Krushi Drone Subsidy Scheme कृषी ड्रोन अनुदान योजना

0
1094

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनीक साधनांचा उपयोग करता यावा या करिता कृषी ड्रोन अनुदान योजना Krushi Drone Subsidy Scheme राबविण्यात येत आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणात अनुदान कृषी उपयोगाकरीता लागणारे ड्रोन खरेदी करण्याकरीता तसेच वापरा करीता उपलब्ध करून देण्यात येत आहे.

केंद्र सरकारचे कृषी धोरण हे कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी तसेच अल्पभुधारक शेतकऱ्यांना विविध कृषी संबधीत वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा असे राहिलेले आहे.

काहि दिवसापूर्वी पार पडलेल्या अर्थसंकल्पाच्या केंद्र स्थानी कृषी क्षेत्र असलेले आपल्याला दिसून आले आहे.

दिवसेंदिवस कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण होत असून आता ड्रोन च्या शेती मधील उपयोगात वाढ होण्याकरीता शासनाकडून योजना राबविण्यात येत आहे.

Drone Anudan Yojana
Drone Anudan Yojana

अशी असणार कृषी ड्रोन अनुदान योजना

Drone (ड्रोन) च्या माध्यमातून शेती करीता विविध कामे केल्या जावू शकतात, तसेच ड्रोन भाडे तत्वावर उपलब्ध करून रोजगार निर्मिती सुध्दा साधता येवू शकते.

कृषी क्षेत्रात संध्या शेती पिकांवर फवारणी करण्याकरीता पाठीवरील पंपाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्या जातो, अश्या फवारणीच्या पध्दती मधे विविध प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते.

त्याअनुशंगाने कृषी यांत्रिकिकरण उपअभियान मधून कृषी पदवीधारक असलेल्यांना कृषी संबधीत कामे करणारे ड्रोन अवजारे तसेच त्या संबधीत सेवा सुविधा देणारे केंद्र सुरू करण्याकरीता शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

तसेच विविध कृषी संबधीत संस्थानांही अनुदान देवून ड्रोन चा शेती व्यवसायातील वापर वाढवील्या जाणार आहे.

योजनेचे नावकृषी ड्रोन अनुदान योजना Krushi Drone Subsidy Scheme
योजनेचे वर्ष2022-2023
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र राज्य
संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in/1001/Home
कृषी ड्रोन अनुदान योजना Krushi Drone Subsidy Scheme

Krushi Drone Subsidy Scheme करीता खालील प्रमाणे अनुदान मिळणार

कृषी क्षेत्रात ड्रोन व्दारे फवारणीचा वापरात वाढ व्हावी हा प्रमुख उद्देश हि योजना राबविण्या मागे शासनाचा आहे.

यामुळे आता कृषी ड्रोन  Krushi Drone व्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक हे खालील संस्थंव्दारे राबविले जाणार आहे.

  • कृषी विज्ञान केंद्रे
  • शेतकरी उत्पादन संस्था
  • कृषी विद्यापीठ
  • भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था
  • कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था
Agriculture Drone Scheme
Agriculture Drone Scheme

ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता येथे क्लिक करा ( Krushi Drone Subsidy Scheme )

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

कृषी ड्रोन खरेदी करीता अनुदानाची रक्कम

  • विद्यापीठे व सरकारी संस्था – 100 टक्के अनुदान ( 10 लाख पर्यंत )
  • शेतकरी उत्पादक संस्था – 75 टक्के ( 7 लाख 50 हजार पर्यंत )
  • शेतकरी उत्पादक संस्थांनी ड्रोन भाड्याने घेतल्यास – प्रती हेक्टरी 6 हजार रूपये अनुदान
  • संस्थांनी कृषी ड्रोन चे प्रात्यक्षिक राबविल्यास – 3 हजार पर्यंत अनुदान
  • अवजारे सेवा सुविधा केंद्रांना ड्रोन खरेदी करीता – Krushi Drone च्या किमतीच्या 50 टंक्के जास्तीत जास्‍त 5 लाखापर्यंन्त अनुदान
  • कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास – 5 लाखा पर्यंन्त अनुदान.
Krushi Drone Yojana
Krushi Drone Yojana

 कसे मिळवावे कृषी ड्रोन खरेदी करण्याकरीता अनुदान ?

  • Krushi Drone Subsidy मिळवीण्या करीता खालील ठिकाणी अर्ज करता येतात.
  • कृषी आयुक्तालय निविष्टा तसेच गुणनियंत्रण विभागातील अवजारे विभागाचे उपसंचालक
  • तालुका कृषी अधिकारी

Krushi Drone Subsidy मिळवीण्या करीता खालील ठिकाणी अर्ज करता येतात.

  • कृषी आयुक्तालय निविष्टा तसेच गुणनियंत्रण विभागातील अवजारे विभागाचे उपसंचालक
  • तालुका कृषी अधिकारी

पात्रता

  • कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद संस्था, कृषी यंत्रे व अवजारे तपासणी संस्था ई. योजनेकरीता पात्र राहतील.
  • वरील पात्रता सिध्द करणारा पुरावा
  • कृषी पदवीधारक असल्यास कृषी पदवी

Krushi Drone Subsidy Scheme आवश्यक कागदपत्रे

  • कृषी पदवी
  • ड्रोन खरेदीची पावती
  • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

विविध सरकारी योजनांचे वेळीच अपडेट मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम चॅनला ज्वाईन करा

https://t.me/officialtechwithrahul

विविध सरकारी योजनांबाबत माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब चॅनला ला सबस्क्राईब करा

www.youtube.com/techwithrahul

इतर अनुदान योजना पहा

Adv