Digital 7/12 Utara Download डिजीटल सही सातबारा उतारा

13
3456

Digital 7/12 Utara || डिजीटल सहीयुक्त डिजीटल सातबारा डाऊनलोड करण्याबाबत माहिती

जमीनीचा Digital 7/12 उतारा आता मोबाईलवरती सुध्दा डाऊनलोड करता येत असून

बऱ्याच जणांना डाऊनलोड करण्याची प्रक्रिया माहित नसल्या कारणाने अडचण येते,

महसूल विभागाच्या वेबसाईटवरून अत्यंन्त सोप्या पध्दतीने मोबाईलवर सुध्दा Digital Sign 7/12 उतारा डाऊनलोड करता येतो.

आता शेतकऱ्यांना अथवा जमीन मालकाला 7/12 उतारा मिळवीण्यासाठी तलाठी कार्यालयात अथवा

तहसिल कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून घरबसल्या मोबाईलवरती काहि मिनीटात डिजीटल सातबारा उतारा मिळवीता येणार आहे.

महसूल विभागाने Digital 7/12 उतारा दोन प्रकारात उपलब्ध करून दिलेला आहे

1.साधा 7/12 उतारा

2.डिजीटल सही युक्त 7/12 उतारा

डिजीटल सातबारा Utara बाबत माहिती

नमुना कागदपत्रDigital 7/12 Utara
StateMaharashtra
विभागमहसुल विभाग
Official Websitehttps://rfd.maharashtra.gov.in/mr
सात बारा उतारा
Digital 7/12
Digital 7/12

अ) साधा 7/12 उतारा

साधा 7/12 उतारा हा महसूल विभागाच्या वेबसाईटवरून मोबाईलवरती अथवा कॉम्युटरवरती मोफत डाऊनलोड करता येतो,

या साठी कोणतीही फी हि द्यावी लागत नाही साधा 7/12 उतारा मात्र कोणत्याही शासकिय कामासाठी वापरता येत नाही,

साधा 7/12 उतारा फक्त जमीनीची माहिती पडताळण्यासाठी वापरता येतो, जसे कि शेतकऱ्याने तलाठी कार्यालयात

7/12 उताऱ्यात फेरफार करण्यासाठी अथवा शेततळे नोंदणी, झाडांची नोंदणी, नवीन विहीर नोंदणी ई. साठी अर्ज दिलेला असेल

त्यानंतर त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर झाली का हे पाहण्यासाठी साधा 7/12 उतारा शेतकऱ्याला विनामुल्य मिळवीता येतो.

साधा 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा यासाठी खालील व्हिडीओ पहा

सातबारा Utara

ब) डिजीटल सातबारा उतारा

डिजीटल सही युक्त 7/12 उतारा हा महसूल विभागाच्या वेबसाईटवरून मोबाईलवरती अथवा

कॉम्युटरवरती 15 रूपये इतकी फी ऑनलाईन पध्दतीने भरून डाऊनलोड करता येतो,

डिजीटल सही युक्त 7/12 उतारा हा विविध शासकिय कामांसाठी तसेच योजनांसाठी वापरता येतो,

त्याला शासकिय कामासाठी वापरण्याची शासनाकडून मान्यता मिळालेली आहे, विविध खाजगी ठिकाणी जसे खाजगी बँक मंध्ये सुध्दा या 7/12 उताऱ्याचा वापर वैध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभाने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधे मुळे शेतकऱ्यांना आता

आपल्या जमिनीचा सात बारा उतारा मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत नाही.

स्वत: किंवा सेतू सेवा केद्रात अथवा सि.एस.सी केंद्रात सातबारा उतारा मिळवीता येतो.

डिजीटल सातबारा उतारा कसा डाऊनलोड करायचा यासाठी खालील व्हिडीओ पहा

डिजीटल सातबारा

हे सुध्दा वाचा…

[su_divider top=”no”]

Adv