Money Lending License आपण या ठिकाणी माहिती पाहु शकता कि सावकारकी करण्याकरीता म्हणजेच
व्याजाने पैसे देण्याकरीता आवश्यक असणारा शासकीय परवाना कसा मिळवावा.
महाराष्ट्र राज्यात अवैध सावकारी करण्याकरीता कायद्याने बंधी घालण्यात आलेली आहे.
अनेक शेतकरी अवैध सावकाराकडून प्रचण्ड व्याजाने पैसे घेवून व्याजाखाली दबले जातात, परीणामी शेतकरी डिप्रेशन मध्ये येऊन आत्महत्या सुध्दा करतात.
तसेच अवैधरीत्या व्याजाने दिलेल्या पैशाची वसूली करणे सुध्दा अवैध सावकारांना कधी कधी जड जाते.
मित्रांनो शासनाने सावकारी करण्याकरीता अधिकृत परवाना Money Lending License पध्दत बऱ्याच दिवसापासून सुरू केलेली आहे.
सावकारी परवाना (Money Lending License Form) अर्ज PDF स्वरूपात डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश 2014 संक्षिप्त माहिती डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा
सावकारी परवाण्याकरीता लागणारे शुल्क (Money Lending License Fees)
सावकारी करण्याकरीताचा आवश्यक परवाना 500 रूपयामधे मिळविता येतो.
500 रूपयाचे चलन भरून अर्जासोबत जोडावे लागते
तसेच आपण जो अर्ज सादर करतो तो अर्ज 10 रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर सादर करावा लागतो,
सोबतच 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपर वरती प्रतिज्ञापत्र सुध्दा भरून द्यावे लागते. म्हणजे एकूण 610 रूपये नवीन परवाना काढण्याकरीता लागतात.
अर्ज | Money Lending License सावकारी व्यवसाय परवाना |
राज्य | Maharashtra |
विभाग | सहकार आयुक्त आणि निबंधक, महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ |
कायदा | महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 |
परवाना नुतरीकरणाकरीता (Money Lending License Renewal Fees) लागणारे शुल्क
परवाना नुतनीकरण करायचा असल्यास मागील वर्षात केलेल्या सावकारीचे तपशील तपासले जातात,
म्हणजेच वर्षभरात जितक्या कर्जाच्या रकमा दिल्या तसेच व्याजासह वसूल केल्या याच्या नोंदी तपासल्या जातात,
तसेच कुणाची तक्रार तर संबधीत सावकारी परवाना धारकावीरूध्द नाहि ना हे सुध्दा तपासल्या जाते.
परवाना नुतनीकरण करण्याकरीता 500 रूपये इतके शुल्क आकारल्या जाते.
तसेच वार्षिक सावकारी केल्याच्या नोंदी ज्या तपासल्या जातात त्याकरीता वेगळे शुल्क भरावे लागते,
तपाणीकरीताचे शुल्क वार्षिक सावकारी केल्याच्या उलाढालीवरती ठरविल्या जाते.
सावकारी परवाना काढण्याकरीता आवश्यक कागदपत्रे Money Lending License Documents
- विहीत नमुन्यातील अर्ज (डाऊनलोड करण्याकरीता वरती लिंक दिलेली आहे)
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखीचा पुरावा (कागदपत्र)
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट
- रेशन कार्ड
पत्याचा पुरावा (कागदपत्र)
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधार कार्ड
- वाहन चालक परवाना
इतर कागदपत्रे
- बँक खाते क्रमांक
- लाईट बिल
- अर्जदाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
- स्वय:घोषणापत्र
- चारित्र्य दाखला
सर्वप्रथम सावकारी परवाना ज्याच्या नावाने काढायचा आहे त्या अर्जदाराचे आधार कार्ड आवश्यक आहे
त्यांनतर पॅन कार्ड, तसेच ज्या बँक खात्याव्दारे सावकारी रकमेची हाताळणी केल्या जाणार आहे त्या बँक खात्याचा तपशिल,
त्यानंतर संबधीताचे लाईट बिल, मोबाईल क्रमांक आणि फोटो. इत्यादी सर्व कागदपत्रे सावकारी परवाना काढण्याबाबतच्या विहित अर्जासोबत सादर करावे लागतात.
वैधता (सावकारी परवाणा) Validity Of Money Lending License
इश्श्यु केल्या जाणाऱ्या सावकारीच्या परवान्याची मुदत हि 1 एप्रिल ते 31 मार्च अशी असते
म्हणजे प्रत्येक वर्षी परवान्याचे नुतनीकरण म्हणजेच रिन्युअल सुध्दा करावे लागते.
अर्ज (सावकारी पारवाणा) या ठिकाणी सादर करा Submit Money Lending License Form
आपण ज्या ठिकाणी राहता त्या तालुक्यातील उपनिबंधक कार्यालयात जाऊन आपल्याला
विहित अर्ज सादर करावा लागतो त्यानंतर काही कालावधीमधे लगेचच आपल्याला सावकारी करण्याकरीताचा अधिकृत परवाना इश्श्यु केल्या जातो.
परवानाधारक सावकार इतके व्याज आकारू शकतो
सावकारीचा परवाना जरी मिळाला तरी मणमानी पध्दतीने कर्ज स्वरूपात दिलेल्या रकमेवरती व्याज संबधीत परवाना धारकाला आकारता येत नाही,
काहि तारण घेवून म्हणजेच गहाण घेवुन कर्ज दिले असेल तर वार्षिक 15 टंक्क्यांपर्यतच व्याज आकारता येते
त्यापेक्षा जास्त व्याज आकारता येत नाही, तसेच विनातारण कर्ज दिले असेल
तर वार्षिक 18 टंक्के इतक्या दरापर्यंन्तच व्याज आकारता येते.
मित्रांनो जास्तीत जास्त किती रंक्कम कर्जाने द्यावी याला कोणतेही बंधन नाही.
म्हणजेच परवाना मिळाल्यानंतर कितीही रक्कम व्याजाने वाटता येते.
सावकारी परवानाधारकांला हि माहिती नोंदवावी लागते
ज्यांना ज्यांना कर्ज दिले आहेत त्याची नोंदणी रजिस्टरला करावी लागते त्यात कर्जदाराचे नाव,
किती कर्ज दिले, तसेच किती व्याज त्या कर्ज रकमेवरती आकारले,
तसेच कोणत्या तारखेला कर्ज दिले होते व कोणत्या तारखेला ते वसूल झाले याचा तपशील
एका रजिस्टर मधे नोंदवून ठेवावा लागतो.
त्यात अनियमीतता तसेच काहि गडबड आढळल्यास संबधीत परवाना धारकावरती कार्यवाही सुध्दा केल्या जाते.
तर मित्रांनो अश्या प्रकारे सावकारी करण्या करीताचा अधिकृत परवाना हा काढता येतो,
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर या पोष्टला नंक्की लाईक करा तसेच शेयर करायला विसरू नका.
तसेच आपले युट्युब चॅनल व टेलिग्राम ग्रुप सुध्दा असून तेथे वेळोवेळी नवीन योजनांचे तात्काळ अपडेट दिले जातात
खालील लिंक वरती क्लिक करून युट्युब चॅनल व टेलिग्राम चॅनल ला सबस्क्राईब करा.
विविध सरकारी योजनांचे वेळीच अपडेट मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम चॅनला ज्वाईन करा
https://telegram.me/officialtechwithrahul