अचूक व लवकर मिळते,
तसेच पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकम्यांचा सक्रिय सहभाग निर्माण झाल्यामुळे
पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ व गतीमान होते,
ॲपव्दारे पीकाची नोंदणी होत असल्याने शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देतांना अडचणी निर्माण होत नाही.
उदा. कांदाचाळ योजनेतून कांदाचाळ घटकाचा लाभ घेण्याकरीता 7/12 उताऱ्यावर नमुना 12 मध्ये पीकाच्या नोंदिमधे कांदा लागवड नोंद असावी लागते.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul