महाराष्ट्र सरकारमार्फत Diwali Kit Ration Yojana राज्यात राबविण्यात येत आहे.
दिवाळी किट राशन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दिवाळी निमीत्त वस्तू वाटप करण्यात येत आहे.
राज्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त शासनाकडून सवलतीच्या दरात अतिरिक्त शिधाजिन्नस (दिवाळी पॅकेज) देण्यात येत आहे.
दिनांक 04 ऑगस्ट 2022 रोजी झालेलया मा. मंत्रिमंडळ बैठकीत दिवाळी किट योजना राज्यात राबविण्या करिता मान्यता देण्यात आलेली आहे.
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
दिवाळी किट योजनेबाबत माहिती
योजना राबविण्यात येणारे राज्य | महाराष्ट्र |
शासनाचा विभाग | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र |
विभागाचे संकेतस्थळ | http://mahafood.gov.in/website/english/home.aspx |
योननेचे नाव | Diwali Kit Ration Yojana दिवाळी किट राशन योजना |
शिधाजिन्नस वाटप योजनेबाबत महाराष्ट्र शासनाकडून 04 ऑक्टोबर 2022 रोजी जि.आर. सुध्दा प्रकाशित करण्यात आलेला आहे, जि.आर. PDF स्वरूपात डाऊनलोड करा.
G.R. Download
Diwali Kit Ration Yojana मधे मिळणाऱ्या वस्तू
महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत असलेलया दिवाळी किट राशन योजने मधे खालील चार प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे
Sr.No | Item | Quantity |
---|---|---|
1 | रवा | 1 किलो |
2 | चणाडाळ | 1 किलो |
3 | साखर | 1 किलो |
4 | पामतेल | 1 लिटर |
राशन किटची किंमत
पात्रता धारकांना वितरीत करण्यात येणाऱ्या दिवाळी राशन किटची किंमत 100 रूपये इतकी आहे. एका शिधापत्रीकेवर फक्त एक किट वितरीत केल्या जाणार आहे.
दिवाळी किट राशन योजना सहभागी क्षेत्र
Diwali Kit Scheme योजनेमधे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याच समावेश करण्यात आलेला नाही, प्रामुख्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागातील 8 जिल्हे तसेच अमरावती विभागातील 5 जिल्हे आणि नागपूर विभागातील 1 अश्या 14 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
Diwali Ration Kit Yojana मधील समाविष्ट जिल्हे
दिवाळी राशन किट योजना मधे औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील खालील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
औरंगाबाद विभागातील जिल्हे | अमरावती विभागातील जिल्हे | नागपूर विभागातील जिल्हे |
छत्रपती संभाजी नगर | अमरावती | वर्धा |
जालना | अकोला | |
बिड | बुलढाणा | |
परभणी | वाशिम | |
हिंगोली | यवतमाळ | |
धाराशीव | ||
लातूर | ||
नांदेड |
पात्रता दिवाळी राशन किट योजना
महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या दिवाळी निमित्त वाटप करण्यात येणाऱ्या दिवाळी किट योजना चा लाभ घेण्याकरीता खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- केशरी शिधापत्रिकाधारक असावा
- स्वत:च्या नावे जमीन असावी
- शेतकरी (APL Farmer) असावा
- औरंगाबाद, अमरावती विभागतील रहिवाशी तसेच नागपूर विभागतील वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी असावा
- दारिद्र्य रेषेखालील नसावा
शिधाजिन्नस संच खरेदी मान्यता
महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग च्या दिनांक 12.09.2017 च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार शिधाजिन्नस संच खरेदीकरिता NeML NCDEX Group of Company यांच्या मार्फत Online Portal व्दारे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या न्यूनतम दराने उपरोक्त शिधाजिन्नस संच खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे,
संबधीत निवविदाधारकाला शिधाजिन्नस संच तालुका स्तरावरील गोदामांपर्यंन्त पोहोचविणे आवश्यक राहणार आहे.
संबधीत शिधाजिन्नस संच पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका 100 रूपये प्रति संच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याकरीता मान्यता देण्यात आलेली आहे.
दिवाळी संच योजनेकरीता इतका खर्च येणार
शिधाजिन्नस संचाच्या खरेदीसाठी 478.24 कोटी रूपये तसेच इतर अनंषांगिक खर्चाकरीता 35.00 कोटी अशा एकूण 513.24 कोटी इतक्या खर्चास तसेच, सदर शिधाजिन्नस संच विक्रीतून शासनास जमा होणारी रक्कम वजा जाता उर्वरित रकमेच्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेची माहिती सर्व रास्तभाव दुकानदारांना तसेच पात्र कुटुंबांना होण्याकरीता प्रसिध्दी करण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चाकरीता सुध्दा मान्यता देण्यात आलेली आहे.
100 रूपयात राशन कार्ड धारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दिवाळी किट योजने बाबतचा शासन निर्णय (जि.आर.) डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंक वरती क्लिक करा.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202210041721580406.pdf
——————–