परदेश अभ्यासदौऱ्याकरीता Pardesh Krushi Abhyas Daura शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे बाबत
राज्यातील शेतकऱ्यांना विदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या करीता परदेश कृषि अभ्यासदौरा योजना आयोजित केल्या जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे परदेश दौरे हि योजना राबविण्यात येत आहे.
योजनेची ओळख Pardesh Krushi Abhyas Daura Yojana Mahiti
Scheme Name | Pardesh Krushi Abhyas Daura परदेश कृषी अभ्यास दौरा |
राज्य | महाराष्ट्र |
शासनाचा विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पध्दती | ऑफलाईन अर्ज भरून कृषि अधिकारी कार्यालयात सादर करणे |
शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यासंबंधीत शेतकऱ्यानी करावयाच्या अर्जाचा नमुना
खाली दिलेल्या PDF फाईल मधे प्रपत्र 1, प्रपत्र 2 (स्वयंघोषणा व हमीपत्र), प्रपत्र 3 (प्रस्ताव तपासणी सूची व प्रमाणपत्र), प्रपत्र 4 (राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेअंतर्गत अभ्यास दौऱ्यास जाऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांनी भरून द्यावयाचे प्रपत्र), प्रपत्र 5 (राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौऱ्याबाबत शेतकऱ्यांचे अभिप्राय
अर्जाची फाईल करीता डाऊनलोड बटन वरती क्लिक करा
अर्ज कसा भरायचा (परदेश कृषि अभ्यासदौरा योजना) याबाबत माहिती आधारित खालील व्हिडीओ पहा
Pardesh Krushi Abhyas Daura पात्रता निकष
- अभ्यास दौऱ्याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असायला हवा.
- स्वत:च्या नावाचा 7/12 उतारा व 8 अ उतारा (मागील सहा महिन्यातील) असावा.
- शेतकऱ्याचे उत्पान्नाचे मुख्य साधन शेती असायला हवी. याकरीता त्याने स्वयंघोषणापत्र (प्रपत्र-2) अर्जासोबत भरून द्यावे.
- अर्जदार शेतकऱ्याचे फार्मर आय डी असावा (ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक)
- वैध पारपत्र (पासपोर्ट) धारक असावा.
- शारीरीकदृष्ट्या अर्जदार शेतकरी तंदुरूस्त असावा.
परदेश कृषि अभ्यासदौरा योजना करीता अपात्रता
- अर्जदार शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी 25 वर्षापेक्षा कमी असणे.
- शेतकरी शासकिय, निमशासकीय, सहकारी, खाजगी संस्थेत नोकरीस असेल तर अपात्र ठरतो.
- वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, सीए, वकील, अभियंता, कंत्राटदार हे सुध्दा अपात्र आहे.
- अर्जदार शेतकऱ्याने यापुर्वी शासकिय (या मधे केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषि विद्यापिठामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत) अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला असेल तर तो अर्जदार अपात्र आहे.
अर्जासोबत द्यावयाचे कागदपत्र Pardesh Krushi Abhyas Daura Yojana
- विहित नममुन्यातील अर्ज प्रपत्र 1
- स्वयंघोषणापत्र प्रपत्र 2
- वैध पारपत्राची (पासपोर्ट) झेरॉक्स प्रत
- आधार कार्ड झेरॉक्स
- 7/12 उतारा व 8 अ उतारा प्रत (मागील सहा महिन्यातील असावी)
- शिधापत्रिकेची (राशन कार्ड) झेरॉक्स प्रत
- वैद्यकीय अधिकाऱ्याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र (शासकीय अधिकारी अथवा किंमान MBBS डॉक्टरचे असावे
विविध सरकारी योजनांचे Sarkari Yojana वेळीच अपडेट Update मिळवीण्या करीता खालील टेलिग्राम Telegram चॅनला Channel ज्वाईन करा
https://telegram.me/Tech_With_Rahul
विविध सरकारी योजनांबाबत Sarkari Yojana माहिती पाहण्याकरीता खालील युट्युब You Tube चॅनला Channel ला सबस्क्राईब Subscribe करा