Pik Vima 2021 बाबत महत्वाची माहिती

0
2378

Pik Vima 2021 योजना खरीप हंगाम मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देणेबाबत. महाराष्ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने शासन परिपत्रक दिनांक १५ जुलै, २०२१ रोजी प्रकाशित केले आहे.

Pik Vima 2021
Pik Vima 2021

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिक विमा 2021 योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या ३ वर्षाच्या कालावधीसाठी शासन निर्णय दि.२९.०६.२०२० व दि.१७.०७.२०२० अन्वये राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयानुसार खरीप हंगाम-२०२१ करीता सहभागाची अंतीम मुदत दि.१५.०७.२०२१ अशी निश्चित करण्यात आलेली होती. तथापि, राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर विविध भागात असलेले निबंध विचारात घेता, शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि.१५.०७.२०२१ पासून दि.२३.०७.२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

पिक विमा योजना खरीप 2021

योजनेचे नावPik Vima 2021
राज्यMaharashtra
सुरूवात वर्ष2021
अधिकृत संकेतस्‍थळhttps://pmfby.gov.in/
Pik Vima 2021

Pik Vima Website :

https://pmfby.gov.in/

Pik Vima CSC Login :

https://pmfby.gov.in/csclogin

पिक विमा Last Date :

23 जुलै 2021

पिक विमा 2021 जि.आर.डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हे सुध्दा वाचा …

[su_divider top=”no”]

राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबुन आहे.

राज्यातील हवामान हे बेभरवशाचे असल्याने व मान्सुनची सुध्दा अनियमितता यामुळे शेती पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होतो.

राज्यात बे मोसमी होणार पाऊस तसेच असाधारण वितरण यामुळे अनेक भागात पुरपस्थिती निर्माण होते.

तर काहि भागात दुष्काळ सदृष्ट परिस्थिती दिसते,

शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांसाठी आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारतर्फे शेतकरी पिक विमा योजना हि

संपूर्ण देशात राबविली जाते या योजने अंतर्गत पिक विम्यासाठी काहि हिंस्सा हा शेतकऱ्यांना भरावा लागतो

तर त्यातला मोठा हिस्सा शासनातर्फे भरल्या जातो,

हवामानातील बदलामुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून मिळते.

राज्यातील बहुतांश शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी होतात,

मात्र शेतकऱ्यांकडून पिक विमा योजने मधून फक्त पिक विमा योजना राबविणाऱ्या कंपण्यांनाच मोठा आर्थिक फायदा होतो असा आरोप होतो.

काहि प्रमाणामध्ये या आरोपामध्ये तथ्य सुध्दा आढळून येते.

पिक विमा 2021 योजना राबविण्या संदर्भातल्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेला आहे.

बदल करण्यात आलेल्या तारखांबाबत शासनाकडून जि.आर. सुध्दा काढण्यात आला आहे.

Adv