OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत
ज्या प्रमाणे मराठा समाजाला व्याज परतावा योजना राबविल्या जाते त्याचप्रमाणे OBC Mahamandal, VJNT Mahamandal यांच्यातर्फे सुध्दा Karj Yojana राबविल्या जाते.
OBC Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
VJNT Mahamandal पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf
जि.आर.डाऊनलोड करण्यासाठीची खालील लिंक वरती क्लिक करा
https://msobcfdc.in/downloads/201901311225012722.pdf
OBC Mahamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.msobcfdc.org/contacUs
VJNT Mhamandal विभागीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
http://www.vjnt.in/ContactUsNew.aspx
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष योजनेनुसार बँकेकडून घेतलेल्या रु.१०.०० लाखा पर्यंतच्या वैयक्तिक कर्जावरील व्याज (जास्तीत जास्त १२% पर्यंत) परतावा योजना OBC Mahamandal Karj Yojana महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादित) आणि VJNT Mahamandal Karj Yojana वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) या दोन्ही महामंडळांमार्फत राबविण्यास या शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे राहील.

OBC, VJNT Mahamandal कर्ज योजनेचा उद्देश
बँकेमार्फत लाभार्थीना रु. १०.०० लक्ष पर्यंत रक्कम वितरीत केली जाईल.
सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यंत) महामंडळाकडून केला जाईल.
OBC/VNJT Mahamandal Karj Yojana पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादा
सध्या महामंडळाच्या योजने करीता लाभार्थीच्या पात्रतेचीग्रामीण व शहरी भागाकरीता रु. १.०० लक्ष कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
सदर उत्पन्न मर्यादेत वाढ करुन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेप्रमाणे सदर योजनेकरिता
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा इतर मागास प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या रु. ८.०० लक्ष इतकी राहील. (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रानुसार)
| Yojana Name | व्याज परतावा योजना, OBC Karj Yojana, VJNT Karj Yojana |
| Yojana Start Year | 2019 |
| OBC Mahamandal Online Form | https://msobcfdc.in/ |
| VJNT Mahamandal Online Form | http://www.vjnt.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN=mr-IN |
| OBC Karj Yojana Form Download | http://www.msobcfdc.org/download/obc/bij_bhandwal.pdf |
| OBC Mahamadal Contact | http://www.msobcfdc.org/contacUs |
| VJNT Mahamandal Contact | http://www.vjnt.in/ContactUsNew.aspx |
प्रकल्प क्षेत्रानुसार लक्ष्यांक अंदाजपत्रक
१. कृषी, संलग्न व पारंपारिक उपक्रम एकूण आर्थिक तरतुदीच्या ६०% रक्कम
२. लघु उद्योग व मध्यम उद्योग –
(अ) उत्पादन २) व ३) साठी एकूण आर्थिक तरतुदीच्या
(ब) व्यापार व विक्री ४०% रक्कम
३. सेवा क्षेत्र
लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी
- महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- वय वर्ष १८ ते ५० वर्ष असावे.
- लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- वेबपोर्टल/ महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य.
- उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- उमेदवार कोणत्याही बँकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- उमेदवाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवातत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- कुटुंबातील एका व्यक्तीला केवळ एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
परताव्याच्या अटी
- जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
- लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावेत.
OBC / VJNT Mahamandal लाभार्थ्यांस कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा
उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत)
त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.
सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत असुन प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल.
महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसुल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल, याऐवजी इतर कोणतेही Charges/Fees/देयके अदा करणार नाही.
