Human Right मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
मानव अधिकार आयोगाकडे (Human Right Commission) तक्रार कशी दाखल करावी ?
[su_quote]भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकांस त्याचे मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत.प्रशासकीय यंत्रणे कड़न एखाद्या व्यक्तीच्या या हक्कांची पायमल्ली झाल्यास त्यावेळी त्या नागरिकांच्या मदतीला Human Right मानवी हक्क आयोग धावून येतो.[/su_quote]
जाणून घेऊया आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी
[su_pullquote align=”right”]मानवी हक्क सरक्षण अधिनियम १९९३ हा २८ सप्टेंबर १९९३ रोजी लागू झाला. महाराष्ट्रात राज्य मानवी हक्क आयोग नोव्हेंबर २००१ रोजी स्थापन झाला.[/su_pullquote]
[su_image_carousel source=”media: 733″ slides_style=”photo” crop=”none” align=”center” image_size=”full”]
तक्रार करण्याची पद्धती
१) अशी कोणतीही व्यक्ती की ज्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन किंवा हनन झाले असेल त्या व्यक्तीस किंवा त्या व्यक्तीच्या वतीने कोणतीही व्यक्ती स्वत: अथवा पोस्टाने फॅक्सने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करू शकतात.
२) कोणत्याही स्वरूपाचे शुल्क अथवा तिकीट अर्ज सादर करण्यासाठी लागत नाही.
३) सदर तक्रार ही अध्यक्ष किंवा सचिव ,राज्य मानवी हक्क आयोग यांना संबोधून करावी
४) कोणत्याही सरकारी खात्यातील सरकारी अधिकाऱ्याविरूद्ध तक्रार करता येते.
५) तक्रार ही मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतून करता येईल.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
- Kharip Pik Vima 2024 खरीप पीक विमा Online अर्ज कागदपत्रे
- Pocra 2.0 पोकरा दुसरा टंप्पा सुरू – असा करा अर्ज
- Dushkal Anudan Yadi 2024 दुष्काळ अनुदान यादी 2024 डाऊनलोड
- Kunbi Nondi Download कुणबी नोंदी गावनिहाय
- Pradhan Mantri Suryodaya Yojana Online Registration
- अवेळी पाऊस, गारपीट मदत यादी 2023 Avkali Pauss Madat Yadi
[su_divider top=”no”]
अशा घटनाविरूद्ध तक्रार करता येईल
१) सरकार अथवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांकडून होत असलेला शारिरीक अत्याचार,मानवी हक्क विषयक फसवणूक व छळ तसेच सन्मानाने जगण्याच्या प्रयत्नांत सरकारी अधिकारी यांनी केलेला अमानवीय हस्तक्षेप आदी कारणासाठी Human Right बाबत तक्रार करता येते.
२) पोलीस कोठडीत झालेली अमानवीय पदधतीची मारहाण.
३) पोलीस कोठडी, कारागृह, बाल व महिला सुधारगृह आदी ठिकाणी झालेला छळ आणि मृत्यू तसेच हरवलेली बालके न शोधणे, स्त्रीयांवरील अत्याचार, दंगलीतील मृत्यू
४) अन्न, वस्त्र ,निवारा, आरोग्य व शिक्षण आदी मूलभूत गरजांबाबत प्रतिपूर्ती बाबत उपेक्षित समाजाची शासकीय अधिकारी यांच्याकडून होणारी हेळसांड या विरोधातही मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करता येते.