बियाणे खरेदिवर मिळवा आता अनुदान – महाराष्ट्र शासनाची योजना

0
303

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शिर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, या सुविधे अंतर्गत लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून दिनांक 20 मे 2021 पर्यंन्त शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे.

महाडीबीटी पोर्टलवर “ शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाव्दारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

बियाण्याच्या खरेदीवर अनुदान मिळविण्यासाठी असा अर्ज करा

  1. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थहावरील “ शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.
  2. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, अथवा सामुदायिक सेवा केंद्र म्हणजेच CSC केंद्रावर जाऊन सुध्दा अर्ज करून शकतील तसेच ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राव्दारे सुध्दा अर्ज सादर करता येतील.
  3. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व  शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.
  4. अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
  5. अर्ज सादर करतांनाी कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वरती किंवा 020-25511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन मदत घेता येईल.

अर्ज सादर करण्यासाठीची वेबसाईट

https://mahadbtmahait.gov.in

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख

20 मे 2021

योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक
  • चालू असलेला मोबाईल क्रमांक

लाभार्थ्याच्या निवडीची पध्दत

ज्या सर्व अर्जदारांनी योजनेसाठी अर्ज केलेला असेल त्यांच्यापैकी लॉटरी पध्दतीने काहि अर्जदारांची योजनेसाठी निवड करण्यात येईल, सर्व अर्जदारांना लाभ मिळणार नाहि, लॉटरी पध्दतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना लॉटरी लागण्याचा संदेश ऑनलाईन अर्ज सादर करतांनी नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात येईल.

Adv