7/12 utara व Jamin Nakasha लिंक – भूमि अभिलेख विभाग

0
2242

सात-बारा उतारा व गाव नकाशा (7/12 utara व Jamin Nakasha) एकमेकांशी लिंक – भूमि अभिलेख विभागाचा आधुनिक उपक्रम

महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभाग तंत्रज्ञानाचा उपयोग करून विभागाचे कामे अधीक गतीशील व डिजीटल करत आहे, राज्य भूमी अभिलेख विभागाने या आधुनिकीकरण उपक्रमातून आता 7/12 utara Jamin Nakasha डिजीटल स्वरूपात जोडला आहे, यामुळे आता जमिनीच्या खरेदी विक्रीत आणि दस्त नोंदणी करण्यापुर्वी जमिनीच्या बाबतीत जमिनीची चतु:सीमा, जमिनीचा मालक, हि सर्व माहिती एकाच क्लिकवरती मिळणार आहे, याआधी चतु:सीमा तसेच जमिनीच्या मालकाची माहिती मिळवायची असल्यास संबधीत गावातील तलाठी कार्यालयात जाऊन माहिती मिळवावी लागत होती. आता मात्र तलाठी कार्यालयात माहिती प्राप्त करण्याची गरज उरणार नाहि, यामुळे वेळ तसेच संबधीताला बसणारा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे.

7/12 utara व Jamin Nakasha
7/12 utara व Jamin Nakasha

[su_quote]सातबारा उताऱ्यासोबत गाव नकाशा डिजीटल स्वरूपात जोडल्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच गावातील असलेल्या जमिनींची अक्षांक्ष-रेखांक्षासह संपुर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे, जमिन खरेदी विक्रीत चुकीची माहिती दाखवून तसेच खोट्या माहितीच्या आधारे दिशाभुल करून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या व्यवहारात यामुळे आता नक्की आळा बसणार आहे. राज्य भूमी अभिलेख कार्यालय आपल्या कामकाजाला अधिकाधीक डिजीटल स्वरूपात आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे यापुर्वी सुध्दा डिजीटल सहीयुक्त ऑनलाईन सातबारा हा याच आधुनिकीकरणाचा भाग होता. आता याच आधुनिकीकरणाचे पुढचे पाऊल म्हणजे गाव नकाशा सात-बारा उताऱ्याशी जोडणे होय, भूमी अभिलेख कार्यालयाच्या या निर्णयामुळे आता नक्कीच जमीन खरेदी करतांना खेरेदीदाराला त्या जमीनीबाबत सविस्तर खरी माहिती मिळणार आले यापुर्वी असे होत नसल्यामुळे खरेदीदाराची फसवणुक होण्याची शक्यता जास्त असायची.[/su_quote]

जमिनीच्या नकाशावरून कळणार आता संबधीत जमीन मालकांची नावे

भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफ स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे यामुळे दस्त खरेदी-विक्री व्यवहारात या गाव नकाशांची निशुल्क प्रिंट काढुन दस्त खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांसाठी संबंधीतांना जोडता येणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने हि संपूर्ण सुविधा आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे, भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर जिल्हा, तालुका, व त्यानंतर गाव निवडल्यानंतर गावाचा नकाशा उपलब्ध होणार आहे, त्या निवडलेल्या गावातील संबधीत सर्वे क्रमांक निवडल्यानंतर त्या सर्व्हे क्रमांकाचा नकाशा उपलब्ध होत आहे, तसेच त्या सर्वे क्रमांकामधील सर्व खातेदारांची नावे सुध्दा दिसत आहे.

महाराष्ट्र राज्यात एकुण 44 हजारापेक्षा जास्त गावे आहेत, या गांवापैकी आतापर्यंन्त भूमी अभिलेख कार्यालयाने 37 हजार गावातील गाव नकाशा सात-बारा उताऱ्याशी ऑनलाईन डिजीटल स्वरूपात जोडले आहे. उर्वरीत गावांचे गाव नकाशे सात-बारा उताऱ्यासोबत जोडण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालयामार्फत युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे.

[su_posts posts_per_page=”5″ tax_term=”32″ tax_operator=”NOT IN” order=”desc”]

Adv