-
Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५)
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, नमस्कार! नैसर्गिक आपत्त्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील आव्हाने यांचा सामना करत शेतीत नवनवीन प्रयोग करणे हे आपले वैशिष्ट्य आहे. या मेहनतीला योग्य दिशा आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे: कृषी समृद्धी योजना २०२५ (Krushi Samruddhi Yojana 2025). ही योजना केवळ तात्पुरती मदत नसून, येत्या पाच वर्षांत…
-
Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Ativrushti Nuksan Bharpai 2025 List या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ₹१०,००० इतके अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा करण्यात आल्याप्रमाणे पैसे दिल्या गेले…
-
Pardesh Krushi Abhyas Daura
परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे. योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti Scheme Name Pardesh…
-
kharif pik vima 2025 online form
पीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या पीक विमा 2025 बाबतच्या नवीन जि.आर. नुसान पीक पेरा स्वय: घोषनापत्र पीक विमा भरतांनी अपडोड करणे आवश्यक आहे. PDF फॉरमॅट मधे डाऊनलोड करण्याकरीता खालील Download बटन वरती क्लिक करा पीक विमा शेतकरी हिश्याची रंक्कम पीक विमा 24 जुलै 2025 च्या जि.आर. नुसार आता…
-
Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो. गुंठेवारी प्लॉट Gunthewari Plot हा विकत घेणे योग्य आहे कि नाही, तसेच गुंठेवारी म्हणजे नंक्की काय? Gunthewari Plot Mahiti याबाबत खाली विस्तृत माहिती दिलेली आहे. Gunthewari Jamin महाराष्ट्र राज्यात शहरी City तसेच निमशहरी भागात गुंठेवारी प्लॉट विकले जातात, एन ए 44 (NA44) Plot…
-
AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली आहे. AgriStack Yojana ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी प्रक्रिया, लाभ, कागदपत्रे याबाबत खाली माहिती दिलेली आहे. AgriSTack Krushi Yojana हि केंद्र सरकारची योजना असून संपूर्ण देशात हि योजना राबविल्या जात आहे. कृषी क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्याकरीता हि योजना काम करते. या योजनेमधून शेतकऱ्यांची…
OBC/ VJNT Karj Yojana करीता उमेदवारांची नांव नोंदणी
उमेदावारांनी शासनाच्या अधिकृत वेबपोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक असेल
प्रस्ताव सादर केल्यावर दिलेल्या अटी व शर्ती नुसार प्रस्ताव पात्र ठरत असल्यास
उमेदवारास संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of intent) / मंजूरीपत्र दिले जाईल.
उमेदवाराने या आधारे बँकेकडून कर्ज प्रकरणांवर कर्ज मंजूर करुन घ्यावे.
योजनेचे सर्वसाधारण सनियंत्रण
(अ.) दरवर्षी महामंळामार्फत केले जाईल.
(ब.) महामंडळाचे जिल्हा स्तरावरील योजनेच्या अंमलबजावणीचे काम आवश्यकतेनुसार
मुख्यालयातील व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी भेट देऊन तपासतील.
OBC Mahamandal Karj Yojana / VJNT Mahamandal Karj Yojana लाभार्थ्यांची निवड
या व्याज परतावा योजनेचा लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून
या समितीत लाभार्थ्यांनी त्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेचे व्यवस्थापक, संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त,
समाज कल्याण हे सदस्य असतील व संबंधित महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदस्य सचिव असतील.
या योजनेंतर्गत संपुर्ण कर्ज रक्कम बँक देणार असल्याने सदर प्रस्ताव जिल्हा लाभार्थी निवड या समितीमार्फत करण्यात येईल.
प्रति जिल्हा किमान १०० लाभार्थीना सरासरी रु. १०.०० लक्ष प्रकल्प किंमतीचे प्रस्ताव मंजूर होतील
याप्रमाणे प्रति जिल्हा रु. १०.०० कोटी मंजूर प्रकरणात सर्व ३६ जिल्हयातील
प्रति वर्षी बँकेमार्फत मंजूर ३६०० लाभार्थीना रु. ३६०.०० कोटी निधी बँकेमार्फत वितरीत केलाजाईल.
त्यावर १२ टक्के प्रमाणे व्याज परतावासाठी रु.५०.०० कोटी महामंडळ सहायक अनुदानातून मंजूर करण्यात येईल.
OBC /VJNT अनुदान
या योजनेंतर्गत लाभार्थीना अदा करण्यात येणारी व्याज परतावाची रक्कम अनुदान स्वरुपात अदा करण्यात येईल.
योजनेचे मुल्यांकन
सदर योजनेचे मुल्यांकन आवश्यकतेनुसार मान्यताप्राप्त संस्थांकडून विहित कार्यपध्दती अवलंबून करण्यात येईल.
तसेच या योजनेचा आढावा १ वर्षाने घेतला जाईल व सदर योजना सुरु ठेवावी किंवा कसे याचा निर्णय घेण्यात येईल.
मा.मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे सदर योजनेसाठी नविन लेखाशिर्ष प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.




















