Sat Bara Utara पोट हिस्याचा स्वतंत्र होणार

1
3551

पोट हिश्याचे स्वतंत्र Sat Bara Utara होणार जाणून घ्या माहिती

Sat Bara Utara ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणातील वाद हे पोट हिश्याशी संबंधित असतात,

आता भूमि अभिलेख विभागातर्फे विशेष मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील गावांमध्ये शेतकऱ्यांचे 7/12 उतारा त्यांच्या हिश्याप्रमाणे वेगळे करून दिले जाणार आहेत.

तसेच त्यानुसार वैयक्तिक नकाशेही तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना तसेच जमिनधारकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

सध्या अस्तित्वात असणाऱ्या 7/12 उतारा वर बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, तसेच जमिनीतील सहहिश्येदारांचे नावे असतात.

7/12 उतारा उताऱ्यावर उल्लेखित नावानुसार प्रत्येकाचा जमिनीतील हिस्सा हा निश्चित असतो.

त्या हिश्याप्रमाणे प्रत्यंक्ष क्षेत्राची म्हणजेच जमिनीची वाटणी होऊन त्यांच्या ताब्यात ते क्षेत्र असते.

वाटणी झालेले जमिनीच्या क्षेत्रानुसार त्यांची वहिवाट असते.

मात्र या ठिकाणी सात-बारा उतारा हा एकच असल्यामुळे पोटहिश्याबाबत वाद निर्माण होऊन अनेक प्रकरणे न्यायालयात सुध्दा जातात.

पोट हिश्याचे स्वतंत्र Sat Bara Utara

आता या सर्वावर उपाययोजना म्हणून राज्याच्या भूमी अभीलेख विभागाने या पोटहिश्यांचे स्वतंत्र सात-बारा उतारे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यानुसार आता राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने “संमतीने अभिलेख पोटहिस्सा दुरुस्ती” या मोहीमेची सुरूवात केली आहे

महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण या गावांमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी याबाबत पथदर्शी प्रकल्प यापूर्वी यशस्वीरित्या राबवलेला आहे.

त्या वेळी भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती.

शिरढोण गावातील ज्या शेतकऱ्यांनी पोटहिस्सा दुरूस्ती करून स्वतंत्र सात-बारा उताऱ्यासाठी अर्ज केले होते, त्यांचे सात-बारा स्वतंत्र झालेले आहेत.

त्याबाबत सविस्तर अहवाल अभ्यास समितीला सादर केल्या गेला होता. त्या अहवालाची सविस्तर बारकाईने

अभ्यास करून समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार राज्य भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण राज्यात

पोटहिश्यानुसार स्वतंत्र सात-बारा उतारा बनविण्याबाबत निर्णय घेतला आहे.

पोट हिश्याचे स्वतंत्र सात-बारा उतारा माहिती

Schemeपोट हिश्याचे स्वतंत्र Sat Bara Utara
StateMaharashtra
विभागमहसुल विभाग
Official Websitehttps://rfd.maharashtra.gov.in/mr
Pothissa Sat Bara Utara
Sat Bara Utara
Sat Bara Utara

Sat Bara Utara Pot Hissa अशी योजना राबवणार

तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सहकार्याने संबंधीत गावात ग्रामसभा घेतली जाणार असून

या सभेत या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

ज्यांना संमतीने पोट हिस्याचे सात-बारा उतारे स्वतंत्र करायचे आहेत त्यांच्यासाठी एक तारीख निवडल्या जाईल

त्यानंतर त्या तारखेला भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संबंधीत गावात जाऊन इच्छूकांचे अर्ज स्वीकारणार आहे

त्यानंतर पुढील आठवडाभरात त्या अर्जावरती योग्य ती कार्यवाही करून सर्व हिश्येदारांच्या

स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहे, त्यानंतर प्रत्येक क्षेत्राचे  नकाशे वेगळे करून तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येणार आहे,

त्या नकाशानुसार तहसीलदार पोटहिश्यांचे स्वतंत्र सात-बारा उतारे करणार आहेत.

[su_divider top=”no”]

हे पण वाचा…

[su_divider top=”no”]

पोट हिश्यांचे स्वतंत्र 7/12 उतारा करण्यासाठीचे शुल्क

पोट हिस्याचे स्वतंत्र सात-बारा उतारे करण्यासाठी एक हजार रूपये इतके मोजणी शुल्क आकारले जाणार आहेत,

मोजणीची आवश्यकता नसल्यास विनामोजणी सात-बारा व नकाशे स्वतंत्र करून दिल्या जाणार आहेत.

भूमि अभिलेख विभागाच्या या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असुन,

राज्यामधील प्रत्येक गावात आज जमिनीच्या पोटहिश्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रकरणे असुन त्याबाबत शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाच्या या योजनेमुळे यात घट होणार असुन केवळ नाममात्र शुल्कात

एका आठवड्यामंध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधितांच्या पोटहिश्याचे स्वतंत्र सात-बारा उतारे निर्माण केल्या जाणार आहेत.

येत्या काळात हि योजना अधिक वेगाने संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.

[su_divider top=”no”]

हे पण वाचा…

[su_divider top=”no”]

संबधीत व्हिडीओ पहा…

Sat Bara Utara

[su_divider top=”no”]

Adv