Mukyamantri Kisan Yojana मुख्यमंत्री किसान योजना ऑनलाईन अर्ज
राज्यातील शेतकऱ्यांकरीता अत्यंन्त महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे,
राज्यात आता “मुख्यमंत्री किसान योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारणे घेतला आहे.
कशी असणार आहे “मुख्यमंत्री किसान योजना” सविस्तर माहिती खाली वाचा.
राज्य सरकारच्या वतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे,
ज्या प्रमाणे केंद्र सरकार “प्रधानमंत्री किसान सन्मान योजना” राबविते व त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,
वर्षातून दोन-दोन हजाराचे तिन हप्ते म्हणजेच वर्षातून एकूण 6000 हजार रूपये जमा केले जातात.
मित्रांनो आता या योजने प्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुध्दा “मुख्यमंत्री किसान सन्मान योजना” CM Kisan Yojana राबविल्या जात आहे,
पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षातून तिन वेळा दोन-दोन हजार रूपये म्हणजेच
एकूण सहा हजार रूपये राज्य सरकारकडून जमा केल्या जात आहे,
या योजनेमधे काहि बदल सुध्दा राज्य सरकारकडून करण्यात येवू शकतात.
तसेच या योजनेचा लाभ घेण्याकरीता Mukyamantri Kisan Yojana Online Form (मुख्यमंत्री किसान योजना ऑनलाईन अर्ज) भरावा लागेल.
येथे क्लिक करून Online From भरा
मुख्यमंत्री किसान योजना माहिती Mukyamantri Kisan Yojana
योजनेचे पुर्ण नाव | मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना |
अमलबजावणी राज्य | Maharashtra |
राज्य शासनाचे संकेतस्थळ | https://maharashtra.gov.in/ |
योजनेचे वर्ष | 2022 पासून पुढे |
शासनाचा विभाग | कृषी विभाग, महसूल विभाग |
मुख्यमंत्री किसान योजनेला Mukyamantri Kisan Yojana खालील नावाने सुध्दा ओळखले जाते
- मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना Mukyamantri Kisan Sanman Nidhi Yojana
- मुख्यमंत्री किसान योजना Mukyamantri Kisan Yojana
- मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना Mukyamantri Shetkari Sanman Nidhi Yojana
- मुख्यमंत्री निधी योजना Mukyamantri Nidhi Yojana
असा मिळणार लाभ
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला सहा हजार रूपये दिले जातात,
ही रक्कम दोन दोन हजार रूपयाच्या तिन हप्त्यात जमा केली जाते,
हे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात, केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करते त्याचप्रमाणे
“मुख्यमंत्री किसान सन्मान योजने” मधे सुध्दा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा केल्या जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना Mukyamantri Kisan Yojana हे पात्र असणार
- महाराष्ट्रातील शेतकरी असावा.
- शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी.
- शेतकऱ्याच्या नावावर असलेली जमीन कृषक प्रकारातील असावी.
- शेतकरी शासनाच्या अल्पभूधारक किंवा सिमांत शेतकरी प्रकारातील असावा.
- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्रता पूर्ण करणारा असावा.
- राज्य सरकारचे चतु:श्रेणी कर्मचारी ज्यांचा पगार 25000 रूपये पेक्षा जास्त नाही असे.
हे Mukyamantri Kisan Yojana मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरीता पात्र नसणार
- महाराष्ट्रातील रहिवाशी मात्र इतर राज्यात शेती असणारा.
- इतर राज्यातील रहिवाशी मात्र महाराष्ट्रात शेती असणारा.
- राज्य सरकारच्या सिमांत आणि अल्पभूधारक शेतकरी संज्ञेत न बसणारा.
- आयकर भरणारे शेतकरी सुध्दा या योजने करिता पात्र राहणार नाही.
- केंद्र अथवा राज्य सरकारचे सर्व कर्मचारी.
- 25 हजार रूपयापेक्षा जास्त पेन्शन मिळणारी व्यक्ती.
- सर्व केंद्र व राज्य शासनाचे निवृत्ती वेतन सुरू असलेले कर्मचारी.
- जे शेतकरी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतात त्यांना सुध्दा लाभ मिळणार नाही.
- शासकिय कर्मचारी असून नावावर शेतजमीन असेल अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.
खालील जिल्ह्यातील शेतकरी असणार पात्र
महाराष्ट्रातील खाली उल्लेख केलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.
ठाणे व मुंबई सारख्या महानगरात मात्र शेतजमीन उपलब्ध नसल्याने तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची शक्यता नाही.
लाभ मिळवीण्याकरीता हे करावे लागणार
मुख्यमंत्री किसान योजना Mukyamantri Kisan Sanman Nidhi Yojana अंतर्गत लाभ मिळवीण्याकरीता
शेतकऱ्यांना सर्वप्रथम Online Form या योजनेची पात्रता पूर्ण करावी लागणार आहे,
त्यांनतर संबधीत गावातील तलाठी मार्फत पात्र शेतकऱ्यांची यादी बनविल्या जाणार आहे.
यादी बनविण्या करीता केंद्र सरकारच्या “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना” अतर्गत लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा वापरण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभाग मार्फत तसेच महसूल विभाग मार्फत या योजनेची अमलबजावणी व रूपरेषा ठरविल्या जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना योजनेच्या अमलबजावणी करीता नियंत्रक नेमले जाणार आहे.
Mukyamantri Kisan Yojana अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी तलाठी कार्यालय मार्फत तयार करण्यात येणार आहे,
संबधीत यादी कार्यालयात प्रसिध्द करण्यात येईल त्या यादीत शेतकऱ्याचे नाव नसल्यास त्या शेतकऱ्याने
आपण या योजनेकरीता पात्रता निकष पुर्ण करीत असल्याचे पुरावे सादर करून तलाठी कार्यालय मार्फत यादीत नाव समाविष्ट करून घ्यायचे आहे.