अटल बांधकाम कामगार आवास योजना || Atal Bandhkam Kamgar Awas Yojana
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी
शहरी भागातील बांधकाम कामगारांकरीता प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत Atal Bandhkam Kamgar Awas Yojana
महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना संदर्भाधीन दिनांक ०३ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे आणि
संदर्भाधीन दिनांक २९ ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये लाभार्थी निवडीबाबतच्या अटी शर्ती व योजना अंमलबजावणीची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे.
योजनेसाठीचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या दिनांक ३० ऑक्टोबर, २०१८ रोजीच्या बैठकीत
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या
कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी मंडळामार्फत योजना राबविण्याबाबत आणि सदर
योजनेत घरकुल बांधण्यासाठी बांधकाम कामगाराला अर्थसहाय्य देण्याचा ठराव पारित करण्यात आला.
त्यास अनुलक्षून ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार (ग्रामीण) आवास योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासनाने अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana ) बाबत पुढिल निर्णय घेतला आहे :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांच्या घराच्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेस ( ग्रामीण )
मंजुरी आणि अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक,
राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण कार्यालय, बेलापुर, नवी मुंबई या यंत्रणेमार्फत राबविण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
शासनाने अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण या योजनेचे स्वरूप :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.
अ. मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर
नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. १.५० लक्ष अनुदान
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर( MGNREGA) अनुज्ञेय असणारे रु. १८,०००/- तसेच
स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.१२,०००/- असे एकूण रु. ३००००/-
अनुदान रु. १.५० लक्ष मध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुवार लाभ देय राहणार नाही.
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana घराचे क्षेत्रफळ :
अटल बांधकाम कामगार आवास योजना ( ग्रामीण ) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी
किमान २६९ चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे.
त्याकरिता रु. १.५० लाख एवढे अनुदान देय राहील.
मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहणार आहे.
शासनाने अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण लाभार्थी पात्रता :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण)
लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे:
अ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना
तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
आ. नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वत:च्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे.
तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
इ. नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वत:च्या / पती /पत्नीच्या नावे मालकीची जागाअसावी अथवा
मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.
ई. बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा/ अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र/ शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
उ. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
ऊ. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्च: या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
ए. नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
शासनाने अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana ) आवश्यक कागदपत्रे :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ( (ग्रामीण)
लाभ घेण्यासाठी विहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे:
अ) सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
आ) आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत. इ) ७/१२ चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र/ ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
ई) लाभधारकाचे स्वत:च्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana अंतर्गत घराची रचना :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी
ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण) घराची रचना खालील प्रमाणे आहे.
अ) संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा.
शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
आ) जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फूट असावी.
इ) छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास ____ मुभा राहील.
ई) घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह ( लोगो) लावणे आवश्यक आहे.
हे सुध्दा वाचा…
[su_divider top=”no”]
- Sheli Anudan Yojana शेळी वराह अनुदान योजना
- 05, 08 Scholarship Exam 2021, Hall Ticket Download
- 11 CET Online Form – New Website
- 50 Hajar Anudan List रेग्युलर कर्जदार अनुदान यादी
- 50 Hajar Anudan पात्रता, लाभार्थी यादी
- 7/12 Utara मध्ये झाले नवीन बदल
[su_divider top=”no”]
अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण साठी जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय)
बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठीच्या अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)
अंतर्गत केलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी अपर कामगार आयुक्त /कामगार उपायुक्त यांचे
अध्यक्ष अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती गठीत करण्यात येत असून समितीची रचना व कार्ये खालील प्रमाणे आहे:
अ.क्र. | पदनाम | पद |
1 | अपर कामगार आयुक्त /कामगार उपायुक्त | अध्यक्ष |
2 | प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | सदस्य |
3 | जिल्हा कार्यकारी अधिकारीण् महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम | सदस्य |
4 | उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ | सदस्य सचिव |
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana अर्ज करण्याची व त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपध्दती :
अ) नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगारानी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळानी विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
आ) बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच
अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या
बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करेल.
इ) उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा
सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील.
सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि
त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देणार आहे.
ई) सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे
ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग,
नवी मुंबई याचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
उ) घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवुन दिलेले बांधकाम
पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
ऊ) योजनेंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून ४% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीणअगृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहणार आहे.
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana जिल्हास्तरिय सनियंत्रण समिती :
अ.क्र. | पदनाम | पद |
1 | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद | अध्यक्ष |
2 | प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रण | सदस्य |
3 | कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद | सदस्य |
4 | उपकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ | सदस्य सचिव |