टोलच्या पावतीवर मिळतात इतके फायदे, सामान्य जनतेला माहित नाहि

0
239

भारतामंध्ये रस्ते निर्मितीसाठी खर्च झालेले पैसे टोल नाक्यावरून परत वसूल केले जातात. एक्सप्रेस हायवे वरून आपण जात असाल तर त्या ठिकाणी टोल हा उभारलेला आपल्याला दिसून येतो, टोलचा दर हा वाहनाचा आकार, वजन, यांच्यावरती कमी अधिक ठरलेला असतो, त्यासाठी टोल वसूली नाक्यावर आपल्याला वेगवेगळ्या वाहनाच्या रांगा दिसून येतील.

टोल नाक्यावरील पावतीच्या बदल्यात वाहनधारकांना कोण कोणते फायदे मिळतात

एक्सप्रेस हायवे वरती काहि विशेष सुविधा वाहनधारकांना देण्यात येतात जसे क‍ि वाहनाचे इंधन संपले किंवा वाहनाची बॅटरी डिस्चार्ज झाली अश्या वेळी त्या वाहनाला वाहन जेथे आहे त्या ठिकाणी इंधन नेऊन देणे व बाहेरून बॅटरी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टोल वसूली करणाऱ्या कंपनीची असते. रस्त्यावरती टोल लागू आहे त्या रस्त्यावरून वाहनधारक टोल रक्कम भरून जात असेल आणि वाहनधारकाचे वाहन रस्त्यात बंद पडले तर ते वाहन टो करून नेण्याची जबाबदारी टोल वसूलीचा ठेका घेणाऱ्या कंपणीची असते.

तुम्ही वाहनातून प्रवास करत असाल आणि तुमच्या सोबतच्या प्रवाश्याची तब्येत अचानक बिघडली आणि वैद्यकीय सेवेची तात्काळ आवश्यक असेल तर टोल पावतीवरील संपर्क क्रमांकावरती कॉल करून तुम्ही अँम्ब्युलन्स मागवु शकता, अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंन्त पोहोचविण्याची जबाबदारी हि संबधीत रोडचा ठेका घेतलेल्या टोल वसूली कंपणीची असते. तुमच्या वाहनाचा अपघात जरी झाला तरी तुम्ही टोलच्या पावतीवरील क्रमांकावरती संपर्क करून मदत मागवू शकता.वाहनाचे इंधन संपल्यास 5 ते 10 लिटर पर्यंन्त इंधन मोफत मिळते तसेच गाडी पंक्चर झाल्यास सुध्दा मदत मिळते.टोल वसूलीचा ठेका घेतलेल्या कंपनीने टोलनाक्याजवळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय वाहनधारकांसाठी करून देणे बंधनकारक आहे तसे आपल्याला आढळून न आल्यास वाहनधारकाला तक्रार करण्याचा सुध्दा अधिकार आहे.

बी.ओ.टी. तत्वावरील टोल म्हणजे काय ?

बी.ओ.टी तत्व हा शब्द आपण टोल नाक्याच्या संदर्भात बऱ्याच वेळा एैकला असेल बी.ओ.टी. चा पुर्ण अर्थ आहे “बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्स्फर, राज्य सरकार अथवा केंद्र सरकारकडून रोडचे बांधकाम करण्याचा ठेका खाजगी गुत्तेदार घेतात. रोड चे काम पूर्ण झाल्यानंतर खाजगी गुत्तेदार कराराप्रमाणे काहि ठरावीक वर्ष टोल नाक्याच्या माध्यमातून रोडच्या बांधकामासाठी खर्च झालेले पैसे वसूल करत असतात. बांधकामाला लागलेला खर्च टोलच्या माध्यमातून वसूल झाल्यानंतर टोल वसूलीचा दर हा आधीपेक्षा 40 टंक्के इतकाच ठेवल्या जातो. नंतर वसूल केल्या जाणारा टोल हा नवीन रोडच्या नंतरच्या देखभालीसाठी असतो. पारंपारीक पध्दतीने वसूल केल्या जाणारा टोल हा आता काहि ठिकाणी फास्टटॅग प्रणालीव्दारे वसूल करण्यात येत आहे. फास्टटॅग प्रणालीमंध्ये टोलनाक्यावर लावलेल्या स्कॅनर यंत्रनेव्दारे वाहनाच्या समोरील काचेवर लावलेल्या फास्टटॅगच्या बारकोड स्टिकरला स्वयंचलित रित्या स्कॅन केले जाते आणि फास्टटॅगशी सलग्न खात्यातून टोलचे पैसे अटोमॅटिकली वसूल केले जातात. यामुळे टोल नाक्यावरती वाहनाच्या रांगा लागणे कमी होते व वेळेची व इधनाची बचत होते.

Adv