महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत Dushkal Nidhi मदत जाहिर करण्यात आली होती, त्या अनुषंगाने गावपातळीवरून तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून, पात्र शेतकऱ्यांच्या नावाची Dushkal Nidhi Anudan List यादी बनविण्यात आली होती.
यादीतील पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ निधी अनुदान चा लाभ देण्याकरीता तलाठी कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या तपशीलाची यादी तयार करण्यात आलेली होती, यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास सुरूवात झालेली असुन, पात्र शेतकऱ्याचा व बँक खात्याचा तपशील eKYC व्दारे तपासण्यात येत असुन नंतरच लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे, याकरीता गावपातळीवर तलाठी कार्यालयात तसेच सेतू सेवा केंद्रात पात्र शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या शेतकऱ्यांना पाहण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
शेतकऱ्यांना सेतू सेवा क्रेद्रात जाऊन आपली माहिती तपासून घ्यायची आहे यामधे नाव, बँक खाते क्रमांक, लाभाची रक्कम तपासायची आहे, माहिती योग्य असल्यास Dushkal Nidhi eKYC करून रक्कम हस्तांतरणाला मान्यता द्यायची आहे, काहि त्रुटी असतील तर त्या दुर करण्याबाबत हतरकत नोंदविण्याचा पर्याय Dushkal Nidhi eKYC करते वेळी शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
| Scheme Name | Dushkal Nidhi Anudan List दुष्काळ निधी अनुदान यादी |
| State Name | Maharashtra महाराष्ट्र |
| Scheme Start Year | 2023 |
| Scheme End Year | 2023 |
| Scheme Under | State Government of Maharashtra Revenue Department |
| Dushkal Nidhi Anudan List Download | दुष्काळ निधी अनुदान 2023 यादी डाऊनलोड |
- Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५)
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, नमस्कार! नैसर्गिक आपत्त्या, हवामान बदल आणि बाजारपेठेतील आव्हाने यांचा… Read more: Krushi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना २०२५) - Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Ativrushti… Read more: Ativrushti Nuksan Bharpai 2025 List अतिवृष्टी भरपाई याद्या 2025 - Pardesh Krushi Abhyas Daura
परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत राज्यातील… Read more: Pardesh Krushi Abhyas Daura - kharif pik vima 2025 online formपीक पेरा स्वय: घोषनापत्र Pik Pera Declaration 2025 24 जुन 2025 च्या… Read more: kharif pik vima 2025 online form
- Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय
गुंठेवारी Gunthewari Mhanjay Kay हा प्रश्न Plot विकत घेतांना बऱ्याच जणांना पडतो.… Read more: Gunthewari Mhanjay Kay गुंठेवारी म्हणजे काय - AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
राज्यात AgriStack Scheme Registration Process दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेली… Read more: AgriStack Scheme Registration ॲग्रिस्टॅक योजना नोंदणी
वाढीव दराने Dushkal Nidhi खालीलप्रमाणे मिळत आहे.
| अ.क्र. | बाबत | प्रचलित दर | मदतीचे वाढीव दर |
| 1. | जिरायत पीक | रू. 6800-/ प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादेत | रू. 13600-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत |
| 2. | बागायत पीक | रू. 13,500/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादत | रू. 27,000-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत |
| 3. | बहुवार्षिक पीक | रू. 18,000/- प्रति हेक्टर, 2 हेक्टरच्या मर्यादत | रू. 36,000-/ प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादेत |
Dushkal Nidhi Anudan List ज्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत, बहुतांश जिल्हाधीकारी यांच्या संकेतस्थळावर दुष्काळ निधी अनुदान यादी प्रसिध्द केलेल्या असून काहि जिल्ह्याच्या याद्या ऑफलाईन पध्दतीने तहसील कार्यालयामार्फत ज्या त्या तलाठी सजाकडे शेतकऱ्यांकरीता पाहण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
दुष्काळ निधी अनुदान यादी शेतकऱ्यांच्या नाव व लाभ रकमेसह पाहण्याकरीता खाली दिलेल्या जिल्ह्यांच्या नावासमोरील लिंक वर क्लिक करून जिल्हाधीकारी यांच्या संकेतस्थळावर पाहु शकता.
Dushkal Nidhi Anudan List Download करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या नावासमोरील लिंक वरती क्लिक करा
या कारणामुळे दुष्काळ निधी अनुदान यादीत नाव नसू शकते
शेत जमीन नावावर नसणे.
तलाठ्यामार्फत नुकसानीचा पंचनाम केलेला नसेत तर.
तलाठ्याकडून यादी बनवितांना नाव वगळले गेले असल्यास.
दुष्काळ निधी अनुदान योजनेच्या पात्रता निकषात संबधीत शेतकरी बसत नसल्यामुळे.




















